क्रिकेटचा इतिहास / Cricket history in marathi

Share with 👇 Friends.

आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत क्रिकेटचा इतिहास / Cricket history in marathi.

मित्रांनो, आपल्या सर्वांना क्रिकेट खेळाबद्दल माहिती आहेच परंतु क्रिकेट चा इतिहास काय आहे,

या खेळाची सुरुवात कशी झाली, कुठे झाली या सर्व गोष्टी आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Cricket history in marathi

तुमच्यापैकी बरेच जण अजूनही क्रिकेट खेळत असतील. हा खेळ जगभर खेळला जातो पण दक्षिण आशियात तो कमालीचा लोकप्रिय आहे.

क्रिकेट हा भारतातील लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलनंतर क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो.

गुगलवर क्रिकेटच्या इतिहासाबद्दल सर्च करून तुम्ही हि पोस्ट क्रिकेट चा इतिहास वाचत असाल,

तर तुम्हाला क्रिकेटबद्दल जाणून घेण्याची नक्कीच आवड आहे असे म्हणायला हरकत नाही.

क्रिकेट चा इतिहास

क्रिकेटचा इतिहास रंजकतेने भरलेला आहे. हा खेळ 16 व्या शतकात अस्तित्वात आला.

तेव्हा पण या खेळाला ‘क्रिकेट’च म्हटले जायचे. सुरुवातीला लोकरीचे गोळे बनवून लाकडी दांडक्यांवर पैज लावून हा खेळ केला जात असे.

या खेळाचे जन्मस्थान ग्रेट ब्रिटन मानले जाते. इंग्रज लोक छंद म्हणून क्रिकेट खेळायचे

क्रिकेट खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली ?
क्रिकेट खेळाची सुरुवात ग्रेट ब्रिटन या देशात झाली.

या खेळाच्या लोकप्रियतेमागे ग्रेट ब्रिटनच्या वसाहती देशांचा हात असल्याचे मानले जाते.

ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखालील जगातील भरपूर देशात हा खेळ अधिक लोकप्रिय झाला.

यूकेच्या बाहेर, हा खेळ उत्तर अमेरिका, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये पटकन प्रसिद्ध झाला.

1990 मध्ये, “इम्पीरियल क्रिकेट कॉन्फरन्स” नावाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाची स्थापना करण्यात आली. 1981 मध्ये, या क्रिकेट संस्थेचे नाव बदलून “इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल” (ICC) करण्यात आले.

आयसीसी चे पूर्ण नाव काय आहे ?
इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल

या संस्थेच्या अधिपत्याखाली जागतिक क्रिकेट खेळले जाते. पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना 1844 साली कॅनडा आणि अमेरिका यांच्यात खेळला गेला.

पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना व्हर्जिनियाच्या ब्रिटिश कॉलनीत खेळला गेला. क्रिकेट खेळल्याचा लिखित उल्लेख १८ व्या शतकातील आहे.

पहिला आंतरराष्ट्रीय सामना कोणत्या २ देशांतर्गत झाला ?
कॅनडा आणि अमेरिका

भारतीय क्रिकेट चा इतिहास

क्रिकेट हा खेळ भारतात इंग्रजांनी आणला. भारतही त्यावेळी इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता.

बडोद्याजवळील ईस्ट इंडिया कंपनीच्या नाविकांनी १७२१ साली भारतात प्रथम क्रिकेट खेळले होते. हळूहळू हा खेळ भारतभर लोकप्रिय झाला.

भारत, पाकिस्तान, बांगलादेशात क्रिकेट इतके लोकप्रिय होण्याचे कारणही ब्रिटिश राजवट होते.

क्रिकेट क्लब भारतातही सुरू झाला आणि लवकरच 1864 मध्ये चेन्नई येथे प्रथम श्रेणी कसोटी सामना खेळला गेला.

मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहित नसेल की भारताच्या पहिल्या क्रिकेटपटूचे नाव काय होते? दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल.

यूट्यूब वर Kitchen Irani या चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 

ज्या व्यक्तीच्या नावावर रणजी ट्रॉफी खेळली जाते त्यांचे नाव रणजित सिंग होते. रणजीत सिंग हे भारताचे पहिले क्रिकेटपटू होते.

रणजीत सिंग यांनी 1896 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडकडून पहिला सामना खेळला होता.

एक संघ म्हणून भारताने पहिला सामना सी.के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध खेळला. मात्र भारताने हा सामना गमावला.

भारताला स्वातंत्र्यानंतर पहिला विजय 1952 मध्ये इंग्लंडविरुद्ध मिळाला होता. भारतात हळूहळू क्रिकेट लोकप्रिय झाले.

सुनील गावस्कर, कपिल देव असे दिग्गज क्रिकेटपटू होते, ज्यांनी भारताला विजयाची चव चाखायला सुरुवात केली.

क्रिकेट मध्ये भारताचे योगदान

1983 साली भारताने सलग दोन वेळा विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. या मोठ्या विजयानंतर भारतात क्रिकेटचे वेड लागले.

भारताने पहिला विश्वचषक कोणत्या सली जिंकला ? 
१९८३ 

भारतात सर्वत्र क्रिकेट लोकप्रिय झाले. रस्त्यावर क्रिकेट खेळले जाऊ लागले. भारतात क्रिकेट बीसीसीआयच्या अधिपत्याखाली खेळले जाते.

क्रिकेटला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे श्रेय क्रिकेटचा देव मानले जाणारे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना जाते.

सचिन तेंडुलकर सोबत राहुल द्रविड आणि सौरव गांगुली सारखे दिग्गज क्रिकेटपटू होते ज्यांनी भारताच्या क्रिकेट संघाला शिखरावर नेले.

भारताने 2011 चा विश्वचषकही जिंकला होता. भारतीय भूमीवर हा विश्वचषक जिंकण्याचे श्रेय भारतीय संघाचे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना जाते.

BCCI चे पूर्ण रूप काय आहे ?
बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया.

धोनी भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे सिद्ध झाले आहे.

सध्या रोहित शर्मा हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार आहेत.

दोन वेळा विश्वचषक जिंकण्याबरोबरच भारताने टी-२० विश्वचषक, एकदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली आहे.

भारतातही देशांतर्गत क्रिकेट खेळले जाते.

दुलीप करंडक, रणजी करंडक, इराणी करंडक, विजय हजारे करंडक यासारख्या प्रमुख स्पर्धा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळल्या जातात.

घरच्या सामन्यांना प्रथम श्रेणी सामने देखील म्हणतात.

क्रिकेट चा इतिहास / Cricket history in marathi विषयी माहिती आवडली असल्यास मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि comment करायला विसरू नका.

Share with 👇 Friends.

Leave a comment