कॉम्प्युटर चे प्रकार. Types Of Computer in Marathi

नमस्कार, आपल्याला लहानपणा पासूनच कॉम्पुटर या तंत्रज्ञान विषयी आवड आणि उत्सुकता आहे. कॉम्पुटर चालवायला हि अगदी सोपे आणि सहज असते. ते आपल्या पैकी जवळपास सर्वांनाच जमते, परंतु सर्वांनाच त्याचे प्रकार माहिती असतील असे नाही. तर आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर चे प्रकार. Types Of Computer in Marathi

कॉम्प्युटर चे प्रकार. Types Of Computer in Marathi

कॉम्प्युटर चे प्रकार. Types Of Computer in मराठी

* कॉम्पुटरचे ४ प्रमुख प्रकार आहेत.

१) मायक्रो कॉम्प्युटर
२) मिनी कॉम्प्युटर
३) मेन फ्रेम कॉम्प्युटर
४) सुपर कॉम्प्युटर

• मायक्रो कॉम्प्युटर –
                             या प्रकारच्या कॉम्प्युटर्स ना पर्सनल कॉम्प्युटर सुध्दा म्हणतात. छोट्या कॉम्प्युटर्स चा विकास १९७० मध्ये मायक्रो प्रोसेसर सोबत झाला.

मायक्रो प्रोसेसर ची निर्मिती झाल्यामुळे स्वस्त आणि आकाराने छोटे कॉम्प्युटर बनवणे शक्य झाले.

आपण वरच्या भागात आपण कॉम्प्युटर चे वर्गीकरण पाहिले ते ३ प्रकारे होते. आता पाहूया कॉम्प्युटर चे प्रकार. कॉम्प्युटर चे ४ प्रकार आहेत.

• मिनी कॉम्प्युटर –
                        मिनी कॉम्प्युटर्स मायक्रो कॉम्प्युटर पेक्षा आकार आणि क्षमता या दोन्ही मध्ये मोठे असतात.

सगळ्यात पहिल्यांदा मिनी  कॉम्प्युटर १९६५ मध्ये तयार झाला होता. या कॉम्प्युटरचा आकार जवळपास एखाद्या फ्रीज एवढा होता.

यामध्ये एका पेक्षा जास्त CPU असायचे. मिनी कॉम्प्युटर वर एका वेळेस खूप जन काम करू शकतात. याचा मुख्यतः उपयोग छोटी आणि मध्यम स्वरूपाच्या कंपनी करतात.

• मेन फ्रेम कॉम्प्युटर –
                             मेन फ्रेम कॉम्प्युटर हे आकाराने  मोठे असतात.याचा उपयोग मोठी कंपनी मुख्य केंद्रीय कॉम्प्युटर म्हणून करतात.

एकाच नेटवर्क मध्ये खूप कॉम्प्युटर एका सोबत जोडून एकाच वेळी शेकडो युजर्स त्याचा वापर करू शकतात.

मेन फ्रेम कॉम्प्युटर छा उपयोग तेच कंपनी मध्ये होतो कारण त्या ठिकाणी एकाच वेळी जास्त युजर्स काम करत असतात.

• सुपर कॉम्प्युटर –
                        सुपर कॉम्प्युटर हे मायक्रो कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर व मेन फ्रेम कॉम्प्युटर या सर्वांपेक्षा आकाराने खूप मोठे,

जास्त डाटा स्टोअर करण्याची क्षमता आणि सगळ्यात जास्त स्पीड असणारे असतात.यांचा आकार एवढा मोठा असतो की

ते साधारणतः एका रूम मध्ये बसतील एवढ्या आकाराचे असतात. सुपर कॉम्प्युटर चा उपयोग मोठे शास्त्रज्ञ आणि शोध प्रयोगशाळेत केला जातो.

१९९८ मध्ये भारतामधील C-DAC या संस्थेने एक सुपर कॉम्प्युटर बनवला त्याला नाव देण्यात आले ‘ परम – १०००० ‘ याची गणना क्षमता १ खरब गणना प्रती सेकंद एवढी होती.

कॉम्प्युटर्स चे वर्गीकरण.  CLASSIFICATION OF COMPUTERS

कॉम्प्युटर्स ची निर्मिती जरी मोजणी/गणना करण्यासाठी झाली असली, तरी वेगवेगळ्या गरजे नुसार कॉम्प्युटर चे वर्गीकरण करण्यात आले. ते ३ प्रकारच्या कॉम्प्युटर्स मध्ये

कॉम्प्युटर चे वर्गीकरण

१) अनालोग कॉम्प्युटर
२) डिजिटल कॉम्प्युटर
३) हायब्रीड कॉम्प्युटर
  • अनालोग कॉम्प्युटर –
                                  Analog कॉम्प्युटर्स ची निर्मिती दाब, लांबी, गती, तापमान, ई. मोजण्यासाठी करण्यात आली आहे.

अजून सांगायचं झाला तर हवामान विभागात याचा वापर होतो. हवेचा दाब, वातावरणातील आर्द्रता, पावसाचे प्रमाण, ही सर्व माहिती अनालोग कॉम्प्युटर मुळेच आपल्या पर्यंत पोहोचते.

  • डिजिटल कॉम्प्युटर –
                                   Digital computer  aplya सर्वांच्याच परिचयाचे आहेत. जे आपण घरामध्ये वापरतो ते डिजिटल कॉम्प्युटर असतात.

हे बाजारात ही सहज उपलब्ध होतात. कार्यालय, शाळा, उद्योग, दुकान, हॉस्पिटल, हॉटेल्स, भरपूर ठिकाणी हाच कॉम्प्युटर वापरतात.

  • हायब्रीड कॉम्प्युटर –
                                 हा अनलोग कॉम्प्युटर + डिजिटल कॉम्प्युटर या दोन्हींचे गुण असतात. जे काम ते दोन्ही मिळून करू शकतात तेच काम हायब्रीड कॉम्प्युटर एकटा करतो.

म्हणून हायब्रीड कॉम्प्युटर या दोन्ही कॉम्प्युटर पेक्षा विश्वासपात्र असतो. हवामान, treatment करण्यासाठी या प्रकारच्या कॉम्प्युटर चा उपयोग प्रामुख्याने केला जातो.

आपल्याला आम्ही दिलेली कॉम्प्युटर चे प्रकार. Types Of Computer in Marathi. या विषयीची माहिती आवडली असेल अशी अशा करतो आणि अश्याच नाव-नवीन माहिती साठी माझी माहिती या वेबसाइट ला पुन्हा भेट द्या

majhimahiti.com

!! धन्यवाद !!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top