आजच्या लेखामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल सविस्तर माहीती जाणून घेऊया.
सर्वसामान्य समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी 26 जून या दिवशी असते.
26 जून हा दिवस भारतभर “सामाजिक न्याय” दिन म्हणून साजरा होतो.
त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील “कागल” या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाडगे.
त्यांच्या आईचे नाव राधाबाई जयसिंगराव घाडगे असे होते. शाहू महाराजांचे पूर्वीचे नाव यशवंतराव होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोट येथे झाले. नंतर त्यांचे उच्च शिक्षण धारवाड येथे झाले.
2 एप्रिल 1894 मध्ये त्यांचा राज्यभिषेक झाला पुढे त्यांचा विवाह खानविलकर यांच्या मुलीशी म्हणजेच लक्ष्मीबाई यांच्याशी बडोदा येथे संपन्न झाला. त्यांना दोन मुले व दोन मुली अशी आपत्य झाली.
राजर्षी शाहू महाराज माहीती shahu maharaj mahiti in marathi
नाव | राजर्षी शाहू महाराज |
जन्मतारीख | २६ जून १८७४ |
जन्मस्थान | कागल |
शाळेतील नाव | यशवंतराव |
वडिलांचे नाव | जयसिंगराव घाटगे |
आईचे नाव | राधाबाई जयसिंगराव घाटगे |
पत्नीचे नाव | लक्ष्मीबाई खानविलकर |
राज्याभिषेक | २ एप्रिल १८९४ |
मृत्यू दिनांक | ६ मे १९२२ |
》 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती 👈 येथे क्लिक करा.
राजर्षी शाहू महाराज यांची कार्य
- शाहूपुरी येथे गुळाची पेठ स्थापन केली.
- वेद्योत्तक प्रकरण पाच नद्याचा समूह असलेले संगम पंचगंगा या नदीवर वेद्योत्तक मंदिर केले.
- 50 टक्के आरक्षण मागासवर्गीय स्त्रियांसाठी ठरले.
- 1907 मध्ये मिस क्लर्क वस्तीग्रह मागासवर्गीय साठी चालू केले.
- 1908 मध्ये भोगावतीच्या तीरावर लक्ष्मीबाई नावाचा तलाव शेती कामासाठी उपयोगात येईल यामुळे बांधला.
- 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा या संस्थांचे अध्यक्ष भास्कर जाधव हे होते.
- सप्टेंबर 1916 मध्ये सक्तीचे शिक्षण केले होते ज्या पालकांचे पाल्य शाळेत घालणार नाही त्यांना एक रुपया दंड होता या वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण होते.
- 1906 रोजी कापड गिरणी सुरू केली
- 1918 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली
- 26 जुलै 1918 हजेरी पद्धत बंद केली कोर्टकचेरी मध्ये अपराध्यांना दररोज हजेरी लावण्यासाठी जावे लागेल ती पद्धत बंद केली
- 18 सप्टेंबर 1918 मध्ये कुलकर्णी वतने नष्ट केले
- 12 जुलै 1919 रोजी कोल्हापूर इलाका मधील विधवा पुनर्विवाह संबंधित कायदा केला
- दोन ऑगस्ट 1919 मध्ये कुरपणाच्या वतनासाठी प्रतिबंध करणारा कायदा केला
- जून 1920 मध्ये महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद नागपूर येथे झाली.
- जुलै 1920 मध्ये मराठा पुरोहित तयार करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक विद्यालय सुरू केले
- 12 ऑक्टोंबर 1920 मध्ये क्षात्रजगुरु संबंधीची जाहीरनामा प्रसिद्ध केले
- मे 1921 मध्ये महार वतन खालसा केले 1918 मध्ये संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कायदा केला व महार वतनाचा शेवट स्वातंत्र्यानंतर कायदा केला.
आपल्या व्यवसायाची गुगल वर जाहिरात करण्यासाठी येथे क्लिक करा.
- देवदासी प्रतिबंध कायदाही केला
- क्रांतिकारकांनी शिवाजी क्लब वनिता वस्त्र भांडार मधून ते कापड खरेदी करून स्वतः वापरायचे व क्रांतिकारकांनाही द्यायचे.
- रखमाबाई केळवकर त्यांना शाळेतील मुख्याध्यापक केले
- शाहू महाराजांनी शिक्षणात सर्वाधिक प्राधान्य व महत्त्व प्राथमिक शिक्षणाला दिले
- पाटील व तलाठी शाळा सुरू केली
- लष्करी शिक्षणासाठी इन्फ्रट्री स्कूल सुरू केले
- गंगाराम कांबळे या महार समाजातील व्यक्तीला सत्य सुधारक हॉटेल टाकून दिले
- महाराजांनी गुरुकुलात कर्नल वूड हाऊस या नावाने अनाथालय स्थापन केले
- चीरोलच्या इंडियन इनरेस्ट या ग्रंथाचा मराठा अनुवाद करून त्यांच्या प्रति मोफत वाटल्या
- नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणाऱ्या अग्रदूत असा धनंजय कीर यांनी शाहू महाराजांचा गौरव केला
- पाचशे लोक वस्तीवरील प्रत्येक गावात शाळा काढली
- 1912 पाटील शाळा दिल्ली दरबार पाटील शाळा असे नाव दिले
- 27 डिसेंबर 1917 मध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे 11 वे अधिवेशन खामगाव येथे झाले त्यांचे अध्यक्ष पद शाहू महाराजांनी भूषविले होते.
- भारतातील विद्यार्थी वस्तीग्रहाचे अद्यजनक म्हणून ओळखले जाते. shahu maharaj mahiti in marathi
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी केलेले कार्य
- राधानगरी धरण
- के टी बंधारे
- साठ भारी
- खासबाग
- वैदिक शाळा
- केशवराव भोसले थिएटर
- मुक्या प्राण्यांना आश्रय स्थान
- राखीव जागा धोरण
- विधवा पुनर्विवाह कायदा
- महिला सबलीकरण
- शाहू मिल
- आधुनिक शेतीसाठी संस्थान
- शाहूपुरी व्यापारी पेठ
- जयसिंगपूर गावाची स्थापना
- कोल्हापूर रेल्वे स्टेशन
- विविध वीस जातींची शैक्षणिक होस्टले
- समतेचा संदेश देणारे गंगाराम कांबळे हॉटेल
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत देणारे
- मोफत पन सक्तीचे शिक्षण कायदा
- चित्रकार गायक वादक खेळाडू अशा अनेकांना राजश्रय
- जातीय धार्मिक दंगे, धोपे पासून अलिप्त असे शहर
- अपेक्षित जनतेवर अन्यायकारक असलेले बलुतेदारी हजेरी बंद वैठ बिगारी पद्धत देविदासी पद्धत शक्तीने बंद केली
थोडक्यात माहीती
shahu maharaj mahiti in marathi
ई. हे सर्व कार्य शाहू महाराजांनी कोल्हापूरसाठी केले.
कोल्हापूरला आणखी एका नावाने ओळखले जाते ते नाव म्हणजे कुस्ती पंढरी.
पांडुरंगाच्या पंढरपूरास जसे पंढरी म्हणून ओळखले जाते, तसे हे कुस्तीचे पंढरी हे नावही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिले.
हरिश्चंद्र बिराजदार, गणपतराव हराळकर, श्रीपती खचनाळे, दादू चौगुले, ई. या पैलवानांनी कोल्हापूरचे नाव गाजवले.
शाहू महाराजांची मालिका दूरदर्शन वर होती. त्यात राहुल सोलापूरकर या कलाकारांनी ही भूमिका वठवली होती.
शाहू महाराजांच्या कामातून जे प्रोत्साहीत झाले त्यांना महाराजांच्या नावाने पुरस्कार जाहीर होतात.
तसेच सामाजिक कार्यकर्ता पुष्पा भावे यांना 20 जून 2018 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने शाहू पुरस्कार देण्यात आला.
सर्वसामान्य समाजाला स्वाभिमानी नवे जीवन देणारे छत्रपती शाहू महाराज.
जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही त्यांना एक रुपया दंड ठोठावणारे राजे.
कला संस्कृती क्रीडा शिक्षण यांना राजश्रय देणारे राजे.
अंधश्रद्धा, कर्मकांड, देव यावर प्रहार करणारा राजा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारे राजे.
सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे राजे.
सर्वसामान्य समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे छत्रपती शाहू महाराज यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आजच्या लेखामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल दिलेली माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. shahu maharaj mahiti in marathi. आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.
Khup chan
Nice