धनत्रयोदशी

Share with 👇 Friends.

नमस्कार मित्रांनो, सर्वात अगोदर सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !! Dhantrayodashi in marathi

संपूर्ण भारत देशात सर्वत्र दीपावली सण मोठ्या प्रमाणात अति उत्साहामध्ये आनंदात साजरी केले जाते.

फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

दीपावलीच्या तीन ते चार दिवस खूप धमाल होते, लहान मोठ्यांना नवीन वस्त्र, दागिने, खाण्यासाठी फराळ, फटाके वाजवण्यासाठी, घरी विद्युत रोषनाई, पाहुण्यांची ये-जा, घरावर आकाश दिवा,

Dhantrayodashi in marathi

घरासमोर पणत्याची आरास, घरासमोर रांगोळीची धमाल असते.
हे सगळे दिवसभर होतं आणि संध्याकाळी देवाची पूजा आरती करतात फटाके वाजवतात.

तर दीपावली चा पहिला दिवस म्हणून वसु बारस या दिवशी सकाळी सडा रांगोळी स्नान उरकून गाय व वासराला नैवेद्य गुळ व पोळीचा देतात.

वसुबारस म्हणजे वस्तू म्हणजे धन त्यासाठी असलेली पारस म्हणजे दूवादिशी या दिवसाला वसुबारस म्हणतात.

या दिवशी पाडसांसह गाईची संध्याकाळी पूजा करतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने पूजा करायची प्रथा आहे.

ज्याच्याकडे गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे आजच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात गाईच्या पायावर पाणी घालून

हळद कुंकू फुले अक्षदा वाहून निरंजनाने ओवाळून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात.

या दिवशी पासूनच दीपावलीला सुरुवात होते. धनत्रयोदिशीला धनाची पूजा करतात या दिवशी व्यापारी दुकानावर लोक सोने नाणे याची पूजा करतात.

शेतकरी वर्ग हा शेतात आलेले नवीन दान धान्य यांची पूजा करतात दाखवता या दिवसांमध्ये शेवंतीच्या फुलांना खूप बहर आलेला असतो यामुळे शेवंतीचे फुल देवाला वाहतात.

धन्वंतरीची ही याच दिवशी पूजा करतात कारण याच दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी चा जन्म झालेला आहे त्यामुळे धन्वंतरीची जयंती म्हणून पूजा करतात.

दंतकथा

धनत्रयोदिशीची दंतकथा अशी आहे की तिचे नाव आहे समुद्रमंथन -महर्षी दुर्वास ऋषीने दिलेल्या शाप मधून मुक्त होण्यासाठी देव व दानव यांनी मिळून समुद्रमंथन केले.

समुद्रमंथनातून प्रथम श्री लक्ष्मी देवी प्रकट झाली नंतर समुद्रमंथनातून धन्वंतरी देव एका हातात अमृताचा कलश आणि

दुसऱ्या हातात जळून व तिसऱ्या हातात शंख व चौथ्या हातात चक्र घेऊन जन्माला आले.

धन्वंतरी देवाच्या या चारही हातातील वस्तूचा चांगला उपयोग करून बऱ्याच व्याधींना लोकांना बरे करण्याचे ज्ञान मिळाले.

भगवंत धन्वंतरी देवाला प्रसन्न करता यावे म्हणून धन्वंतरी ची पूजा केली जाते. तेव्हा समुद्रमंथनातून धन्वंतरी प्रकट झाली याचा अर्थ

त्यांचा याचवेळी जन्म झाला म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंती साजरी करतात.

धन्वंतरी जयंती ही आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस जयंतीचा आहे आयुर्वेदिक वैद्य लोक या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात

या पूजेचा प्रसाद म्हणून कडुलिंबाचा पाला व त्यात साखर मिक्स करून देतात.

संध्याकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान पूजा शुभ मुहूर्तावर केली जाते. आयुर्वेदामध्ये असे समजले जाते की,

कडुलिंबाचा पाला हा अमृताची उत्पत्ती करतो आणि याच्या सेवनाने रोगराई दूर पळते असे मानले जाते.

दसरा सणाचे महत्व

धनत्रयोदिशीच्या दिवशी सोनं खरेदी करणे पसंत करतात. सोना खरेदी केल्याने परिवारातील आर्थिक उन्नती होते असा समज आहे.

सोना खरेदी करता येणे शक्य नसेल तर सोन्या ऐवजी तुम्ही काहीही खरेदी करू शकता.

धनत्रयोदशीला संपूर्ण ब्रह्मांडात वायुमंडल हे सोन्यासारखे चमचमत असणाऱ्या तेजात सोन्यासारखे उजळून निघतात.

म्हणून या दिवशी धनाच्या रुपात सोने चांदीची पूजा करतात.

लक्ष्मी माता

आपण लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा केली की श्री लक्ष्मी माता पावते आणि आपल्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन होते.

धार्मिक संस्कारामध्ये असे ही म्हणतात आपण जे काही धनद्रव्य कमावले आहे

त्यांच्यापैकी सहावा हिस्सा आपण दान करावा असे शास्त्रात सांगितले आहे दान केल्याने लक्ष्मीदेवी प्रसन्न होते.

आपण जे दान करणार आहोत ते गरजूवंतांना दान करणार आहोत आपले दान चांगल्या कामासाठी उपयोग झाल्यामुळे आपले आत्मबल वाढून जाते.

म्हणजेच श्री लक्ष्मी माता कायम आपल्या घरात वास करून राहते. श्री लक्ष्मी मातेचा वास आपल्या सोबत राहतो त्यामुळे आपल्या उद्योग धंद्यामध्ये भरभराट राहते आपल्याला सुख संपदा प्राप्त होते.

धनाची पूजा करताना आपण आपल्या सोने-चांदी पैशाची पूजा करतो श्री लक्ष्मी माता कुबेराची पूजा करताना व्यापारी वर्ग त्यांची वव्हाची पूजा करतात.

शेतकरी वर्ग त्यांच्या अवजारांची म्हणजेच नांगर, कुदळ, खुरपे ,विळा यांची पूजा करतात. शेतातील शेतकरी आलेले नवीन धान्य याची ते पूजा करतात.

हा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. धनाची पूजा करताना श्री लक्ष्मी मातेची आणि कुबेराची पूजा करून गुळ खोबरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. श्री लक्ष्मी माता कुबेर यांच्या पूजेबरोबर यमदेवताची ही पूजा करतात.

अकाली मृत्यू येऊ नये म्हणून एमदेवासाठी तेरा दिवे लावले जातात याला यमदीपदान म्हणतात यमाला दिवा लावायचा वयम देवाला प्रार्थना करायची आणखी एक धार्मिक कथा आहे ती अशी आहे.

धार्मिक कथा

एका राज्यात हेमा नावाचा एक राजा राज्य करत होता त्याच्या मुलाला अकाली मृत्यूचा शाप मिळालेला असतो.

राजा हे ऐकून खूप दुःखी होता असे काही घडू नये म्हणून राजाने त्याचे लग्न करून दिले लग्नानंतर च्या चौथ्या दिवशी मृत्यू होण्याचा दिवस असतो.

त्याची पत्नी त्याला रात्री झोप येऊ नये म्हणून ती बराच प्रयत्न करते त्याच्या भोवताली सोन्या चांदीचे अलंकार सोन्याच्या मोहरा ठेवते.

राजमहालात आणि प्रवेशद्वारांमध्ये सोन्या चांदीच्या मोहरा ठेवता जेणेकरून यम देवता आपल्या महालामध्ये शिरू नये. राजमहालात मोठमोठे दिवे लावून सगळीकडे लखलखीत करतो.

इकडे त्याची पत्नी गाणे गाऊन ऐकवते देवाच्या, धर्माच्या, भुताच्या बहादुरीच्या गोष्टी सांगत असे. ती प्रयत्न करून ती त्याला जागे ठेवते शेवटी ती वाईट घडी जवळ आली.

यम देवता सर्पाचे रूप धारण करून राजमहाला कडे येतो. पण जेव्हा तो यम होतो, महालात राजकुमाराकडे खोलीत घुसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यमाचे डोळे सोन्या-चांदीच्या अलंकारांनी दिपून जाते. आणि त्यामुळे त्याला आपल्या यमलोकी परतावे लागते.

तेव्हा मग राजकुमाराचे प्राण वाचतात म्हणून यमदीप दान असे या दिवसाला म्हटले जाते. या दिवशी घराबाहेर दिवे लावतात.

आणि दिव्यांच्या वातीचा झोक दक्षिण दिशेला करतात व नमस्कार करतात.

दिवे एका ताटात घ्यावे त्यांना हळद-कुंकू अक्षदा वहावे, फुल वाहवे, दिव्यात एक लवंग टाकावी. नमस्कार करावा.

एक दिवा देवाजवळ ठेवावा एक तुळशीजवळ ठेवावा खिडकीत दारात दिवे ठेवावे.

जागा नसेल तर देवा जवळच ठेवावा. यमदीप दानाचा दिवा हा कणकेचा करावा. नाहीतर नेहमीची पण ती वापरू शकता.

कणकेच्या दिव्यात तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल नसेल तर साधे ही चालते.

दिवा मोठा असावा

त्यात तेल जास्त बसेल व बराच वेळ तेवत राहील. दिव्याला हळदीकुंकू अक्षता व्हावी पांढरे फुले व्हावे पूजा करावी.

देवाला पाणी हाताने सोडा, दिव्याला पाणी हाताने सोडावे पूजा करून नमस्कार करावा व प्रार्थना करावी.

दिवा मोठा असेल त्यात तेल जास्त मावेल व रात्री बराच वेळ ठेवत राहील.

एक रुपयाचे नाणे दिव्यात टाकावे फुल वहावे नमस्कार करावा. तो दिवा घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला ठेवावा.

नमस्कार करावा देवाला प्रार्थना करावी.

कृपया मला माझ्या परिवाराला व नातेवाईकांना संपत्ती प्रदान करावी.

आजच्या लेखामध्ये धनत्रयोदशी या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Dhantrayodashi in marathi . आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.


Share with 👇 Friends.

Leave a comment