दसरा सणाचे महत्व

दसरा सण मोठा, नाही आनंदाचा तोटा. दसरा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चला तर मग पाहुयात दसरा सणाचे महत्व dasra sanache mahatva

दसरा सणाच्या दिवशी महाराष्ट्रात नवीन घर असेल, नवीन गाडी, नवीन काही अवजार असतील तर त्यांची पूजा करतात.

आपट्याच्या पानांची पूजा करतात, आपट्यांची पाने ही पूजेत ठेवतात. ही पाने सोनं म्हणून किंवा सोन्याचे प्रतीक म्हणून एकमेकांना देतात.

फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

दसरा सणाचे महत्व

भारतामध्ये अनेक सण साजरे होतात. त्यापैकी हा एक सण म्हणजेच दसरा,

दसरा सण भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. दसरा सण दरवर्षी अश्विन महिन्यात येतो.

दसरा सण अत्यंत आनंदात जोशात पूर्ण देशात त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.

आपल्या महाराष्ट्रात दसरा सणाला विजय दशमी, दसरा किंवा नवरात्री म्हणतात.

गुजरात मध्ये या सणाला नऊ दिवस महिला, पुरुष व मुलं रात्रीच्या वेळी दांडिया किंवा गरबा खेळ खेळतात.

कोलकत्ता येथे दुर्गा पुजा केली जाते. रामलीला पाहायला बरेच लोकांची गर्दी होते. तेथे रावणाचे दहन करतात.

दसरा सणाच्या दिवशी कार्यालयांना, शाळांना, कॉलेजला सार्वजनिक सुट्टी असते. दसरा सणाला विजय दशमी असेही म्हणतात.

नऊ दिवस उपवास करायचा, काही भागात कोणी काय काय पाळतात. चप्पल वापरायची नाही,

नऊ दिवस पलंगावर झोपायचे नाही, पलंग उभा करून ठेवतात.
N

देवी म्हणून घट बसवायचे. पूजा आरती करायची, देवी समोर सांस्कृतिक कार्यक्रम करतात.

त्यात भजन, किर्तन, देखावे, काही ठिकाणी गर्भासारखे कार्यक्रम करतात.

या नऊ दिवसात एकमेकांना भेटतात. आणि दहाव्या दिवशी देवीचे विसर्जन करायचे यालाच नवरात्र म्हणतात.

विजयादशमी कशाप्रकारे साजरे करतात हे आपण पाहणार आहोत. भगवान रामाचे वडील यांनी आयोधिशाने विश्वजीत यज्ञ केला होता.

त्या काळापासून म्हणजे त्रेता युगापासून हिंदू लोक विजयादशमी साजरी करतात.

प्राचीन काळापासून क्षत्रिय युद्धाला या दिवसाची निवड करत होते.

त्यांचे म्हणणे होते की, दसरा या दिवशी केलेल्या युद्धामध्ये विजय निश्चित मिळतो.

सिमोल्लघण म्हणजे काय?

गावाच्या सीमेवर जाऊन येणे तेथून येताना आपट्याची पाने घेतात. त्या झाडाची पूजा करतात व घरी येतात.

आपट्याच्या झाडाला शमीचे झाड असेही म्हणतात.

या आपट्याच्या पानाला सोनं असेही म्हणतात. सीमा उल्लंघन करून घरी परत येतात तेव्हा दारात उभे राहतात.

घरातील महिला त्यांच्या पायावर पाणी टाकते, दूध टाकते व ओवाळते.

ओवाळायचे झाल्यानंतर ताटात सोनं टाकतात. जुन्या काळात वेगळं होतं.

दारात येऊन उभा राहिल्यावर पायावर पाणी, दूध घालतात. ओवाळतात आणि मध्ये येऊन बसायला सांगतात.

त्यांचे बसायचे आसन वेगळे असते. कापड टाकून त्यावर गव्हाची चौक तयार करतात. आणि त्यावर बसायला सांगतात.

पुन्हा त्यांच्या समोर तांदळाची बाहुली करतात. आणि बाहुलीच्या पोटात सोनं लपवून ठेवतात.

ओवाळल्यानंतर लपवून ठेवलेलं सोनं काढून ताटात टाकतात. हे झालं जुनं काळातलं सिमोल्लघण.

हा दसरा सण हिंदूचा एक महत्त्वाचा सण आहे. दसरा हा सण दिवाळीच्या अगोदर वीस दिवसांनी येतो. हा सण दहा दिवस व नवरात्रीचा आहे.

सन पवित्र मानला जातो. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते. घर, गाडी, शिक्षण असो वा कोणतेही दुसरे शुभ काम.

पौराणिक कथा

दसऱ्याची पौराणिक कथा आहे रामाचे पिता रघु राजाने मोठा यज्ञ करून संपूर्ण धनसंपत्ती दान केली.

त्याचवेळी वरतंतू नावाच्या ऋषीकडे शिकण्यासाठी कौत्स नावाच्या शिष्याला ऋषीने गुरुदक्षिणा दान करण्यासाठी 14 कोटी सोनाच्या मुद्रा मागितल्या.

म्हणून कौत्सने रघु राजाकडे सुवर्णमुद्राची मागणी केली. कौत्साला देण्यासाठी रघुराजाकडे काहीही शिल्लक नव्हते. तेव्हा त्याला रिकाम्या हाताने पाठवू वाटत नव्हते.

म्हणून रघु राजाने कुबेराकडे जाऊन सुवर्ण मुद्राची मागणी केली. आणि खूप जास्त सुवर्णमुद्रांचा वर्षाव करण्याची मागणी केली.

मुद्रांचा वर्षाव झाला पण तो वर्षाव आपट्याच्या झाडावर झाला. म्हणून तेव्हापासून आपट्याच्या पानांना सोनं असे म्हणतात.

मग कौत्सने पाहिजे तेवढ्या मुद्रा घेतल्या. झाडाला नमस्कार केला व तेथून निघून गेला. झाडाखाली आणखी खूप जास्त मुद्रा पडून होत्या, त्या मुद्रा अयोध्येतील लोकांना रघुराजाने वाटून दिल्या.

तेव्हापासून आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना देतात. सोनं घ्या सोन्यासारखे रहा असे म्हणतात.

दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला. जीवनातील वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टी आचरणात आणल्या.

म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा करून त्याचे दहन करतात. dasra sanache mahatva

आपट्याच्या झाडाजवळून आपट्याची पाने आणताना झाडाखाली अपराजिता देवीची स्थापना करून पूजा करतात.

तिची प्रार्थना करतात, प्रार्थनेत मला विजयी कर असे म्हणतात. त्यानंतर शस्त्राची पूजा करायची.

विद्यार्थ्यांनी वह्या पुस्तकांची व सरस्वती देवीची पूजा करायची.

डॉक्टरांनी त्यांच्या साहित्यांची व धन्वंतरीची पूजा करायची. आपापल्या व्यवसायांवर अवलंबून असते.

साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, अक्षयतृतीया, दसरा व दिवाळीचा पाडवा हे साडेतीन मुहूर्त आहेत.

कुणी शेतकरी असतील तर ते आपले नांगर, खुरप इत्यादी साहित्याची पूजा करतात अशी प्रथा आहे.

दसऱ्याच्या दिवशी दाराला आंब्याची पानाची, झेंडूच्या फुलांची तोरणांची मजा काही वेगळीच असते. दारात रांगोळी घालतात.

परंपरेनुसार देवीला नैवेद्य पुरणपोळीचा किंवा श्रीखंडपुरीचा दाखवतात. dasra sanache mahatva

पांडव जेव्हा अज्ञात वासात ज्यावेळी विराटच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती.

अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली. व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.

म्हणून त्या दिवसाला दसरा म्हणायला लागले व शमीच्या झाडाची पाने सोनं म्हणून एकमेकांना द्यायला लागले.

बाजीराव पेशवे या दिवशी पुढच्या स्वारीचा बेत कायम करीत असे.

शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्साहाला याच दिवशी प्रारंभ केला.

दसरा सणाचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे लोक आपली नवीन खरेदी करतात.

सोनाराच्या दुकानातून सोन खरेदी करतात, नवीन गाडी, नवीन बंगला, काही व्यवसायाच्या अवजारे देखील या मुहूर्तावर खरेदी करतात.

आता आपण पूजा व त्याची मांडणी कशी करायची ते पाहू.dasra sanache mahatva

पुजा


घराचे दार स्वच्छ करून घ्यावे. दाराला आंब्याची पाने किंवा डगळे लावायचे. हे शुभ समजले जाते.

झेंडूच्या फुलांचे तोरण दाराला बांधावे. दारात रांगोळी काढावी. दारात पाऊल काढावी व त्यावर हळद-कुंकू टाकावे.

आता आपण पूजा कशी मांडायची ते पाहू. प्रथम सगळे देव हे एका ताम्हनात काढून घ्यावे.

त्यांना पितांबरीने घासावे व धुवावे. किंवा पंचामृत अथवा दही लावून स्वच्छ धुऊन घ्यावे.

पुसून कोरडे करावे. देवांना हळदी कुंकू लावून घ्यावे. शंख पाणी टाकून देव्हाऱ्यात ठेवावा.

देव पुन्हा देव्हाऱ्यात जागेवर ठेवावे. अक्षता, फुलं वहावे, दिवे लावा, रांगोळी घालावी.

देव्हाऱ्याच्या बाजूला सरस्वतीची म्हणजेच ज्ञानदेवता देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावे. त्यापुढे काय तुमचे महत्त्वाचे पुस्तक असतील म्हणजेच पोथी, पुराण ठेवावे.

हिशोबाच्या वह्या ठेवाव्या. त्यांच्यापुढे रांगोळी घालावी. अगरबत्ती व धूप लावायचे. स्वयंपाक होईपर्यंत देवाला पाणी व दूध दाखवायचे.

देवाला अगरबत्ती आणि अक्षता लावून ओवाळायचे. दिव्याची व घंटेची पूजा करायची.

नवरात्रि : संपूर्ण माहीती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हळदी कुंकू लावा, फुल अक्षता वाहा. व त्यांची पूजा करा.dasra sanache mahatva

आणि त्यांना प्रार्थना करा की आम्हा सगळ्यांना सुखी ठेव देवा म्हणायचे.

पोथी, पुस्तक, वही, पैसे, लोखंडी अवजारे, सोन यांना हळद-कुंकू लावायचे व अक्षता व फुले वहायचे.

व नमस्कार करायचा. म्हणायचे घरात सुख समृद्धी नांदो. सरस्वती देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला हळद – कुंकू, फुल, अक्षता वहायचे.

दिवा लावायचा आणि सोनू द्यायचं. आपल्या घरी दोन चाकी किंवा चार चाकी गाडी असेल किंवा कोणतेही वाहन असेल तर त्यांना स्वच्छ धुऊन झेंडूची हार घालून.

त्यांची हळद कुंकू व फुल अक्षता वाहून पूजा करावी. देवाला पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य द्यायचा.

मग झाली ही पूजा. आता सोनं ही एकमेकांना द्यायचे.

मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा, द्यायचा आहे. लहानांनी मोठ्या माणसांना सोनं देऊन पाया पडायचे म्हणजे आशीर्वाद मागायचा. व मोठ्या माणसांनी लहान माणसांना गोड पदार्थ द्यायचा.

आजच्या लेखामध्ये दसरा सणाचे महत्व आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. dasra sanache mahatva . आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top