कॉम्प्युटर म्हणजे काय ? WHAT IS COMPUTER ?

प्राचीन युगांपासून मानवाच्या 3 मूलभूत गरजा होत्या ‘ रोटी, कपडा और मकान ‘ पण 21व्या शतकात त्यात अजून एका वस्तूची भर पडली आहे, आणि ती म्हणजे ‘ कॉम्प्युटर्स ‘.कॉम्प्युटर्स शिवाय सध्याच्या काळात जगणे म्हणजे ‘ जल बिन मचली ‘ असा म्हंटला तरी वावग ठरणार नाही. तर आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर म्हणजे काय ? WHAT IS COMPUTER ?

असा एकही ठिकाण सापडणार नाही की जेथे कॉम्प्युटर चा वापर होत नाही. नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे, हॉटेल्स, मॉल्स, शाळा, कॉलेजेस, बँका,

प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटर ने मानवाची जागा घेतली आहे. कारण याच्या शिवाय अगोदर जे काम काही तास घ्यायचे तेच काम आता काहीच सेकंदात पूर्ण होते.

कॉम्प्युटर म्हणजे काय ? WHAT IS COMPUTER ?

 आपण प्रत्येकाने शाळेत असताना कॉम्प्युटर्स  शाप की वरदान या विषयावर निबंध नक्कीच लिहिला आहे. कॉम्प्युटर्स मानव जातीला वरदान म्हणूनच

लाभला आहे पण खूप थोडे तोटेही झाले ते आपण पुढे पाहूया. त्यापूर्वी आपण कॉम्प्युटर्स ची निर्मिती कशी झाली ते पाहूया.

कॉम्प्युटर चे मुख्य ३ काम आहेत

COMPUTER हा  शब्द लॅटिन भाषेतील ‘ COMPUT ‘ या शब्दापासून घेतला असून याचा अर्थ गणना/मोजनी (Calculation) करणे होय.

majhimahiti.com
संगणक कसे काम करते ?
  • इनपुट
  • प्रोसेसींग
  • आऊटपुट

१). इनपुट –  समजा आपण एखादा प्रश्न डाटा च्या स्वरूपात कॉम्प्युटर ला दिला तर त्याला इनपुट म्हणतात.

२). प्रोसेसिंग – आपण दिलेला डाटा इनपुट वर कॉम्प्युटर जे काम करत असते त्याला प्रोकेसिंग म्हणतात.

३). आऊटपुट – शेवटी  प्रोसेसिंग होऊन डाटाच्या स्वरूपातील जे उत्तर आपल्याला मिळेल त्याला आऊटपुट म्हणतात.

कॉम्प्युटर चा शोध कोणी लावला ?

मॉडर्न कॉम्प्युटर चा जनक म्हणून ‘ चार्ल्स बॅबेज ‘ यांना ओळखला जात. कारण त्यांनीच पहिल्यांदा मेकॅनिकल कॉम्प्युटर ला डिझाईन केला होता.

त्यांचा जन्म लंडन मध्ये झाला होता.

   आज आपण कॉम्प्युटर चा उपयोग भरपूर गोष्टीसाठी करतो जसे की, शिक्षणासाठी इंटरनेटचा वापर, व्हिडिओ पाहणे, गाणे ऐकणे, फोटोज् एडिट करणे, गेम खेळणे, पेंटींग करणे, ई. कॉम्प्युटर चा वापर प्रत्येक क्षेत्रात होतोय असं म्हणायला हरकत नाही. आपण घर बसल्या जगातील कुटल्याही प्रकारची माहिती गोळा करू शकतो, एका मेकांना लाईव्ह व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे समोरा समोर चाट करू शकतो, मोठी मोठी बँका कॉम्प्युटर च्याच मूळे एवढी मोठी उलाढाल करू शकतात, फिल्म्स बनवण्या पासून ते पाहण्या पर्यंत सर्व गोष्टी याच्याच मूळे शक्य झाल्या, आता तर नवीन गाड्या सुद्धा कॉम्प्युटर वर काय प्रॉब्लेम आहे हे पाहूनच दुरुस्त होतात,


मानवाला सुरुवातीपासूनच मोजणी किंवा गणना अवघडच जाते म्हणूनच मूलतः कॉम्प्युटर ची निर्मिती झाली.

सुरुवातीचे काही कॉम्प्युटर चे नाव आपण पाहूया

* अबेकास
• अंतिक्याथेरा
• पस्कलाइन
• difference engine
• zuse z ३
• ENIAC
• SSEM

कॉम्प्युटर्स ची विशेषता काय आहे ?

जरी कॉम्प्युटर ची निर्मिती मोजणी करण्यासाठी केली गेली असती तरी त्या व्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी कॉम्प्युटर वर होतात तेच आपण आता पुढे पाहणार आहोत.

 स्पीड – स्पीड हे कॉम्प्युटर ची एक मुख्य विशेषता आहे कारण कितीही मोठी calculations एका सेकंदात करण्याच्या गती त्याला आहे.

हजारो फाईल्स, अनेक प्रकारचा डाटा काहीच मिनिटात ट्रान्स्फर होतो यालाच कॉम्प्युटर ची स्पीड म्हणायचं. ही स्पीड RAM (Random Access Memory)

mule शक्य होते जेवढी मोठी ram chi क्षमता तेवढी कॉम्प्युटर ची स्पीड जास्त.

• अचूकता – प्रत्येक कामात अचूकता ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. पण आज पर्यंत असा एक ही उदाहरण ऐकायला आले नाही की

कॉम्प्युटर ची एखादी calculation किंवा मोजणी चुकली म्हणून. कॉम्प्युटर जर एखाद उत्तर (आऊटपुट) चुकीचं दाखवत असेल तर

ते नक्कीच त्या प्रोग्राम मधे चूक आहे जे मानवाने तयार केलं आहे.

• स्वयंचलन – स्वयंचलन (ऑटोमेशन) हे खूप उपयोगी पर्याय आहे. यामुळे खूप वेळ वाचतो, जसे एखादा टास्क पूर्ण होण्यासाठी कॉम्प्युटर

स्क्रीन कड बघत बसण्याची गरज नाहीये. ते आपोआप पूर्ण होत.
उदा. जेव्हा कॉम्प्युटर  वरून प्रिंटर 🖨️ ला २०० प्रिंट करण्यासाठी कमांड दिली तर त्यासाठी आपल्याला त्याकड लक्ष लाऊन बसण्याची

गरज नाहीये त्या प्रिंट आपोआप पूर्ण होतात.

Computer storage म्हणजे काय ?

• स्टोरेज – कितीही जुन्या फाईल्स आपण कॉम्प्युटर वर पाहू शकतो त्यांचा वापर करू शकतो ते शक्य होत स्टोरेज मूळ. जेवढं मोठ स्टोरेज

capacity तेवढं माहिती डाटा च्य स्वरूपात साठवण्याची क्षमता जास्त.
कॉम्प्युटर मध्ये ज्या ठिकाणी आपण माहिती, डाटा, फाईल्स स्टोअर करतो त्याला ROM म्हणतात.Rom (Read Only Memory)

1 बिट (bit) = 0, 1 

4 बिट (bit) =  1 निब्‍बल 

8‍ बिट = 1 बाइट्स (Byte)

1000 बाइट्स (Byte) = एक किलोबाइट (KB)

1O24 किलोबाइट (KB) = एक मेगाबाइट (MB)

1024 मेगाबाइट (MB) = एक गीगाबाइट (GB)

1O24 गीगाबाइट (GB) = एक टेराबाइट (TB)

1024 टेराबाइट (TB) = एक पेंटाइट (PB)

1O24 पेडाबाइट (PB) = एक एक्साबाइट (EB)

1024 एक्साबाइट (EB) = एक ज़ेटबाइट (ZB)

Rom शिवाय external hard disc, disc, 💾 floppy disc, cd rom  यामध्ये डाटा स्टोअर केला जातो.

• विविधता –  कॉम्प्युटर वर एकाच वेळी अनेक प्रकारचे टास्क आपण रन करू शकतो. हा खूप उपयोगी पर्याय आहे सर्वांसाठी.
उदा. आपण जर कॉम्प्युटर वर पेंटींग करत असू तर आपण गाणे ऐकू शकतो, फाईल्स ट्रान्स्फर करू शकतो, त्याच वेळी मित्रांशी

चाट  पण करू शकतो.

• गोपनीयता – कॉम्प्युटर हे आपली माहिती गोपनीय ठेवते. जर आपण कॉम्प्युटर ला पासवर्ड असेल तर त्यातील फाईल्स,

डाटा फक्त तोच पाहू शकतो ज्याने तो पासवर्ड टाकला आहे, तो टाकल्या शिवाय कोणीही आपला कॉम्प्युटर हाताळू शकत नाही.
म्हणून तर बँका सुद्धा सर्व व्यवहारांची माहिती कॉम्प्युटरचा सहाय्याने स्टोअर करतात.

Computer चा फुल फॉर्म ?

Full Form of COMPUTER

C - Commonly
O - Operated
M - Machine
P - Particularly
U - Used for
T - Technical and
E - Educational
R - Research
कॉम्प्युटर चे भाग कोणते ?

कॉम्प्युटर  हा विविध साधनांपासून बनलेला असतो. कॉम्प्युटर तयार होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण सविस्तर रूपात पाहूया. 
मॉनिटर – लहानपणी  मॉनिटर हाच कॉम्प्युटर चा  सर्वात महत्वाचा भाग असेल असे आपल्या सर्वाना वाटायचे परंतु तसे नसून मॉनिटरचे एकमेव

काम म्हणजे प्रोसेसर नि दिलेला आउटपुट आपल्याला दाखवणे म्हणजेच जे काही क्रिया होतेय ती चित्र रूपात दाखवण्याचं काम हे मॉनिटर चा असतो.

म्हणूनच तर मॉनिटर हा आउटपुट DEVICE  आहे.

CPU – CPU (Central  Processing  Unit ) हा कॉम्युटर च डोकं  असत असा म्हंटलं तरी चालेल, कारण जेवढ्या काही घडामोडी कॉम्प्युटर मध्ये

घडत असतात त्या CPU मधूनच होतात. तर मग आता आपल्याला   प्रश्न पडतो कि, 


CPU मध्ये काय असेल बर ? ते आपण पुढे पाहूया 

MOTHERBOARD – MOTHERBOARD हा CPU चा आत्मा असतो. कारण हा मुख्य  सर्किट बोर्ड असतो.  म्हणजे हा दिसायला जरी

पातळ प्लेट सारखा दिसत असला तरी cpu मधील प्रत्येक भाग हा motherbord शी डिरेक्टली किंवा इंडिरेक्टली जोडलेला असतो.

जसे मेमरी स्टोरेज, हार्ड ड्राईव्ह, ऑप्टिकल ड्राईव्ह, expansion कार्ड. ई. 

प्रोसेसर

प्रोसेसर हा MOTHERBOARD शी  असतो, कॉम्पुटर वर काय प्रोसेस चालूय याच्यावर देखरेख ठेवण्याचं काम प्रोसेसर करत असा म्हंटलं तरी चालेल.

जेवढा जास्त प्रोसेसर मोठं तेवढं त्या कॉम्प्युटर  ची स्पीड जास्त आणि कार्य करण्याची क्षमता मोठी आणि जलद. 
RAM – RAM (Random  Access  Memory ) हि  सिस्टिम ची  शॉर्ट टर्म मेमरी असते. जेव्हा पण कधी कॉम्प्युटर काही टास्क पूर्ण करतो तेव्हा काही

काळासाठी RAM तो इन्फॉर्मशन स्टोर करून ठेवतो, कॉम्पुटर बंद झाले कि RAM हि माहिती पुसून टाकते. म्हणून कॉम्प्युटर  वर काही काम करत असाल तर

मधून मधून फाईल सेव  करत जावे.  म्हणजे ती ऑटोमॅटिक पुसल्या जाणार नाही. 
हार्ड ड्राईव्ह – हार्ड ड्राईव्ह चा उपयोग आपल्या कॉम्प्युटर मधील सॉफ्टवेअर,फाइल्स आणि डेटा स्टोरे करण्या साठी केला जातो. एकदा सेव केलेला डेटा

खूप काळासाठी स्टोर होतो. 

EXPANSION कार्ड

 EXPANSION कार्ड – सगळ्याच कॉम्पुटर वर EXPANSION स्लॉट्स असतात कारण भविष्यात याची गरज भासू शकते म्हणून ते दिलेले असतात.उदा. 

साऊंड कार्ड विडिओ कार्ड ब्लूटूथ कार्ड नेटवर्क कार्ड   
पॉवर सप्लाय युनिट – पॉवर सप्लाय युनिट हेही CPU मध्ये  खूप म्हणत्वाची भूमिका बजावते. मेन पॉवर सप्लाय  मधून पॉवर घेऊन ती गरजे 

नुसार सगळी कडे सप्लाय करणे.
हि झाली CPU मध्ये काय होत याविषयी, याव्यतिरिक्त अजून कॉम्प्युटर  तयार होण्यासाठी लागणारे साधन आपण पाहुयात 
कीबोर्ड – कीबोर्ड हा एक इनपुट DEVICE आहे, म्हणजे ज्यातून कॉम्प्युटर  ला कमांड दिली जाते अस उपकरण. किबोर्ड चा उपयोग खास करून

टाईप करण्यासाठी होतो आणि गेम खेळण्यासाठी सुद्धा होतो. अगोदर फक्त वायर वाला कीबोर्ड बाजारात मिळत असत, पण आता

वायफाय च्या साहाय्याने चालणारा बिनतारी कीबोर्ड उपलब्ध आहे. 

माऊस – माऊस म्हणजे उंदीर, अगदी शोभेल असाच नाव याला दिलाय कारण तो सारखा इकडून तिकडे पळतच असतो.

पण माऊस मुले काम करायला खूप सहजता येते. माऊस मध्ये खालच्या बाजुला ट्रॅक बॉल असतो. माऊस चा ट्रॅक बॉल  जसा फिरेल

त्याच प्रकारे स्क्रीन वरचा कर्सर फिरत असतो.माऊस सुद्धा आता बिनतारी आलाय वायफाय वर चालणारा, माऊस इनपुट DEVICE आहे.   

प्रिंटर – प्रिंटर हा आउटपुट DEVICE आहे. कारण यातून प्रिंट बाहेर पडतात. प्रिंटर मुळे पेजेस छापणे शक्य झाले, फक्त एका कमांड वर शेकडो प्रिंट

छापून बाहेर पडतात. या आणि अश्या बऱ्याच गोष्टीं मुळे तर मानवाला कॉम्प्युटर  ची प्रत्येक कामात गरज आहे.  

आम्ही आशा करतो की COMPUTER विषयी आम्ही जेवढी माहिती आपल्याला दिली आहे ती आपल्याला आवडली असेल, प्रत्येक Article विषयी आमची हीच इच्छा आहे की आम्ही दिलेल्या माहितीने आपण संतुष्ट व्हाल व आपणास अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती देणे हाच आमचा नेहमीच मनापासून प्रयत्न राहील.

majhimahiti.com

!! धन्यवाद !!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top