दात पिवळे पडल्याने लाज वाटते का? मोत्यासारखे पांढरे दात मिळविण्यासाठी हे घरगुती उपाय करा/Remedies for white teeth

Share with 👇 Friends.

दात पिवळे पडल्याने लाज वाटते का? मोत्यासारखे पांढरे दात मिळविण्यासाठी हे घरगुती उपाय करा.Remedies for white teeth

दंतचिकित्सकाकडे जाऊन महागडे उपचार घेण्यापूर्वी एकदा हे घरगुती उपाय करून पहा.

याच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या फक्त ५ मिनिटांत दातांचा पिवळेपणा सहज दूर करू शकाल.

Remedies for white teeth

हसणे – हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पिवळे दात असल्यामुळे आपल्याला अनेकवेळा लाजिरवाणेपणाला सामोरे जावे लागते.

त्यामुळे अनेकांना कुणासमोर उघडपणे हसताही येत नाही.

अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांच्या मदतीने दात पांढरे मोत्यासारखे चमकदार बनवता येतात.

दात पांढरे करण्यासाठी टिप्स:

अनेकदा तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हाही आपण कोणाशी बोलतो तेव्हा आपले पहिले लक्ष समोरच्या दाताकडे जाते.

दात आपल्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात, आपले स्मित आणखी आकर्षक करतात.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाय

वाचण्यासाठी येथे 👆 क्लिक करा

परंतु अडचण आपल्याला तेव्हा वाटते जेव्हा आपले पिवळे दात हसल्यानंतर लगेच समोरच्याला दिसते म्हणून आपण हसायचं टाळतो व आपले हसु आत राहते.

पिवळे दात असल्यामुळे अनेकवेळा लाजीरवाणीला सामोरे जावे लागते.

आज आपण जाणून घेणार आहोत की दात पिवळे होण्यामागील कारण काय आहे आणि घरगुती उपायांनी तुम्ही तुमचे दात कसे पांढरे करू शकता.

दात पिवळे का होतात ?

प्रथम आपण दात पिवळे कशामुळे होतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

वास्तविक, दात पिवळे पडण्याची अनेक कारणे आहेत जसे की पान, सुपारी, व्यवस्थित दात स्वच्छ न ठेवने, अनुवांशिक किंवा आपला आहार.

दाताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी उपाय

बर्‍याचदा लोक डॉक्टरांकडे जाऊन दातांचा पिवळेपणा काढून टाकतात, परंतु या प्रकारच्या उपचारांना त्यांचा प्रभाव दर्शविण्यासाठी थोडा वेळ लागतो

आणि महाग देखील असतो. तुम्हाला दात स्वच्छ करायचे असतील तर काही उत्तम घरगुती उपाय देखील आहेत.

मीठ आणि मोहरी तेल

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी मीठ आणि मोहरीचे तेल वापरण्याची कृती खूप जुनी आणि प्रभावी आहे.

यासाठी अर्धा चमचा मीठामध्ये मोहरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा. आता या मिश्रणाने दातांना हलक्या हाताने मसाज करा.

आठवड्यातून एकदा ही प्रक्रिया करा. असे केल्याने तुम्हाला फरक दिसेल.

एक चिमूटभर बेकिंग सोडा

दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी टूथपेस्टच्या वर चिमूटभर बेकिंग सोडा टाकून ब्रश करा.

यामुळे दातांवरील पिवळा थर निघून जातो. ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता.

स्ट्रॉबेरीचा वापर

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की स्ट्रॉबेरी खाण्यासोबतच दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठीही ते उपयुक्त आहे.

यासाठी स्ट्रॉबेरी मॅश करून दातांवर चोळा. ब्रश वापरून दात स्वच्छ करा.या प्रक्रियेनंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुण्यास विसरू नका.

लिंबू आणि संत्र्याची साले

दात पांढरे आणि चमकदार करण्यासाठी लिंबू आणि संत्र्याची साले चघळा किंवा दातांवर चोळा.

ही प्रक्रिया तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

कडुलिंबाचा दातवन

दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या दातवनापेक्षा चांगला पर्याय नाही. कडुलिंबाचा दातुन रोज वापरल्याने आठवडाभरात तुमचे दात चमकदार दिसू लागतील.

ऍपल सायडर व्हिनेगर

सफरचंद सायडर व्हिनेगरचा वापर दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

यासाठी समान प्रमाणात पाणी आणि व्हिनेगर मिसळून दात स्वच्छ धुवा. दातांचा पिवळेपणा निघून जाईल.

संत्र्याच्या सालीची पावडर

संत्र्याच्या सालीची पावडर दातांचा पिवळेपणा दूर करते. यासाठी ब्रश केल्यानंतर संत्र्याच्या सालीच्या पावडरने दातांना हलक्या हाताने मसाज करा.

केळीचे साल

दात पांढरे करण्यासाठी तुम्ही केळीच्या सालीचाही वापर करू शकता. होय, केळी जितके फायदेशीर फळ आहे तितकीच त्याची साल देखील फायदेशीर आहे.

केळीच्या सालीचा पांढरा भाग 1 किंवा 2 मिनिटे दातांवर रोज घासून मग रोज त्याच प्रकारे ब्रश करा. केळीमध्ये पोटॅशियम, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात.

मिनाक्षी निकम यांचा खडतड प्रवास

यामुळे दात पांढरे तर होतातच पण ते मजबूतही होतात. केळीच्या सालीची ही रेसिपी आठवड्यातून 2 ते 3 वेळा करून पाहा आणि मग पाहा पिवळसरपणा कसा निघून जाईल.

आमचा Remedies for white teeth हा लेख तुम्हाला कसा वाटला ? कमेंट बॉक्समध्ये शेअर करा.


Share with 👇 Friends.

Leave a comment