हरितालिका चे व्रत कोण करतात ? व्रत का करतात ? व्रत करताना त्याची पूजा कशी करायची ? पूजा कशी मांडायची ? हरितालिका व्रताचे काय विशेष आहे ? हे आपण या लेखातून पाहणार आहोत, चला तर मग सुरुवात करूया. हरितालिका संपूर्ण माहीती Haritalika mahiti in marathi
प्रथम आपण हे पाहू हरितालिका म्हणजे काय ते समजून घेऊया हरी म्हणजे अरण्य आणि तालिका म्हणजे सखी असे आहे.
अष्टविनायक गणपतीची संपूर्ण माहीती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हरितालिका संपूर्ण माहीती Haritalika mahiti in marathi
हे व्रत कुमारी मुलगी सुद्धा करू शकते कारण तिला मनासारखा योग्य वर मिळावा आणि संसारात तिला सुख समृद्धी मिळावी यासाठी करतात. व
लग्न झालेल्या स्त्रिया यासाठी करतात कारण पतीला दीर्घ आयुष्य मिळावे.
एकदा शंकर व पार्वती असेच कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वतीने विचारले की सगळ्या व्रतामध्ये कोणते व्रत श्रेष्ठ आहे ?
तेव्हा शंभू बोलले की नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ आहे, तसे ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ.
चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवामध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ,
त्याचप्रमाणे सगळ्या व्रतामध्ये हरितालिका व्रत हे श्रेष्ठ आहे.
《 आपल्या व्यवसायाची गुगल वर जाहिरात करण्यासाठी येथे क्लिक करा.
हरितालिका हे व्रत कसे श्रेष्ठ आहे ?
भगवान शंकराने सांगायला सुरुवात केली –
शंकर म्हणाले तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर व्रत केले होते. आणि त्याच्या पुण्याईने तू मला प्राप्त झालीस.
ते व्रत आता एक व्रत भाद्रपद महिन्यातील, शुक्ल पक्षातील तृतीयाला करतात.
हे व्रत कसे करतात ते मी सांगतो असे भगवान शंकर म्हणाले. लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केले.
64 वर्षे झाडाची पिकलेली पाने खाऊन थंडी-ऊन-पाऊस हे तिन्ही ऋतू सहन केले.
हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता पडली.
इतक्यात तिथे नारद मुनी हिमालयाकडे आले. तुझ्या वडिलांनी विचारले इकडे कसे काय येणे झाले?
तेव्हा नारद मुनी म्हणाले की तुमची मुलगी उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी तेच तिचे योग्य वर आहेत.
हरितालिका म्हणजे काय ते समजून घेऊया हरी म्हणजे अरण्य आणि तालिका म्हणजे सखी असे आहे.
त्यांनीच तुझ्याकडे मागणी घालण्यासाठी पाठवले आहे म्हणून मी इथे आलो.
हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट मान्य केली नंतर नारद मुनी तेथे विष्णू कडे गेले.
नारद मुनी इथून गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही.
भगवान शंकर म्हणाले, तू रागावलीस, चिडलीस हे पाहून तुझ्या सखीने तुला विचारले तेव्हा सखीला सांगितले मला महादेवावर श्रद्धा आहे .
मला महादेवाशिवाय कोणाशीच लग्न करायचे नाही. मी महादेवाशीच लग्न करीन. हा माझा निश्चय आहे. पण
माझ्या वडिलांनी विष्णू ला सांगून ठेवले आहे तेव्हा यावर कोणता उपाय करावा ?
मग तुला तुझ्या सखीने तुला घोर अरण्यात नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा दिसली.
त्या गुहेत जाऊन उपवास केलास. तिथे माझे पिंड तयार केली. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुक्ल तृतीया होता.
त्या रात्री जागरण केलेस. त्या पुण्याईने इथे माझे आसन हालले नंतर मी इथे आलो तुला दर्शन दिले. आणि वर मागण्यास सांगितले.
तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर मी ती गोष्ट मान्य केली.
मी गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती वृत्त पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीने सांगितलेला सल्ला पालन केला. नंतर
तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले.
मग तू सर्व हकीकत सांगितली. पुढे तुझ्या वडिलांनी मलाच देण्याचे वचन दिले व तुला घरी घेऊन गेले. मग
काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी याव्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत म्हणतात.
ही झाली व्रताची कहाणी आता आपण व्रता मध्ये पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य. Haritalika mahiti in marathi
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी माहीती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हरितालिका व्रताचे महत्त्व व पूजा कशी करायची
प्रथम लागणारे साहित्य – हळदी-कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, नैवेद्यासाठी गुळ खोबरे, सौभाग्य वाण.
यामध्ये बांगड्या, हळदी-कुंकू, आरसा, तांदूळ, खडीसाखर, दोन जानवे,
कापसाचे वस्त्र 4, एक वस्त्र गणपती बप्पा साठी. एक वस्त्र महादेवाला व दोन वस्त्र पार्वती व सखीला.
पाणी, पंचामृत फुले, सहा हळकुंडे, बारावीड्याची पाने, सहा सुपारी, सहा खारीक, सहा बदाम, सहा खोबऱ्याचे तुकडे, बेलाचे पान, दूर्वा, आघाडा.
यानंतर 16पत्री म्हणजेच 16 झाडाची पाने, बेल, आघाडा, मधुमालती दुर्वा, कन्हेर, आंबा, तुळस, रुई, बकुळ, डाळिंब, जाई, अशोक,
मरवा, जास्वंद, इत्यादी चौरंग पाठ, अगरबत्ती, कापूर, निरंजन, नैवेद्यासाठी पाच फळे, वाळूची पिंड करण्यासाठी लागणारी वाळू, ही धुवून घ्यावी. हे झाले साहित्य मांडणी. Haritalika mahiti in marathi
पूजेची मांडणी
प्रथम जिथे आपल्याला पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून घेऊ.
तिथे चौरंग किंवा पाठ मांडावा. त्या भोवती छान अशी रांगोळी घालावी. पाटावर स्वच्छ असे कपडे टाकावे. नंतर
उजव्या बाजूला पार्वती आणि सखी राशीवर बसवाव्या. व डाव्या बाजूला राशीवर रास ठेवून त्यावर गणपतीचे प्रतीक समजून सुपारी ठेवावी.
त्यांच्यासमोर महादेवाची पिंड करून घ्यावी. वाळू धुवून घेतल्यामुळे किंवा पाण्याचा पिंडीला अभिषेक केल्यास कापड खराब होईल. म्हणून
कपड्यावर पिंडीपुरतेच प्लास्टिक टाकावे व त्यावर पिंड तयार करावी. नंतर समोर विड्याची दोन दोन पाने असे पाच वीडे तयार करावे.
त्यावर एक हळकुंड, सुपारी, एक खारीक, एक बदाम, एक खोबरेचा तुकडा, एक नाने, अशी मांडणी करावी. Haritalika mahiti in marathi
पूजा करायची विधी
पूजेला सुरुवात करताना प्रथम स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचे आहे. नंतर तुम्ही निरंजन समई किंवा दिवा लावले असेल,
त्यांनी हळदी-कुंकू, अक्षदा ठेवून फुल ठेवून नमस्कार करावा. पाटाच्या दोन्ही बाजूला समईला असेच करायचे.
आपण कोणतीही पूजा करताना अगोदर गणपतीची पूजा करतो तेव्हा गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी आहे.
ती ताटात घेऊन तिला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे नंतर पंचामृताने स्नान घालायचे परत स्वच्छ पाण्याने स्नान घालायचे. नंतर
पाण्यात हळदीकुंकू व फुलाच्या पांढऱ्या पाकळ्या घालून त्यांनी स्नान घालावे. नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालावे.
मग सुपारी ताटातच थोडी बाजूला घेऊन स्वच्छ पाण्याने स्नान घालावे पुन्हा जिथून सुपारी उचलली होती तिथेच राशीवर ठेवावी.
इथे पूजा करून घ्यायची. प्रथम सुपारीला अष्टगंध लावायचा, नंतर अक्षदा टाकायच्या. बनवलेल जानव ठेवायचं. नंतर कापसाचे वस्त्र घालायचे.
फुल, दुर्वा, आघाडा व्हायचा गणपती समोर विडा ठेवायचा. त्यावर सुपारी हळदीकुंकू व्हायचा. नैवेद्य दाखवून औक्षण करायचे. नमस्कार करावा.
नंतर हरितालिकाचे हळदी-कुंकू लावून, अक्षदा फुल किंवा वेणीचा गजरा ठेवावा. कापसाची वस्त्रे घालावी. आघाडा ठेवावा व औक्षण करून घ्यावे.
खना नारळीने ओटी भरावी व नमस्कार करावा. नंतर महादेवाच्या पिंडीला पाण्याचा अभिषेक करायचा व पंचामृताचा अभिषेक करायचा व हळदीकुंकू गुलाल बुक्का व्हायचा. कापसाचे वस्त्र द्यायचे. जाणवे द्यायचे, बेल पान हे उलटे ठेवायचे. पांढऱ्या रंगाचे फुल व्हायचे 16 पत्री वहायची व नमस्कार करायचा. नंतर
विड्यावर हळकुंड सुपारी खारीक बदाम फुल अक्षदा वाहायचे नमस्कार करायचा नैवेद्य म्हणून पाच फळ व पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा व नंतर कथा वाचायची.Haritalika mahiti in marathi
आजच्या लेखामध्ये हरितालिका संपूर्ण माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Haritalika mahiti in marathi. आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.
खूपच उपयुक्त माहिती आहे. पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.