Personality Development in marathi

Share with 👇 Friends.

नमस्कार मित्रांनो, व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ? What is Personality Development in marathi आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

मित्रांनो आपण जीवन जगत असताना दोन ते तीन व्यक्ती मध्ये जगत असतो. राहत असतो.

प्रथमदर्शनी आपण एखाद्या नवीन व्यक्तीला पाहिलं त्याची एक वेगळी व्यक्तिरेखा आपल्या मनामध्ये तयार होते. त्याचे वेगळे व्यक्तिमत्त्वाचा भास आपल्याला होतो.

म्हणजे जे आपण दिसतो ती आपली व्यक्तिरेखा असते. दुसरी व्यक्तीरेखा आपण इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतो.

उदाहरणार्थ : कोणाची चांगली बॉडी असेल तर सलमान खान सारखा इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या ठिकाणी गप्पा करतानाही आपल्याला खूप काही नॉलेज,खूप काही माहिती आहे असे इतरांना भासवितो.

Personality Development in marathi

म्हणजे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व की जे आपल्यामध्ये नसते, मात्र ते आपण इतरांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि

त्यातला तिसरा प्रकार म्हणजे असं व्यक्तिमत्व की जे आपण असतो जो आपला मूळ स्वभाव असतो.

अशा प्रकारचे तीन गोष्टी आहेत

एक म्हणजे जे आपण असतो जे आपण दिसतो आणि जे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या तीन व्यक्ती महत्व मध्ये किंवा व्यक्तिरेखांमध्ये आपण दैनंदिन रित्या जगत असतो.

याचा आपल्या प्रत्येकाला अनुभव आहे आणि असतोच.

मित्रांनो ही एक चांगली गोष्ट आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही विशेषता असते. काही ना काही वेगळेपण असतेच. म्हणून करोडो लोक हे प्रत्येक स्वतःच वेगळं वैशिष्ट काही वेगळे खास गुण त्याच्यामधे असतात. आणि

म्हणून प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. प्रत्येक पर्सनॅलिटी ही वेगळी आहे. आणि आपल्याला खास काही वेगळं बनायची इच्छा असेल तर आपल्याला वेगळं व्हावं लागेल. आपल्याला वेगळं बनावं लागेल तरच आपण काही वेगळे खास होऊ शकतो.

आता वेगळी खास अशी व्यक्तिमत्त्वाची रेखा ही कशी तयार करावी चांगलं व्यक्तिमत्व कसं असते त्याचे निकष काय एखादी पोस्टालिटी खूपच छान आहे असा पण केव्हा म्हणतो तर बघू आता त्याचे निकष

पर्सनॅलिटीचे निकष किंवा व्यक्तिमत्व टाकणारे घटक हे कोणते

तर मित्रांनो त्यातील पहिला घटक आहे ते म्हणजे

Business ideas in marathi

आपली वेशभूषा

आपली वेशभूषा किंवा आपला चेहरा किंवा आपला ड्रेस कोड तर बघा मित्रांनो आपल्यासमोर कोणी एखादा अनोळखी किंवा नवीन व्यक्ती आला तर

त्याचे व्यक्तिमत्त्व कसे असेल याचा आपल्या मनामध्ये अंदाज बांधतो. एखादा भगवे कपडे घालून जर कोणी आला तर

हा कोणीतरी साधू संत असेल अशी आपल्या मनामध्ये प्रतिमा तयार होते.

कुणी पांढरे कपडे जर घालून आलेलं असेल तर हा कोणीतरी राजकारणी व्यक्ती असेल अशी व्यक्तीरेखा आपल्या मनामध्ये तयार होते किंवा

एखादा व्यक्ती महागडी कपडे घालून आला तर आपल्याला तो काहीतरी महागडा म्हणजे श्रीमंत घरचा असेल अशा प्रकारचा समज आपल्या मनामध्ये तयार होतो.

असेल नसेल हा नंतरचा भाग आहे मात्र आपल्या मनामध्ये एक तशी प्रतिमा तयार होते.

म्हणून मित्र कपडे कशीही असो ते व्यवस्थितरित्या स्वच्छ केलेले आणि चांगले नीटनेटके अशी आपली वेशभूषा असली पाहिजे.

भाषा

दुसरा महत्त्वाचा घटक तो म्हणजे भाषा.

मित्रांनो, एकदा व्यक्ती गरीब कंडिशन मध्ये का असेना किंवा श्रीमंत का असेना जर त्याची बोलीभाषा हे जर चांगल्या प्रकारचे असेल तर त्याचा निश्चितच समोरच्या व्यक्तीवर चांगला प्रभाव पडतो.

आणि म्हणून आपली बोलीभाषा देहबोली ही सुद्धा त्यास अनुकूल असली पाहिजे म्हणजे ती इंग्रजीत असली पाहिजे असं माझं म्हणणं नाही.

इंग्रजी भाषेने खूप जास्त इम्प्रेशन पडते असेही नाही मात्र एक प्रसंगाला अनुकूल आपल्या वेशभूषाला अनुकूल आणि ठिकाण स्थळ काढायला अनुकूल आपली भाषा असली पाहिजे. Personality Development in marathi

आपण मोठया शहरांमध्ये जातो किंवा फॉरेनला जातो तेव्हा निश्चितच इंग्रजी भाषा जर आपल्याला येत असेल तर

आपला प्रभाव नक्कीच पडेल आणि आपण जर खेडेगावामध्ये असू तर निश्चितच आपल्या गावातली भाषा ही आपल्याल अनुकूल राहील.

कार्यालयामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमास्थळी आपल्याला प्रमाण भाषा किंवा योग्य भाषेचा वापर करावा लागतो.

त्या ठिकाणी आपल्या गावातली भाषा चालणार नाही.

म्हणून स्थळ, काळ, वेळ पाहूनच आपली भाषा असली पाहिजे आणि त्या-त्या ठिकाणी आपण त्या भाषेमुळेच प्रभाव टाकू शकतो.

विचार

आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणारा प्रमुख भाग, तो म्हणजे विचार. in marathi

मित्रांनो आपले विचार कसे आहेत सकारात्मक आहे की नकारात्मक आहेत. कोणतीही गोष्ट घडली असेल आपल्या जीवनामध्ये आणि आपण त्यालाच डोक्यात घेऊन बसलो,

हरून बसलो आणि नेहमीच आपल्या मित्र परिवारामध्ये त्याचा रडगाण गात बसलो तर निश्चितच आपली व्यक्तिरेखा ही नकारात्मक अशी बनेल. आणि आपले दोस्त मित्र एवढेच म्हणतील की हा नेहमी तेच रडगाण गात बसतो.

म्हणून ते आपल्याला टाळू सुद्धा लागतील म्हणून आपल्या व्यक्तिरिकेमध्ये किंवा व्यक्तिमत्त्वांमध्ये आपले विचार कसे आहेत ते खूप महत्त्वाचा विषय आहे.

यामुळे आपण नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन, विचार ठेवले पाहिजे.

भावना

मित्रांनो आपलं मन हे भावनांना अनुकूल असलं पाहिजे. आपल्या मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या भावनांचा संमिश्र प्रतिसाद असला पाहिजे.

त्यामुळेच लोकांच्या दुःखामध्ये आपल्याला दुःख वाटायला आले पाहिजे. त्यांच्या दुःखाचा क्षण वाटता आला पाहिजे. हे सुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक प्रमुख भाग आहे.

बॉडी लँग्वेज

त्यानंतरचा महत्वाचा घटक आहे बॉडी लँग्वेज. मित्रहो शरीर सौंदर्य किंवा आपली बॉडी लँग्वेज कशा प्रकारची आहे म्हणजे खूप काही चांगली बॉडी असेल तरच इम्प्रेशन पडते असेही नाही.

त्यामुळे शरीरावर नीटनेटके कपडे असावे आणि शरीराला अनुकूल कपडे आणि पेहराव असले पाहिजे.

शिक्षण

यानंतर एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शिक्षण.
किंवा शिक्षणामुळे मिळाले मिळालेले ज्ञान.

चार चौघात असताना आपल्याला एखाद्या विषयाची माहिती जर डीपमध्ये असेल आणि आपण ती चर्चा समोरच्या लोकांसमोर मांडली तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो. आपले इंप्रेशन त्या ठिकाणी तयार होतं.

आणि एक माहिती वाला ज्ञानी व्यक्ती म्हणून आपली व्यक्तिरेखा चार चौघा मध्ये तयार होते किंवा शिक्षणामुळे मिळालेले ज्ञान एक महत्त्वाचा घटक आपल्या व्यक्तिरिकेमध्ये महत्त्वाचा ठरतो.

संवाद कौशल्य

पुढचा घटक आहे तो म्हणजे संवाद कौशल्य .
आपलं संवाद कौशल्य हे जितक चांगलं असेल तितकी आपली व्यक्तिरेखा निश्चितच चांगली असेल.

आपण पाहिले यापैकी काही घटक निश्चितच कमी महत्त्वाचे आहेत परंतु संवाद कौशल्य आपले विचार, आपली भाषा हे मात्र खूप महत्त्वाचे असे घटक आहेत. Personality

व्यक्ती हा गरीब घरचा किंवा श्रीमंत घरचा आहे हे फारसं महत्त्वाचं असत नाही. Development

तिच्याकडे कार गाडी मोटर गाडी असणे फारसं महत्त्वाचं असत नाही मात्र या गोष्टीमुळे समाजामध्ये एक वेगळी अशी व्यक्तिमत व्यक्तिरेखा ही आपण तयार करू शकतो.

आणि आपल्याला जर सर्वांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर या निकषावर आधारित आपल्याला काही सुधारणा आपल्या स्वभावामध्ये,

आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या बोलण्यामध्ये सगळ्या बाबतीमध्ये सुधारणा करावी लागतील. तर आपण आपली एक वेगळी व्यक्तिरेखा तयार करू शकतो…

आजच्या लेखामध्ये व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ? या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Personality Development in marathi . आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.


Share with 👇 Friends.

1 thought on “Personality Development in marathi”

Leave a comment