कोजागिरी पौर्णिमाचे महत्व

Share with 👇 Friends.

अश्विन महिन्यातील पौर्णिमाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा आणि नवरात्रीचा सण देखील म्हणतात. Kojagiri pornima che mahatva

सर्वात अगोदर तुम्हाला व तूमच्या परिवारास कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा.

मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद हा दुधाचा, 
विश्वास वाढू द्या नात्यांचा, 
त्यात गोडवा साखरेचा.

तुळस: उपयोग व प्रकार

या कोजागिरी पौर्णिमेला कोकणामध्ये नवानं पोर्णिमा म्हणतात. विजयादशमी नंतर येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. ही पौर्णिमा यावर्षी 8 किंवा 10 तारखेच्या उत्तर रात्री 3 वाजून 47 मिनिटाला सुरू होते.

आणि नऊ तारखेला उत्तर रात्रीला दोन वाजून 24 मिनिटाला संपते. तेवढ्या काळात चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो.

त्यामुळे चंद्राचा प्रकाश खूपच चमचमीत व आकर्षक दिसतो. या पौर्णिमेला चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे चंद्राचा प्रकाश शितल असतो.

कोजागिरी पौर्णिमाचे महत्व

चंद्राच्या या शितल किरणांमुळे मानवाच्या शरीराला आणि सजीव सृष्टीला खूप लाभ होतो.

त्यामुळे चंद्राच्या शीतल प्रकाशात दूध आटवून पितात. चंद्राचे चांदणे पृथ्वीवर जास्त पडणे हे चांदणे शुद्ध व सात्विक असते.

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे कोजागर याचा अर्थ आहे की कोण जागे आहे, कोण जागृत आहे. असे विचारत श्री लक्ष्मी माता पूर्ण विश्वात फिरते.

आपला भारत देश कृषिप्रधान देश आहे. तेव्हा शेतातील कामे अर्ध्यावर झालेली असतात शेतातील पिके वाऱ्यावर डोलत असतात.

पावसाळा संपलेला असतो सगळीकडे कसे हिरवेगार वातावरण डोळ्यांना सुखद अनुभव देतात.

दसरा सणाचे महत्व

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उशिरापर्यंत चंद्राच्या प्रकाशात कुटुंबातील सर्वजण जागरण करतात.

या जागरणाच्या वेळी भजन, गप्पागोष्टी करत, रास गरबा खेळत, गाणे म्हणत अशाप्रकारे जागून दुधात मसाला टाकून व सुकामेवा टाकून,

चंद्राच्या प्रकाशात दूध आटवणे आणि नंतर या दुधाचा देवांना नैवेद्य दाखवायचा व आपण प्राशन करायचा.

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अशा प्रकारे दूध पिल्याचे काही वैज्ञानिक कारणे आहेत.

ते असे पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे शितल प्रकाश अधिक तीव्र असते या प्रकाशात दूध तयार करून पिल्यास आरोग्यदायी फायदे होतात.

दूध पिल्याने अनेक आजारावर किंवा रोगावर मात करता येते. जसे की त्वचारोग, दमा अशा आजारावर उपचार ठरतो.

चंद्राच्या प्रकाशामध्ये अशा काही तत्त्व आहेत,शक्ती आहे त्यामुळे ते किरण मानवाला नव्हे तर पूर्ण सजीव सृष्टीला लाभदायी ठरते.

डोळ्याचा काही त्रास असेल तर चंद्राच्या प्रकाशाकडे डोळ्यांनी पहावं डोळ्यांचा त्रास कमी होईल.

दुधात सुकामेवा घालून पिल्यास मानवाच्या शरीराला पौष्टिक पदार्थ मिळतात आणि दुधात कॅल्शियमलॅक्टिक ऍसिड असते त्यामुळे दूधही आपल्याला पौष्टिकता देते.

खगोल शास्त्रीय दृष्ट्या देखील या दिवसाला फार महत्त्व दिले आहे. कोजागिरी पौर्णिमा ही प्रांत प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.

गुजरात मध्ये रास व गरबा खेळून ‘ शरद पुनम ‘ या नावाने साजरी होते.

हिमाचल प्रदेशात यानिमित्ताने जत्रा भरते बनारस येथे या दिवशी वैष्णव संप्रदायाचे भक्त सोहळा साजरी करतात.

हरियाणा मध्ये दूध उकळून प्यायचे. सांस्कृतिक दृष्ट्या पौर्णिमेचे महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला खगोलीय, धार्मिक, सांस्कृतिक, कृषी संबंधित,

आरोग्य दृष्ट्या तसेच सर्वांनी एकत्रित येऊन कोजागिरी साजरी करत असल्याने नात्यांमध्ये एकोपा निर्माण होतो.

जागरण करणाऱ्या वर प्रसन्न होते त्यामुळे त्यावर लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो म्हणून ही जागरणाची प्रथा आहे.

आख्यायिका

कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका आहे ती अशी. एकदा एक राजा आपली संपूर्ण सत्ता व संपत्ती, वैभव गमावून बसला.

त्याच्या राणीने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एक व्रत केले व तो व्रत श्री महालक्ष्मी मातेचा व्रत होता.

व्रत केल्याने लक्ष्मी माता राणीला प्रसन्न झाली आणि राणीला आशीर्वाद दिला. आणि राजाचे गमावलेले वैभव, संपत्ती सगळे परत मिळाले, तेव्हापासून पौर्णिमेच्या दिवशी व्रत करावे लागते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा समुद्रामध्ये देव आणि दानवाने समुद्रमंथन केले त्यामधून श्री महालक्ष्मी देवी प्रकट झाली.

त्यामुळे असे म्हणतात की, याच पौर्णिमेला लक्ष्मी मातेचा जन्म झाला. पौर्णिमेच्या मध्यरात्री महालक्ष्मी माता चंद्र मंडलातून खाली पृथ्वीवर येते व

चंद्राच्या प्रकाश किरणात अमृताचा कलश घेऊन सगळीकडे असे म्हणत फिरते कोण जागरण करतो म्हणजे आपल्या कर्तुत्वाला कोण जागृत आहे का ?

म्हणूनच तिच्या हाकेला साद देण्यासाठी सर्वांनी जागरण करावे लागते.

फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

देवी लक्ष्मी माता जगातील त्यांना अमृत देते म्हणजे चंद्राचे प्रकाशात द्वारे लक्ष्मीचे वरदान सुख-समृद्धी देते चंद्राचे शीतल चांदणे अंगावर घेतले की मनाला शांती व शक्ती उत्तम आरोग्य मिळते.

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लंकेश्वर लंकापती रावण हा पौर्णिमेच्या चंद्राची किरण आरशाच्या सहाय्याने आपल्या नाभीमध्ये ग्रहण करीत असे.

त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा तारुण्य प्राप्त होत असे पुराणात सांगितले आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाचे किती महत्त्व आहे ते समजते.

Kojagiri pornima che mahatva

पावसाळा संपल्या नंतर येणारी पहिलीच म्हणजे अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा होय याच पौर्णिमेला आरोग्याच्या दृष्टीने आयुर्वेदात अत्यंत महत्त्व मानले जाते.

majhi mahiti

रात्री बारा वाजे नंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले जाते.

आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला ग्रामीण भागात नव्याची पौर्णिमा म्हणतात.

शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहात नव्याच्या पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहतात.Kojagiri pornima che mahatva

कोकणामध्ये भारताच्या लेंबी, नाचणी, वरी, कडूची फुले व झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी बाजारात खूप गर्दी होते.

धाडसी हिरकणी याच दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चांदण्याच्या प्रकाशाचा आधार घेऊन तान्ह्या बाळाच्या ओढीने, काळजीने

रायगड किल्ल्याच्या बुरुजावरून अत्यंत अवघड म्हणजे मोठे मोठे दगड, काटेरी झुडपे यांच्यातून ती उतरून घरी गेली.

तिचे हे धाडस पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या बुरुजाला त्याच दिवशी सुवर्णाक्षरांनी हिरकणी बुरुज असे नाव दिले गेले.

मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद हा दुधाचा,
विश्वास वाढू द्या नात्यांचा,
त्यात गोडवा साखरेचा.

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

आजच्या लेखामध्ये कोजागिरी पौर्णिमाचे महत्व या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Kojagiri pornima che mahatva . आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.


Share with 👇 Friends.

Leave a comment