What is computer in marathi संगणकाची माहिती

Share with 👇 Friends.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला विचारले जाते की तुम्हाला संगणक माहित आहे का? तेव्हा आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच जन या प्रश्नाचे उत्तर देतील की होय मला संगणक माहित आहे. पण जेव्हा त्यांना कॉम्प्युटरच्या बेसिक नॉलेजबद्दल विचारले जाते तेव्हा ते अनेकदा गप्प बसतात. त्यासाठीच आम्ही घेऊन आलोय संगणकाची सर्वसाधारण माहिती. What is computer in marathi

What is computer in marathi

COMPUTER हा शब्द लॅटिन भाषेतील ‘ COMPUT ‘ या शब्दापासून घेतला असून याचा अर्थ गणना/मोजनी (Calculation) करणे होय.

होय हे अगदी खरे आहे की आज संगणक अनेकांना येतो पण कॉम्प्युटर fundamentals फार कमी लोक लक्षात ठेवतात. ही माहिती अशी आहे की ती जाणून घेतल्याशिवाय संगणकावर कोणतेही काम होऊ शकत नाही.

म्हणूनच जर तुम्हाला संगणकाचा सखोल अभ्यास करायचा असेल किंवा संगणकावर चांगली पकड हवी असेल तर तुम्हाला संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

या लेखात, आम्ही संगणकाबद्दलचे सर्वसाधारण माहिती अगदी सोप्या शब्दात सांगितली आहे, म्हणून ते नक्कीच पूर्ण वाचा.

Pic Credit : Pixabay

Basic knowledge Of Computer

आज आपण कॉम्प्युटर चा उपयोग भरपूर गोष्टीसाठी करतो जसे की, शिक्षणासाठी इंटरनेटचा वापर, व्हिडिओ पाहणे, गाणे ऐकणे, फोटोज् एडिट करणे, गेम खेळणे, पेंटींग करणे, ई.

कॉम्प्युटर चा वापर प्रत्येक क्षेत्रात होतोय असं म्हणायला हरकत नाही. आपण घर बसल्या जगातील कुटल्याही प्रकारची माहिती गोळा करू शकतो, एका मेकांना लाईव्ह व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे समोरा समोर चाट करू शकतो,

O

मोठी मोठी बँका कॉम्प्युटर च्याच मूळे एवढी मोठी उलाढाल करू शकतात, फिल्म्स बनवण्या पासून ते पाहण्या पर्यंत सर्व गोष्टी याच्याच मूळे शक्य झाल्या, आता तर नवीन गाड्या सुद्धा कॉम्प्युटर वर काय प्रॉब्लेम आहे हे पाहूनच दुरुस्त होतात

 • कॉम्प्युटरचे पूर्ण नाव

संगणक COMPUTER हा शब्द 8 अक्षरांनी मिळून बनलेला आहे.

C - Commanly
O - Operated
M - Machine
P - Particularly
U - Used for
T - Technical &
E - Educational
R - Research

संगणक काम कसं करत ?

१). इनपुट – समजा आपण एखादा प्रश्न डाटा च्या स्वरूपात कॉम्प्युटर ला दिला तर त्याला इनपुट म्हणतात.

२). प्रोसेसिंग – आपण दिलेला डाटा इनपुट वर कॉम्प्युटर जे काम करत असते त्याला प्रोकेसिंग म्हणतात.

३). आऊटपुट – शेवटी प्रोसेसिंग होऊन डाटाच्या स्वरूपातील जे उत्तर आपल्याला मिळेल त्याला आऊटपुट म्हणतात.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर

 • हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही उपकरणांच्या मदतीने कार्य करतो. हार्डवेअर हा संगणकाचा भाग आहे ज्याला आपण प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो.
 • ज्याच्या मदतीने संगणकाला माहिती व डेटा देता येतो. CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा कोणत्याही हार्डवेअरचा सर्वात महत्त्वाचा भाग अस
 • सॉफ्टवेअर हा संगणकाचा भौतिक भाग नाही, परंतु हार्ड डिस्क, सीडी, पेन ड्राइव्ह, रॉम यासारख्या इतर भौतिक माध्यमांमध्ये सॉफ्टवेअर सहजपणे संग्रहित केले जाऊ शकते.
 • सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा प्रोग्राम आणि सूचना ज्याच्या मदतीने संगणकाचे हार्डवेअर कार्य करते. What is computer in marathi

किती प्रकारचे सॉफ्टवेअर असतात ?

आपण सर्वजण ज्या संगणकाचा वापर करतो त्यामध्ये जे सॉफ्टवेअर असतात ते दोन प्रकारचे असतात.

 • System software
 • Applications software

सिस्टम सॉफ्टवेअर – सिस्टम सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर आहे, ज्याच्या मदतीने संगणकाची एकूण कार्यक्षमता आणि ऑपरेशन नियंत्रित केले जाते.

सिस्टम सॉफ्टवेअरचे 4 प्रकार आहेत.

 1. Operating System
 2. Device Drivers
 3. Language Processor
 4. Utility Software

ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर – ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर आहेत. ज्याच्या मदतीने विशेष कार्ये केली जातात.

ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये एमएस वर्ड, एमएस एक्सेल, एमएस पॉवर पॉइंट इ.

OS काय आहे ?

ऑपरेटिंग सिस्टम ही एक प्रणाली आहे जी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये समन्वय साधते. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर फक्त ऑपरेटिंग सिस्टीममुळे योग्य प्रकारे काम करतात.

ऑपरेटिंग सिस्टीम दोन प्रकारची असते.

 • GUI
 • CUI

GUI – GUI चे पूर्ण नाव ग्राफिकल यूजर इंटरफेस आहे. हे संगणकाच्या ग्राफिक प्रणालीचा संदर्भ देते.

CUI – CUI चे पूर्ण नाव कॅरेक्टर यूजर इंटरफेस आहे. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये कोणतेही काम करण्यासाठी कमांड द्याव्या लागतात.

कॉम्प्युटर चा शोध कोणी लावला ?

Pic Credit : Google

मॉडर्न कॉम्प्युटर चा जनक म्हणून ‘ चार्ल्स बॅबेज ‘ यांना ओळखला जात. कारण त्यांनीच पहिल्यांदा मेकॅनिकल कॉम्प्युटर ला डिझाईन केला होता.

1822 मध्ये चार्ल्स बॅबेजने “डिफरेंशियल इंजिन” नावाच्या यांत्रिक संगणकाचा शोध लावला. त्यांचा जन्म लंडन मध्ये झाला होता.

कॉम्प्युटर चे किती भाग असतात ?

संगणकाच्या वेगवेगळ्या भागांमुळे संगणक कोणतेही काम व्यवस्थित पूर्ण करतो. संगणकाचे चार महत्त्वाचे भाग असतात.

इनपुट उपकरणे – इनपुट उपकरणे ही अशी उपकरणे आहेत ज्यांच्या मदतीने संगणकात डेटा आणि माहिती समाविष्ट केली जाते. इनपुट उपकरणामध्ये मॉनिटर, कीबोर्ड, माउस, कॅमेरा इ.

प्रोसेसिंग डिव्हाईस – प्रोसेसिंग डिव्हाईस ही अशी उपकरणे आहेत ज्यांच्या मदतीने कोणतीही माहिती किंवा डेटा ऍक्सेस केला जातो किंवा त्यावर प्रक्रिया केली जाते. प्रोसेसिंग डिव्हाइसमध्ये CPU, मेमरी आणि मदरबोर्ड समाविष्ट आहे.

आऊटपुट डिव्हाईस – जे उपकरण संगणकाकडून प्रक्रिया केलेला डेटा प्राप्त करून त्याचे दुसऱ्या स्वरूपात रूपांतर करते, त्याला आउटपुट उपकरण म्हणतात. प्रिंटर हे या प्रकारच्या उपकरणाचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

स्टोरेज उपकरणे – ही अशी उपकरणे आहेत ज्यात प्रक्रिया केलेला डेटा आणि माहिती संगणकात संग्रहित केली जाते. अशा उपकरणाला स्टोरेज डिव्हाइस म्हणतात. या उपकरणात यूएसबी, पेन ड्राइव्ह, मेमरी कार्ड, एक्सटर्नल ड्राइव्ह इत्यादींचा समावेश आहे.

यूट्यूब वर Kitchen Irani या चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

कॉम्प्युटर्स ची विशेषता काय आहे ?

जरी कॉम्प्युटर ची निर्मिती मोजणी करण्यासाठी केली गेली असती तरी त्या व्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी कॉम्प्युटर वर होतात तेच आपण आता पुढे पाहणार आहोत.

• स्पीड – स्पीड हे कॉम्प्युटर ची एक मुख्य विशेषता आहे कारण कितीही मोठी calculations एका सेकंदात करण्याच्या गती त्याला आहे.

हजारो फाईल्स, अनेक प्रकारचा डाटा काहीच मिनिटात ट्रान्स्फर होतो यालाच कॉम्प्युटर ची स्पीड म्हणायचं. ही स्पीड RAM (Random Access Memory)

ही स्पीड RAM (Random Access Memory) मुळे शक्य होते. जेवढी मोठी ram ची क्षमता तेवढी संगणकाची ची स्पीड जास्त.

• अचूकता – प्रत्येक कामात अचूकता ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. पण आज पर्यंत असा एक ही उदाहरण ऐकायला आले नाही की

कॉम्प्युटर ची एखादी calculation किंवा मोजणी चुकली म्हणून. कॉम्प्युटर जर एखाद उत्तर (आऊटपुट) चुकीचं दाखवत असेल तर,

ते नक्कीच त्या प्रोग्राम मधे चूक आहे जे मानवाने तयार केलं आहे.

• स्वयंचलन – स्वयंचलन (ऑटोमेशन) हे खूप उपयोगी पर्याय आहे. यामुळे खूप वेळ वाचतो,

जसे एखादा टास्क पूर्ण होण्यासाठी कॉम्प्युटर स्क्रीन कड बघत बसण्याची गरज नाहीये. ते आपोआप पूर्ण होत.

उदा. जेव्हा कॉम्प्युटर वरून प्रिंटर २०० प्रिंट करण्यासाठी कमांड दिली तर त्यासाठी आपल्याला त्याकड लक्ष लाऊन बसण्याचीगरज नाहीये त्या प्रिंट आपोआप पूर्ण होतात.

संगणकाविषयी सर्वसाधारणपणे विचारले जाणारे प्रश्न

संगणकाचे जनक कोण ?

मॉडर्न कॉम्प्युटर चा जनक म्हणून ‘ चार्ल्स बॅबेज ‘ यांना ओळखला जात.

संगणकाची वैशिष्टे

 • गती
 • स्मृती
 • पुनरावृत्ती क्षमता
 • पुनः प्रसारण
 • अचूकता
 • अष्टपैलुत्व

● संगणकाची उपयोग

सध्याच्या आधुनक युगातील जवळपास सर्वच क्षेत्रातील सर्वच कामे ही संगणकावर अवलंबून आहेत. त्यापैकीच काही खाली दिली आहेत.

चित्र काढणे
चित्र रंगविणे
नकाशे तयार करणे
आलेख तयार करणे
हिशेब ठेवणे
संदेशवहन करणे
पत्र लेखन
बँक व्यवहार
गप्पागोष्टी करणे
मनोरंजन
तुलना करणे
गणना करणे
वेबसाईट बनवणे, 

What is computer in marathi संगणकाची माहिती विषयी माहिती आवडली असल्यास मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि comment करायला विसरू नका.


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Musheer Khan यांच्याबद्दल ५ इंटरेस्टिंग माहिती. नक्की वाचा Joe Root बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? Apple लॅपटॉप बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? नक्की पहा Article 370 Movie Information Hair Care Tips | केसांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल काही टिप्स GPT Healthcare IPO Information | जीपीटी हेल्थकेयर आईपीओ बद्दल माहिती Ameen Sayani Information | अमीन सयानी यांच्याबद्दल माहिती Indoor Games For Kids | लहान मुलांसाठी घरी बसून खेळ्यासाठीचे खेळ Benefits of drinking lemon water | लिंबू पाणी पिण्याचे फायदे Rituraj Singh Death | टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन