रोम म्हणजे काय ? ROM full form

नमस्कार, रॅम आणि रोम हे आपण सतत ऐकत असतो आणि याच्या शिवाय कॉम्प्युटर चालणे शक्य नाही, हा कॉम्पुटर मधील काही तरी महत्वाचा भाग आहे, हे हि आपल्याला माहिती आहे. आणि असेच प्रश्न आपल्या मनामध्ये सहज येऊन जातात. भरपूर वेळा vichar करतो कि हे नक्की काय असेल बर आणि याचा कॉम्पुटर मध्ये उपयोग काय होत असेल ? खूप वेळा वाटत कि Search करू पाहू रोम विषयी पण प्रत्येक वेळी ते राहून जातं.आज आर्टिकल उघडलाच आहे तर चला मग जाणून घेऊया रोम म्हणजे काय ? ROM full form

ROM चा फुल फॉर्म आहे ‘रीड ओन्ली मेमरी

रोम म्हणजे काय ? ROM full form

रीड ओन्ली मेमरी म्हणजे अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेटा साठवून ठेवण्याची अशी जागा असते कि,त्यातला डेटा आपण फक्त रीड करू शकतो, त्यामध्ये सहजासहजी बदल करता येत नाही.

O
मेमरीचे प्रकार


कॉम्प्युटर मध्ये दोन प्रकारचे मेमरी असतात एक प्रायमरी मेमरी आणि दुसरा सेकंडरी मेमरी.
प्रायमरी मेमरी चे पुन्हा अजून दोन प्रकार पडतात
१) RAM
२) ROM
तर मित्रांनो आज आपण रोम विषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया.

अनुक्रम :
१) ∆ ROM म्हणजे काय ?
२) ∆ROM  ची विशेषता
३) ∆ ROM मेमरी ची विशेषता
४) ∆ ROM चे प्रकार
५) ∆ ROM काम कसं करते ?
६) ∆ ROM चे फायदे -

∆ ROM म्हणजे काय ?


               
या मेमरीचे नावच रीड ओन्ली मेमरी असल्यामुळे आपल्या सर्वांच्या लगेच लक्षात येतं की

त्यातला data आपण फक्त read करू शकतो त्यामध्ये सहजासहजी बदल करता येत नाही.
आपण जेव्हा नवीन कॉम्प्युटर घेतो तेव्हा त्यामध्ये बायोस हा प्रोग्राम अगोदर पासूनच इंस्टॉल असतो.

प्रोग्राम कॉम्प्युटर ला ऑन करण्यास मदत करतो तसेच कॉम्प्युटर आणि ऑपरेटिंग सिस्टिम यांना जोडण्याचे काम करतो.

हा बायोस प्रोग्राम ज्या मेरे मध्ये साठवलेला असतो त्याला ROM असे म्हणतात. कॉम्प्युटरला ऑन करणारा सॉफ्टवेअर प्रोग्राम

म्हणजेच FIRMWARE तोही ROM या मेमरी तच असतो

ROM ही मेमरी तेव्हाच बनवतात जेव्हा कॉम्प्युटर बनतात. मोबाईल आणि कॉम्प्युटर शिवाय इतरही इलेक्ट्रॉनिक्स साधनांमध्ये

रोमचा वापर केला जाऊ शकतो जसे की टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, लिफ्ट, इत्यादी.
बदलत्या काळामध्ये टेक्नॉलॉजी बदलत असल्याने रोमचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे त्याबद्दल आपण पुढे पाहू या.

∆ ROM मेमरी ची विशेषता

आताच आपण पाहिलं कि रोम म्हणजे काय ? ROM full form . आता या पॉईंट मध्ये आपण पाहणार आहोत ROM मेमरी ची विशेषता काय असते आणि रोम आपल्याला कश्या प्रकारे उपयोगी पडते.चला तर मग पाहुयात रोम मेमरी ची विशेषता.

  • ही एक स्थिर किंवा परमनंट मेमरी स्टोरेज आहे.
  • या मेमरी मध्ये कॉम्प्युटरच्या सर्व बेसिक फंक्शन्स ना स्टोअर केला जातो.
  • ROM ही मेमरी ओन्ली असल्यामुळे प्रत्येक प्रोग्राम फक्त read केलं जातो
  • ही मेमरी खूप कमी ऊर्जेचा वापर करतात आणि त्यासोबतच खूपच रिलायबल असतात.
  • ROM ही मेमरी RAM मेमरी पेक्षा किमतीने स्वस्त असते.
∆ ROM चे प्रकार

आपण वरील भागात पाहिले की रोम ची विशेषता काय काय आहे आता आपण पाहणार आहोत ROM चे प्रकारकिती आणि कोण-कोणते आहेत याविषयी.चला तर मग पाहूया रोमचे प्रकार किती व कसे आहेत.

ROM Memory मुख्यतः चार प्रकारांमध्ये विभागली जाते.

१) MROM
२) PROM
३) EPROM
४) EEPROM
१) MROM – ( Masked Read Only Memory )

MROM हे मेमरी सुरुवातीला वापरले जायचे आता याचा अजिबात वापर केला जात नाही. रेड ओन्ली मेमरी हार्ड वायर डिवाइस असतो.

ज्यात पहिल्यापासूनच Pre-Programmed डाटा आणि इन्स्ट्रक्शन स्टोअर केलेला असतात. पूर्वीच्या काळात याचा वापर केला जात असे परंतु

हे किमतीने खूप महाग असल्याकारणाने आता याचा वापर होत नाही आणि याला पर्याय खूप असल्याकारणाने ते सध्या कुठेही कुणीही वापरत नाही.

२) PROM – ( Programmable Read Only Memory )

           PROM ही रीड ओन्ली मेमरी आपण फक्त एकदाच बदलू शकतो. बदल करू शकतो म्हणजेच या मेमरीला आपण अपडेट करू शकतो तेही

फक्त एकदाच नंतर ही अपडेट ही करता येत नाही. एखादा वापरकर्ता रिकामी पी रूम घेऊन त्यात आपण इन्स्ट्रक्शन टाकू शकतो.

यामध्ये छोटे छोटे फ्यूज असतात त्यात आपण प्रोग्रॅमिंगच्या मदतीने इन्स्ट्रक्शन टाकू शकतो पण एकदा टाकलेले इन्स्ट्रक्शन्स परत डिलीट करता येत नाहीत किंवा बदलता येत नाही.

३) EPROM – ( Erasable and Programmable Read Only  Memory )

Erasable and Programmable Read Only Memory ही मेमरी Delete ही करता येते आणि परत प्रोग्राम ही करतात. पण त्यांची पद्धत खूप वेगळी आहे. ही मेमरी अल्ट्रावायलेट किरणा मध्ये चाळीस मिनिट ठेवावी लागते तेव्हा त्यातला सगळा डेटा डिलीट होतो व ती आपण परत प्रोग्राम करू शकतो.                EPROM च Programming करते वेळी Charge त्यामधे टाकले जाते.ते जवळपास १० वर्षांपेक्षा जास्त काळासाठी यातच राहते कारण याला बाहेर काढण्यासाठी जागाच नसते.यामुळे हे चार्ज यामधेच राहते. याच चार्ज ला Erase करण्यासाठी ULTRA VIOLET LIGHT ला Lid च्या साहाय्याने यातून पास केले जाते. या Light च्या प्रभावानेच to Charge नष्ट होतो.               

४) EEPROM – ( Electrically Erasable and Programmable Read Only Memory )

टेक्नॉलॉजी च्या वाढत्या बदलामुळे Read Only Memory मधे भरपूर बदल होत गेले. EEPROM ची खास गोष्ट ही आहे की या मेमोरी ला 

१०,००० वेळेस Erase करू शकतो व प्रोग्राम करू शकतो. आणि फक्त ४-१० millisecond मधे आपण याला Erase किंवा प्रोग्राम करू शकतो.


आपण यातील कोणत्याही विशिष्ट Location ला Erase किंवा प्रोग्राम करू शकतो. यासाठी संपूर्ण मेमोरी ला Erase करण्याची गरज नसते.

यामुळेच तर EEPROM वापरायला सोपी आहे.

∆ ROM काम कसं करते ?

जेव्हा आपण कॉम्प्युटर Switch On करतो, तेव्हा कॉम्प्युटर एकदम निवांत झालेला असतो. त्याला तयार होण्यासाठी वेळ लागतो.

यामुळे कॉम्प्युटर मध्ये बायोस दिलेला आहे जॉकी कॉम्प्युटरला जाणीव करून देतो की आपल्या सोबत हार्डवेअर जोडलेली आहेत जसे की

कीबोर्ड माऊस डिस्क ड्राइव्ह हे सगळे अटॅच असतात ह्याला जनरली बायोस म्हणतात. बायोस म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम.

बायोस चिप्स ह्या कॉम्प्युटर मध्ये असतात आणि त्या कॉम्प्युटरला मदत करतात स्टार्टउप routines ला access  करण्यासाठी.

जे की स्टोअर असतात एका डिस्क ड्राईव्हमध्ये आणि यामध्ये सुद्धा RAM चा उपयोग करतात, सगळ्या कार्यांना पार  पाडण्यासाठी.हे

BIOS स्टोअर असतात एका ROM चिप मध्ये नाहीतर कॉम्प्युटरला कसं कळलं की कोणते हार्डवेअर आपल्यासोबत जोडले आहेत.

हे झालं बायोस विषयी, आता आपण जाणून घेऊया ROM चिप्स विषयी. RAM प्रमाणेच ROM चिप्स मध्ये सुद्धा कॉलम आणि रो असतात. हे ग्रेडच्या माध्यमात असतात. जेथे RAM ट्रांजिस्टर चा उपयोग करतात कॅपॅसिटर ला ऑन/ऑफ  करण्यासाठी त्याचप्रमाणे ROM Diode चा उपयोग करतात या लाइन्स ला कनेक्ट करण्यासाठी. एलाइन्स ची व्हॅल्यू जर १ असेल तरच ते कनेक्ट होतात जर त्यांची व्हॅल्यू ० असेल तर हे कनेक्ट होऊ शकत नाही.

ROM व्यवस्थित काम करण्यासाठी त्यांची प्रोग्रामिंग व्यवस्थित झाली पाहिजे. याचे कारण असे की एक स्टॅंडर्ड ROM चीप ला एकदाच प्रोग्रॅम करू शकतो.

रोमला प्रोग्राम करतेवेळी जर काही चुकलं किंवा त्याला जर अपडेट करायचा असेल तर हा पर्याय त्यात नसतो याला एकच पर्याय की ROM बदलणे.

∆ ROM चे फायदे –
  • ROM हे नॉन VOLATILE असल्यामुळे त्यातील प्रोग्राम स्थाई रूपात असतात.
  • यातील डाटाला कोणीही सहजासहजी बदलू शकत नाही त्यामुळे यातील डाटा सुरक्षित राहतो.
  • RAM च्या तुलनेत ROM हे खूप स्वस्त असतात.
  • RAM च्या तुलनेत ज्यादा विश्‍वसनीय असतात कारण यातील डाटा बदलता येत नाही.
  • हे स्थिर असल्यामुळे याला सारखं रिफ्रेश करण्याची गरज नसते.

आम्ही आशा करतो की ROM विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील.



!! धन्यवाद !!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top