रॅम म्हणजे काय ? what is ram

Share with 👇 Friends.

 

आपण सर्वांनी रॅम हा शब्द खूप वेळा ऐकला आहे. चला तर मग जाणून घेऊया रॅम म्हणजे काय ? what is ram Technology च्या दुनियेत तर रॅम चे महत्व खूपच जास्त वाढले. जर आपण एखादा मोबाईल किंवा कॉम्प्युटर घ्यायला दुकानात गेलो तर सर्वात अगोदर त्याची Ram विचारतो. यावरून त्याची किंमत ठरते. what is ram

अनुक्रम :

१) what is ram ?
२) याला Random Access Memory का म्हणतात ?
३) रॅम ची विशेषता ?
४) रॅम चे प्रकार ?
५) रॅम जास्त असल्याचे फायदे काय ?   
६) MOBILE RAM व PC RAM यातील अंतर -

रॅम म्हणजे काय ? what is ram



RAM – ( Random Access Memory )
            रॅम म्हणजे माहिती आणि प्रोसेसर यांच्यातील दुवा म्हणता येईल. आपल्या मेंदूप्रमाणेच रॅम हा मोबाइलचा किंवा

अगदी कॉम्प्युटर चा मेंदू म्हणता येऊ शकेल. आपण मोबाइलमध्ये साठवू इच्छित असलेली माहिती किंवा

मोबाइलमधील उपलब्ध माहिती शोधू इच्छित असू, तर जी प्रक्रिया करतो ती सर्व प्रक्रिया रॅमच्या माध्यमातून होत असते.

रॅम आणि ANDROID जेव्हा आपण एखादे APP डाऊनलोड आणि इन्स्टॉल करत असतो तेव्हा हे प्रथम ते अ‍ॅप रॅममध्ये साठवले जाते

आणि नंतर इन्स्टॉल होते.

साधारण रॅम डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . रॅम ही Volatile मेमोरी आहे यामुळे PC बंद केला की डाटा नष्ट होवून जातो .

रॅम चे प्रकार

रॅम चे ही २ प्रकार आहेत .


१) Static Ram
२) Dynamic Ram.
Static रॅम ला एखादी माहिती भेटली की ती PC जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते .

जेव्हा आपण कॉम्प्युटर किंवा मोबाइल वर गेम खेळतो, मूव्ही पाहतो, गाणे ऐकतो अजून बरेच काही करतो. या सर्व क्रियांसाठी जागा पाहिजे म्हणजेच

Space पाहिजे. ही Space म्हणजेच रॅम होय.
जेवढ आपण जास्त Application एकाच वेळी चालवू किंवा open करू तेवढा जास्त ram चा वापर झाल्यामुळे, त्या device ची स्पीड कमी होते म्हणजेच

तो device स्लो होतो. म्हणून आपण जास्त रॅम चे Device साठी मागणी करतो. कारण रॅम जेवढी जास्त तेवढा तो device फास्ट.

∆ Random Access Memory का म्हणतात ?

रॅम हा cells चा बनलेला असतो, आणि प्रत्येक cell या Rows आणि columns नी बनलेल्या असतात.

आपला जो data असतो तो रॅम मधील cell मधे साठवला जातो. ज्याचा एक Unique Address असतो, ज्याला cell path म्हणतात.

CPU या cell पासून data वेगळा – वेगळा प्राप्त करू शकतो. आणि तेही वीणा sequence. त्यामुळे रॅम मधील data ला Randomly Access केला जाऊ शकत,

यामुळेच या मेमोरी ला Random Access Memory म्हणतात.

∆ RAM ची विशेषता ?
  • रॅम ला कॉम्प्युटर ची वर्किंग मेमोरी म्हणतात.
  • या मेमोरी ला CPU वापरतो.
  • रॅम Volatile Memory आहे.
  • जेव्हा Device बंद होतो तेव्हा ही मेमोरी रिकामी होते.
  • ही मेमोरी Secondary Memory पेक्षा खूप जास्त जलद आहे.
  • या मेमोरी ची Capacity Secondary मेमोरी पेक्षा कमी आहे.
  • सगळे प्रोग्राम, Application, इन्स्ट्रक्शन RAM मधेच चालतात.
  • रॅम ही महाग असते दुसऱ्या मेमोरी चा तुलनेत.

या आहेत रॅम च्या विशेषता आता आपण जाणून घेऊया की रॅम चे प्रकार.

∆ RAM चे प्रकार ?


आता पर्यंत आपण पाहिलं की रॅम म्हणजे काय आता बघू रॅम किती प्रकारची असते.

रॅम ही मुख्यतः २ प्रकारची असते

१) STATIC RAM –
                          याच्या नावातच समजून जाते की ही स्थिर असते. म्हणजेच यात data तोपर्यंत राहतो जोपर्यंत device चालू राहतो.

याला SRAM on म्हणतात. ही चिप ६ ट्रांसिस्टर चा वापर करतो. याला सारखं रिफ्रेश करण्याची गरज लागत नाही, यातला data स्थिर राहतो.

समान size चा data साठवण्यासाठी SRAM ला DRAM पेक्षा जास्त चिप्स लागतात. म्हणून DRAM पेक्षा SRAM महाग भेटते.

∆ STATIC RAM ची वैशिष्ट्य –
  • STATIC रॅम खूप जलद असते.
  • याची SIZE जास्त असते.
  • विजेचा जास्त वापर
  • या मेमोरी चा Cache मेमोरी साठी वापर होतो.
  • या मेमोरी ला सारखं रिफ्रेश करण्याची गरज नसते
  • खूप दिवस चालते.
२) DYNAMIC RAM

                     DYANAMIC RAM ला DRAM सुद्धा म्हणतात. ही RAM SRAM च्या पूर्ण विरुद्ध असते.

याला सारखं रिफ्रेश करण्याची गरज असते, जर data ला तसाच ठेवायचा असेल तर. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा DRAM ला

एका रिफ्रेश सर्किट शी जोडल्या जाईल. DRAM ही एक Transistor आणि एक Capacitor यांपासून बनते.

∆ DYNAMIC RAM ची वैशिष्ट्य –
RAM जास्त असल्याचे फायदे काय ?       

                       रॅम जास्त असल्यावर कशा प्रकारे काम जलद होते ते आपण एका उदाहरणातून पाहूया.

उदाहरण :

समजा CPU core हा एक गवंडी आहे. याप्रमाणे जर Dual core CPU मधे एका सोबत २ गवंडी काम करत आहेत.

  • DYNAMIC RAM स्लो असते SRAM च्या तुलनेत.
  • SIZE कमी असते.
  • विजेचा वापर कमी
  • SRAM प्रमाणेच DRAM सुद्धा Cache मेमोरी साठी वापर होतो.
  • या RAM ला सारखं रिफ्रेश करण्याची गरज असते.
  • खूप कमी दिवस चालते.

याचप्रमाणे Quad core CPU मधे ४ गवंडी काम करत आहेत, म्हणजेच CPU मधे core जेवढे जास्त तेवढेच होणारे  काम जलद होईल.

येथे आपण रॅम ला काम करण्याची जागा समजू. म्हणजेच जेवढी जास्त रॅम असेल तेवढे काम करण्यासाठी जागा मिळेल.

याचप्रमाणे आपण Hard Drive ला Storage Area समजू, जेथे गवंडी चे कामासाठी लागणारे सगळे सामान ठेवलेले असते. म्हणजेच

रॅम जेवढी जास्त तेवढेच काम करण्यासाठी जागा जास्त.

आपल्याला या उदाहरण वरून लक्षात आलेच असेल की रॅम जास्त असेल तर कार्य करण्याची क्षमता आणि स्पीड दोन्ही जास्त असतात.

हे कॉम्प्युटर चालवताना आपल्याला नक्कीच जाणवते.

 MOBILE RAM व PC RAM यातील अंतर –
  • कॉम्प्युटर मधे PCDDR आणि जास्त तर
  • मोबाइल प्रोसेसर  मधे LPDDR चा वापर केला जातो.
  • LPDDR – Low-Power Double Data Synchronous ram
  • PCDDR – Standard Double Data Synchronous RAM
  • Mobile रॅम ला Power Save करण्यासाठी तर
  • PCRAM ला Performance वाढवण्यासाठी वापरले जाते.
  • जास्त तर मोबाईल Processors ना Arm Architecture चा वापर करून डिझाईन केले आहे.
  • याला खास करून Performance आणि Power यातील Balance बनवण्यासाठी तयार केलेला असत.
  • PCRAM ला Intels x८६ Architecture च्या हीशोबानी बनवला आहे.

आम्ही आशा करतो की RAM विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील.

!! धन्यवाद !!


Share with 👇 Friends.
Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra