कार चा आविष्कार कोणी केला ?

Share with 👇 Friends.

मित्रांनो, सध्या कार म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनलेला आहे. प्रत्येकालाच अपेक्षा असते की आपल्याकडे पण एक मोठी कार असावी, आणि चार चाकी वाहन असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. आपत्कालीन परिस्थिती असो किंवा समारंभ कार ही महत्त्वाचीच. मोठी गाडी म्हणजे बहुतेक जणांचा पोटापाण्याचा आधार आहे. परंतु कार चा शोध कसा लागला आणि कारचा इतिहास काय आहे ? हे प्रश्न तुमच्या मनात कधीतरी आलेच असतील. Car invention in marathi

प्राचीन काळापासून विविध प्रकारची वाहने, हालचाली आणि प्रवासासाठी वापरली जात आहेत.

कालांतराने बैलगाडी, घोडागाडी, उंटगाडी, सायकल इत्यादींचा वाहने म्हणून वापर होऊ लागला.पण मोटार कारच्या शोधाने जगच बदलून टाकले होते.

आपल्याकडे अशी म्हण आहे : ज्याच्या घरी चार चाकी गाडी आणि मोठी म्हाडी तोच सावकार गडी.

कार चा आविष्कार कोणी केला ?

Car invention in marathi

कारचा इतिहास खूप मनोरंजक आहे. याचे कारण कारच्या शोधाचा दावा वेळोवेळी अनेकांनी केला आहे.

O

कारच्या शोधात अनेक शास्त्रज्ञांनी योगदान दिले. तसे, जर तुम्ही एका व्यक्तीचे नाव घेतले तर तीन चाकी कार बनवणारे कार्ल बेन्झ हे पहिले होते.

कार्ल बेंझने डेमलर सोबत कार निर्मिती कंपनी सुरू केली. ही जगातील पहिली कार उत्पादक कंपनी होती.

हेन्री फोर्डमुळे सामान्य लोकांना कार खरेदी करणे शक्य झाले. त्यांनी फोर्ड मोटर कंपनी सुरू केली.

Business Ideas in Marathi

फोर्डने मध्यमवर्गीयांसाठी कार लॉन्च केली. आजही हेन्री फोर्डची कंपनी कार बनवते. आत्ता काहीच महिन्यांपूर्वी फोर्ड कंपनीने भारतातील फॅक्टरीज बंद केल्या आहेत.

याशिवाय कारच्या विकासात योगदान देणारे अनेक लोक इतिहासात आहेत.

पेट्रोल इंजिन कारचा शोध अमेरिकन चार्ल्स धुरेया यांनी लावला होता.

पेट्रोलवर धावणारी ही जगातील पहिलीच कार होती. सध्या मोटारगाड्या प्रामुख्याने पेट्रोल आणि डिझेलवर चालतात.

मोबाईल लवकर चार्ज कसा करायचा ? 👈 Click here

परंतु लवकरच EV (इलेक्ट्रॉनिक वेहिकल्स) गाड्या सर्वत्र दिसणार आहेत कारण जगभर EV तंत्रज्ञानावर भरपूर कंपन्या काम करत आहेत.

मोटार कार किंवा तत्सम वाहनाची कल्पना प्रथम प्रसिद्ध चित्रकार लोरणार्डो दा विंसी यांना सुचली होती. जेव्हा त्यांनी मोटार कारची रचना केली तेव्हा ते इसवी 1500 वर्ष होते.

कार चा इतिहास

  • 1769 मध्ये, वाफेवर चालणारे वाहन तयार केले गेले. या वाहनाचा शोध निकोलस जोसेफ नावाच्या व्यक्तीने लावला होता.
  • हे इंजिन खूप कमी पॉवरचे होते, ज्यामुळे ते पादचाऱ्यापेक्षा कमी गतीचे होते, जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला.
  • वाफेच्या इंजिनच्या शोधाने कार किंवा कारच्या निर्मितीचा पाया घातला. वाफेच्या इंजिनच्या मदतीने ट्रेनचा शोध लागला.
  • ऑटोमोबाईलसाठी डिझेल इंजिनचा शोध रुडॉल्फ डिझेल यांनी लावला होता.
  • ऑटोमोबाईल इतिहासावरील चर्चा चाकाच्या शोधाशिवाय अपूर्ण आहे. चाकाच्या शोधाने आधुनिक वाहनाचा पाया घातला.
  • त्याआधी लोक प्रवास करण्यासाठी घोडा, उंट, बैल या प्राण्यांचा वापर करत असत. परंतु चाकाच्या शोधामुळे
  • उंट, बैल आणि घोडा यांना जोडून चाकांच्या गाडीला वाहनाचे स्वरूप दिले गेले.ते प्राचीन काळापासून वापरले जात आहेत.
  • भारतात कारचे आगमन 19व्या शतकात झाले. ब्रिटीश राजवटीत भारतात ऑटोमोबाईल तंत्रज्ञान आले.
  • त्या वेळी ठराविक लोकच कार वापरू शकत होते. सामान्यांसाठी कार खरेदी करणे सोपे नव्हते.
यूट्यूब वर Kitchen Irani व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही नेत्यांचा अॅम्बेसेडर कारचा ट्रेंड होता. कार हे चारचाकी वाहन आहे जे इंधनावर चालते. कारचे इंधन म्हणून पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसचा वापर केला जातो.

आजकाल इलेक्ट्रिक ( चार्जिंग वर चालणाऱ्या ) कारही प्रचलित आहेत. वाहतुकीसाठी मोटारींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

ऑटोमोबाईल चा उगम

ऑटोमोबाईल तंत्रज्ञान आल्यापासून चार चाकी वाहनांची दुनियाच बदलली आहे. सर्व गोष्टी ऑटोमोबाईल मुळे विकसित झाल्या आहेत.

भारतातील प्रमुख कार कंपन्यांमध्ये टाटा, महिंद्रा, टोयोटा, होंडा, मारुती सुझुकी, ह्युंदाई इ.

भारतीय ब्रँड कंपनी टाटा आणि महिंद्रा ने सध्या अख्या जगामध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे. टाटांच्या गाड्यांची मजबुती आणि सुरक्षितता पाहून लोक अवाक आहेत. टाटा अंतर्गत असणारे Jaguar आणि RANGE ROVER या कार कंपनीस नी जगभरात धुमाकूळ घातला आहे.

भारतातील सर्वात आवडती गाडी म्हणून विचारले तर २० पैकी १० जन Mahindra Scorpio च नाव घेतील. आणि त्याबरोबरच बाहेर देशात महिंद्रा कंपनीच्या गाड्यांना ही भरपूर मागणी आहे. कारण महिंद्राच्या गाड्यांची डिझाइन आणि पॉवर आहेच इतकी दिमाखदार.

सध्या भारतातील सर्वात सुरक्षित ( Safest SUV ) गाडी आहे Mahindra XUV 7०० 

जगातील सुप्रसिद्ध कारमध्ये रोल्स रोयास, मर्सिडीज, फेरारी, Lamborghini, BMW, टेस्ला, ऑडी, टोयोटा, होंडा, फोर्ड, Volkswagen पोर्चे इ. चे नाव सर्वात महागड्या कार निर्मात्यांमध्ये येते.

विज्ञानाने मोटार कारला यश मिळवून दिले आहे कारण ते आधी स्वप्नासारखे होते.

आता उच्च इंधन शक्तीमुळे वेगानी वाहन खेचणे शक्य झाले आहे. कारने शहरे आणि गावांमधील अंतर कमी केले आहे.

कार चा शोध कोणी लावला ? विषयी माहिती आवडली असल्यास मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि comment करायला विसरू नका.

Majhimahiti.com

Share with 👇 Friends.

1 thought on “कार चा आविष्कार कोणी केला ?”

Leave a comment