shubh navratri in marathi नवरात्रि संपूर्ण माहीती

shubh navratri in marathi

आपल्या भारत देशात अनेक सण साजरे केले जातात त्यापैकी एक सण म्हणजे नवरात्र जो की लवकरच येत आहे. चला तर मग आज पाहूया नवरात्रि : संपूर्ण माहीती.

हा सण भारतातील विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळामध्ये देवीच्या मूर्तीची स्थापना करतात.

shubh navratri in marathi

shubh navratri in marathi

नवरात्रीतील नऊ दिवस सर्वजण मोठ्या श्रद्धेने देवीची पूजा करतात. सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भजन कीर्तन तसेच, अनेक देखाव्याचे आयोजन केले जाते.

हे बघायला अनेक लोक एकत्रित येतात बरेच लोक नऊ दिवस उपवास करतात. देवीचे व्रत पूर्ण करता.

नवरात्रीचे नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या जातात. देवीप्रमाणे सर्व स्त्रिया नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसतात.

नवरात्रीमध्ये सर्वत्र सजावट कार्यक्रम मोठमोठे मंडप पाहायला मिळतात. विविध सार्वजनिक मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

केसगळती थांबवण्याचे उपाय 👈 click here

स्त्रिया, मुले, पुरुष हे सगळे इथे गरबा खेळतात. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. या नऊ दिवस सगळीकडे आनंदी आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.

जास्त प्रमाणात आसाम, कोलकत्ता, गुजरात, बिहारमध्ये या सणाला वेगवेगळे महत्त्व आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणात देवीची पूजा आरती केली जाते.

नवरात्र हा सण का बरे साजरी करतात त्याची पण एक आख्यायिका आहे. ती पुढील प्रमाणे

आख्यायिका

एक ब्राह्मण होता त्यांना एक ‘ सुमती ‘ नावाची सुशील, गुणी मुलगी होती. तिला दुर्गा माता ची पूजा आरती करायला खूप आवडायचे.

ती दररोज माताची पूजा करत असे च एक दिवस सुमती मैत्रिणी सोबत खेळण्यात मग्न झाली आणि त्या दिवशी दुर्गा माता ची पूजा आरती करायची सुमती विसरली.

ते तिच्या वडिलांना आवडले नाही. वडिलांना हे पाहून खूप दुःख झाले. त्यांना ते सहन झाले नाही व त्यांना राग आला.

आणि सुमतीला म्हणाले की आता तुझे लग्न एखाद्या गरीबाशी लावून देतो. तेव्हा सुमती म्हणाली की, “तुमची मर्जी.”

तुम्ही ज्याच्या बरोबर लग्न लावून देशाल त्याच्याबरोबर मी सुखाने संसार करीन. तेव्हा वडिलांनी गरीब आणि कोड आलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिले.

W
https://majhimahiti.com/weight-loss-in-marathi/

मग वडिलांनी सुमतीला म्हणाले, ” आता आपल्या कर्माचे फळ भोग.” तेव्हा सुमतीने उत्तर दिले, ” बाबा जे नशिबात असेल तसे होईल.”

तेव्हा सुमती खूप उदास झाली आणि पतीसोबत सासरी गेली काही दिवसाने दुर्गा माता ला सुमतीची दशा पहावेना.

सुमती समोर येऊन दर्शन दिले आणि म्हणाली,” मुली तुला काय वर्धन मागायचे माग. ” तेव्हा सुमतीला आश्चर्य वाटले पण मातेला विचारले,” माते मी असे काय केले की मला वरदान देत आहे.”

तेव्हा दुर्गा माता ने सांगितले, ” मी आदिशक्ती आहे.त्यामुळे मी वरदान देत आहे कारण तू तुझ्या मागच्या जन्मी काही चांगले कर्म केले आहेस त्यामुळे मी तुला वरदान देत आहे.”

आणि मागच्या जन्माची कहाणी सांगितली,” तू मागच्या जन्मी चोराची पत्नी होती. एक वेळा चोरी करताना तुझा पती पकडला गेला.

राजाने व सैनिकाने पती व पत्नी दोघांनाही पकडून नेले व तुरुंगात टाकले.

तेव्हा तुरुंगात काही दिवस म्हणजे नऊ दिवस तुम्हाला खायला काहीच दिले नाही. तेव्हा,

नवरात्रीचा काळ होता आणि तुझ्याकडून नऊ दिवसाचे उपवास घडले आणि व्रत पूर्ण झाले,आणि मी प्रसन्न झाले म्हणून मी तुला वरदान देत आहे.

सुमतीने वरदान मागितले की

” माझ्या पतीला एकदम ठीक कर, त्यांना ठणठणीत बरं होऊ दे व माझी गरीबी दूर कर.”

आणि देवीने सुमतीचे ऐकले व ‘ तथास्तु ‘ म्हणाली, आशीर्वाद दिला व निघून गेली तेव्हा सुमतीचा पती एकदम चांगला झाला आणि त्याची गरीबी ही गेली ते चांगले श्रीमंत झाले.

आणि तेव्हापासून नवरात्रीत देवीची पूजा आरती करतात. आणि देवीने राक्षस महिषासुराचा वध केला.

म्हणून या देवीला महिषासुरमर्दींनी म्हणतात.

नऊ दिवसानंतर दहाव्या दिवशी देवीचे विसर्जन करतात त्याला दसरा असेही म्हणतात. हा सण वाईट गोष्टीवर मात करून नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा हा सण आहे. Navratri in marathi

नवरात्रीमध्ये घटस्थापना करावी लागते. पक्षातील प्रतिपदेला घटस्थापना ही आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील काय प्रति पदेला घट बसवतात.

घट बसवताना ते अडीच दिवसाचा असतो, पाच दिवसाचा किंवा सात दिवसाचा ही बसवतात.

पूजेची पध्दत

जिथे देवीचा घट बसवायचा आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची, रांगोळी घालायची,चौरंग मांडायचा चौरंग नसल्यास पाटावरही जमते.

चौरंगावर लाल कापड टाकायचे जर शक्य असेल तर घरातील देव घरासमोर पूजा मांडा. चौरंगावर कलश मांडणार आहोत तर ताटात तांदूळ घेऊन त्यावर तांब्या ठेवा.

त्यात गंगाजल असेल तर टाका नाहीतर साधे पाणी घ्या. तांब्यात हळद-कुंकू, अक्षदा, एक रुपयाचे नाणे, सुपारी, दूर्वा, फुल या कलशात टाकायचे आहे.

कलशावर कुंकाने स्वस्तिक काढा. तांब्यावर नारळ ठेवा किंवा देवीचा मुखवटा ठेवा. नाहीतर फोटो ठेवा.

तांब्यात आंब्याची पाने किंवा विड्याची पाने ठेवा. नारळ त्यावर ठेवा. नारळाची हळद कुंकू लावून पूजा करावी.

कलश मांडून झाला की आहे. कलशाला साडी घाला, मंगळसूत्र घाला, दागिने घाला, फुलाची वेणी घाला, देवीला नथ घाला.

सर्व शृंगार करून झाल्यानंतर घटाची स्थापना करा. समोर पाटावर लाल रंगाचे कापड टाकावे हळद कुंकू फुल वाहून काळी माती भरलेली भांडे (मातीचे) ठेवा.

फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

बाजूला तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवायचे आहे. दुसऱ्या बाजूला तांदूळ टाकून त्यावर दिवा लावा.

हा दिवा नऊ दिवस तेवत राहिला पाहिजे. सुपारी समोर विड्याचे पान ठेवून त्यात पूजेचे साहित्य ठेवावे.(सुपारी, हळकुंड, बदाम, दूर्वा, इत्यादी)

मातीचा घट आहे मातीच्या मधोमध घट ठेवून त्यात पाणी भरून त्यात हळदीकुंकू, अक्षदा, सुपारी, दुर्वा, फुल या वस्तू टाकायचे आहेत.

पाच पाने आंब्याची ठेवायची त्यावर मातीचे छोटे ताट ठेवायचे. किंवा तांब्याचे छोटे ताट ठेवायचे. गटाला हळद कुंकू लावायचे आहे.

रेषा ओढून घेणार आहोत आता मातीवर धान टाकायचे आहे जे आपण सात प्रकारचे धान्य मिसळून ठेवलेले आहे.

ते धन्य मातीवर व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे. घटाभोवती टाकून झाल्यानंतर पूजेला सुरुवात करणार आहे. Navratri in marathi

प्रथम गणपती पूजनाने सुरुवात करूया. सुपारी ठेवली आहे. तिची पूजा गणपती समजून करूया.

पाणी शिंपडून घ्यावे हळद-कुंकू लावावे. अक्षदा वहावी फुल वहावे नंतर देवीची पूजा करावी.

हळद कुंकू लावावे

फुल वहावे दिवा ठेवला आहे त्याला हळद-कुंकू लावून अक्षदा व हवी फुल वहावे.

घटातील जी मातीची छोटी ताट आहे त्यावर हळदीकुंकू फुल वहावे.

या ताटात दिवा लावू शकता किंवा त्या घटात नारळही ठेवू शकता.

दिव्यामध्ये भरपूर तेल टाकून घ्या पूजेसाठी घेतलेले फळे देवीसमोर मांडून घ्या. कापसाचे वस्त्र देवीला गणपतीला दिव्याला वहायचे आहे.

घट मांडलेल्या भांड्याची पूजा करावी. हळद कुंकू फुल वहायची. टाकलेल्या धान्यावर आणखी थोडीशी माती टाकून पाणी टाकावे.

दररोज जेव्हा घटाची पूजा करतो. तेव्हा घटाला रोज पाणी टाकायचे आहे. दिवा लावून घेऊया.

अगरबत्ती धूप बत्ती लावून घेऊ. नैवेद्यामध्ये देवीला सुखामेवा, पंचामृत फळ, गुळ खोबरं खूप आवडते. Navratri in marathi

आरती करून घ्या देवीला नैवेद्य दाखवा. देवीची ओटी खना नारळाची भरा व नमस्कार करावा.

देवीचे नऊ दिवसाचे नऊ रूप :

१. पहिली माळ म्हणजे पहिला दिवस

देवीचे नाव आहे ‘ शैल्यपूत्री ‘. देवीला नैवेद्य गाईच्या तुपापासून बनवलेला पदार्थ तयार करून त्याचा नैवेद्य दाखवायचा.

हा नैवेद्य दुसऱ्या दिवशी घरातील सर्वांनी मिळून ग्रहण करायचा आहे. तसे केल्यास घरातून आजारपण नाहीसे होते.

असे काही पेशंट घरात असतील तर त्यांना हा नैवेद्य आवर्जून द्यायचा. लगेच बरे वाटायला लागेल.

पहिल्या माळेला देवीला पांढरी साडी नेसायची आहे. या शैल्यपुत्री देवीचा मंत्र आहे, ” ||ओम ऐ ही क्लीम् शैल्य पूत्रे नमः|| “

२. दुसरी माळ म्हणजे दुसरा दिवस

देवीचे नाव आहे देवी ‘ ब्रह्मचारीनी ‘ या देवीचा नैवेद्य आहे साखर किंवा पंचामृत. साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी या साखरेचे काही पदार्थ बनवून खायचे आहे.

हा नैवेद्य खाल्ल्यानंतर प्रत्येकाचे आयुष्य वाढणार आहे. देवीची साडी लाल रंगाची आहे. या ब्रह्मचारींनी देवीचा मंत्र,” ||ओम ऐ ही क्लीम ब्रह्मचारींण्ये नमः || “हा आहे.

३. तिसरी माळ म्हणजे तिसरा दिवस

देवीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य आपल्याला ग्रहण करायचा नाही. दुसऱ्या दिवशी मंदिरात दान करायचा आहे किंवा मुख्य प्राण्यांना प्यायला द्यायचा आहे.

दूध दान केल्यामुळे आपले दुःख दारिद्र्य नाहीसे होते. देवीची निळ्या रंगाची साडी आहे आणि यावेळी देवीचे नाव आहे ‘ चंद्रघंटा ‘या देवीचे मंत्र आहे, ” ||ओम ऐ ही क्लीम चंद्रघंट्येये नमः|| “

४. चौथी माळ म्हणजे चौथा दिवस

देवीचे नाव आहे ‘ कृष्णांड देवी’ देवीला नैवेद्य बत्तासेचा आहे. मंदिरासमोर पूजेचे साहित्य मिळते, तिथे हे बत्तासे मिळतात. बत्तासेचा नैवेद्य दाखवायचा आहे. दुसऱ्या दिवशी घरातील परिवाराने खायचा आहे.

त्यामुळे आपल्यातील निर्णय घेण्याची क्षमता वाढते. या कृष्णांड देवीचा साडीचा कलर पिवळा आहे. आणि देवीचे मंत्र आहे ” ||ओम ऐ ही क्लीम कृष्णांडाये नमः|| “

५. पाचवी माळ म्हणजे पाचवा दिवस

देवीचे नाव आहे ‘ स्कंदा ‘या देवीला नैवेद्य केळी आहे. केळीची पूर्ण फनी किंवा दोन केळी देवीला ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी सर्वांनी खायचा आहे. त्यामुळे शरीर निरोगी राहते. प्रतिकार शक्ती वाढते.

देवीच्या साडीचा रंग हिरवा आहे. देवी स्कंदा माता चा मंत्र आहे, ” ||ओम ऐ ही क्लीम स्कंदामाताये नमः|| “

६. सहावी माळ म्हणजे सहावा दिवस

देवीचे नाव ‘ कात्यायनी ‘देवीचा नैवेद्य मध आहे. दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्वांनी मध खायचे आहे. म्हणजे परिवारामध्ये प्रेम व आदर वाढतो. देवीच्या साडीचा रंग राखाडी आहे.

देवी कात्यायनीचा मंत्र आहे ” ||ओम ऐ ही क्लीम कात्यायन्ये नमः|| “

७. सातवी माळ म्हणजे सातवा दिवस

देवीचे नाव ‘काल रात्री’ आहे. या देवीचा नैवेद्य गुळ आहे. गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तो आपण खायचा नाही.
तो मंदिरामध्ये दान करायचा आहे.

गुळ मंदिरात दान केल्यास आपण संकटापासून मुक्त होतो आणि देवी कालरात्रीच्या साडीचा रंग नारंगी आहे. देवीचा मंत्र आहे ” ||ओम ऐ ही क्लीम कालरात्र्ये नमः|| “

८. आठवी माळ म्हणजे आठवा दिवस

देवीचे नाव ‘ महागौरी ‘ आहे. देवीला नारळाचा नैवेद्य दाखवतो. नैवेद्याचा नारळ दुसऱ्या दिवशी फोडून एखादा पदार्थ बनवून खायचा आहे. सगळ्या अडचणी दूर होतात.

देवी महागौरीच्या साडीचा रंग मोरपंखी आहे. देवीचा मंत्र आहे ” ||ओम ऐ ही क्लीम महागौरौ नमः|| “

९. नववी माळ म्हणजे नववा दिवस

देवीचे नाव ‘ सिद्धीदात्री ‘आहे. देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा लागतो. तीळ हे पांढरे असावे लागते. दुसऱ्या दिवशी तिळाचे लाडू, वड्या करून किंवा साखर मिक्स करून पूर्ण परिवार खाऊ शकतो.

या नैवेद्य दुसऱ्या दिवशी खाल्ल्यास ज्यांच्या कुणाच्या मनात भीती असेल ती नाहीशी होते. देवीची साडी गुलाबी रंगाची आहे. देवीसिद्धी रात्री चा मंत्र आहे ” ||ओम ऐ ही क्लीम सिद्धीदात्रौ नमः|| “

आजच्या लेखामध्ये नवरात्रि : संपूर्ण माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. marathi आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top