सफरचंद खाण्याचे फायदे / Benefits of Apple in marathi

हॅलो ! आजच्या पोस्ट मध्ये आपण सफरचंद खाण्याचे फायदे / Benefits of Apple in marathi पाहणार आहोत. चला तर मग क्षणाचाही विलंब न करता महत्वाची माहीती पाहूया.

Benefits of Apple in marathi

सफरचंद खायला सर्वांनाच आवडते. म्हणून सफरचंद हे जास्तीत-जास्त लोकांच्या आवडीचे फळ आहे.

हे फळ आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. लहान मुलांना सफरचंद खुप आवडतो आणि लहान मुलांना सफरचंद आवर्जुन खाण्यासाठी दिला जातो.

सफरचंद खाण्याचे फायदे

सफरचंद हे जगातील स्वादिष्ट आणि लोकप्रिय फळांमधील एक फळ आहे. तेवढेच ते गुणकारी देखील आहे.

सफरचंदाचे सेवन फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात केले जाते. सफरचंद खाल्याने आरोग्यास काय-काय फायदे होतात हे आपन पुढे पाहणार आहोत.

१) काॅलेस्ट्राॅल कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते

सध्याच्या दिवसांमध्ये खुप लोकांचा काॅलेस्ट्राॅल अनियंत्रित आहे. यामुळे हृदय रोग होण्याचा धोका उद्भवतो.

आता कमी वयातील लोकांना सुद्धा हृदया संबंधी आजार होत आहेत. जर तुमचा कॅलेस्ट्राॅल जास्त वाढत असेल तर तुम्ही सफरचंद उकळवुन त्याचे सेवन करु शकता .‌

टरबूज खाण्याचे फायदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

२) दातांना स्वस्थ ठेवण्यासाठी
     

सफरचंदाचे दातांना स्वस्थ ठेवण्यासाठी खुप योगदान आहे. सफरचंदामध्ये एंटीबॅक्टीरीयल आणि एंटीवायरस गुण असतात जे वायरस आणि बॅक्टेरियाला दातांपासुन लांब ठेवतात.

त्याचप्रमाणे सबरचंदामध्ये फाइबर असतो जो दातांना मजबुत ठेवण्यासाठी मदत करतो.‌

३) हाडे मजबुत होतात

जर तुम्ही दिवसाला दोन ते तीन सफरचंदे खाल्लीत तर नक्कीच तुमची हाडे महिन्याभरात मजबुत होतील.

सफरचंदामध्ये खुप प्रकारचे व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असल्यामुळे सफरचंद खाल्ल्यामुळे माणसाची हाडे मजबुत होतात. सफरचंद खाल्ल्यामुळे थकवा देखील कमी होण्यास मदत होते .

४) वजन कमी करण्यास लाभदायक

सकाळ च्या वेळेस सफरचंद खाल्ल्याने तुमच्या शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते.

सफरचंदामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जर तुम्ही सफरचंद सकाळी खाल्लेत तर यामुळे तुम्हाला सारखी-सारखी भुक नाही लागणार.

यामुळे तुम्ही कमी खाल्ल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यासाठी मदत होईल .

An Apple a Day Keeps Doctor Away

५) डोळ्यांची नजर वाढण्यासाठी लाभदायक

सफरचंदामध्ये एंटी – ऑक्सीडेंट , विटामीन – सी , विटामीन – बी आणि फायबर असतात.

जर सफरचंद नियमित खाल्ला तर रात्री च्या वेळेस कमी दिखण्याची समस्या दुर होईल.

त्याचप्रमाणे सफरचंद खाल्ल्याने मोतीबिंदु सारख्या डोळ्यांच्या आजारांपासून देखील बचाव होतो.

सफरचंदाचा खिसुन आणि शिजवून डोळ्यांना लावले तर डोळ्यांचे आजार कमी होतात. अशा प्रकारे सफरचंद हा डोळ्यांसाठी देखील खुप लाभदायक आहे .‌

६) खोकला

जर तुम्हाला खोकला झाला असेल तर तुमच्यासाठी सफरचंद लाभदायक ठरेल. सुक्या खोकल्यासाठी सफरचंद खुप लाभदायक आहे.

यासाठी तुम्हाला सफरचंदाचा एक ग्लास रस काढुन सकाळी प्यावे लागेल.‌‌ जर तुम्ही रोज पिकलेले गोड सफरचंद खाल्लेत तर तुम्हाला त्याचा आणखी फायदा भेटेल.‌

७) एनिमिया दूर होतो

शरीरामध्ये आयरनची कमी झाली की शरीरात अशक्तपणा जाणवायला लागतो. याचा परिणाम शरीरातील रक्तावर होतो.

जर तुम्ही नियमितपणे सफरचंद खाल्लेत तर शरीरात रक्ताची कमी पडणार नाही. सफरचंदामध्ये आयरन खुप मोठ्या प्रमाणात असतो.

यामुळे शरीरातील रक्त देखील साफ होण्यास मदत होते, आणि शरीरात आयरन देखील तयार होतो .

रोगप्रतिकार शक्ति वाढविण्याचे उपाय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

८) कॅंसर पासुन बचाव

सफरचंद फायटोकैमिकल्स आणि एंटीओक्सीडेंट्सचा एक स्त्रोत आहे. हे कॅन्सर ला आणि ट्युमर ला थांबवण्यासाठी मदत करतात.

तसेच कॅन्सर च्या सेल्स देखील नष्ट करतात. महिलांमध्ये सफरचंद खाल्ल्यामुळे कॅन्सरने मृत्युचे प्रमाण कमी झाले आहे.

सफरचंद फुफ्फुस , हृदय , छाती , पोट यासारखे कॅन्सर थांबवण्यासाठी फायदेशीर आहे.

९) दमा‌

जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल तर तुम्हाला सफरचंद खाणे फायदेशीर ठरू शकते. सफरचंद फ्लेव्होनॉइड्समध्ये समृद्ध असतात.

दम्यासाठी फ्लेव्होनॉइड्स फायदेशीर मानले जाते. याम‌ध्ये ॲंटी-दमॅटिक गुणधर्म देखील आहेत, जे दम्याचा धोका कमी करून आपल्याला अधिक चांगले श्वास घेण्यास मदत करतात.

१०) पचनशक्ती सुधारते

सफरचंदात तंतूचे प्रमाण जास्त असते जे पाचनक्रियेस महत्वाचे ठरते. सफरचंद रोज खाणे हे पोटाच्या विकारांना दूर करण्यास सहाय्यक ठरते.

त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. तंतुमय पदार्थ खाल्लेले अन्न अधिक पचनीय आणि मुलायम बनवतो. त्यामुळे ते अधिक गतीने पचतात.

११) श्वासासंबंधी समस्या

आपले श्वसन तंत्र अत्यंत संवेदनशील असते. अनेक लोकांना श्वासघेण्यासंबंधीचा त्रास असतो. अनेक समस्या कोशिकांच्या बिघाडामुळे निर्माण होतात.

श्वास समस्यांमध्ये प्रमुख अस्तमा हा सर्वात अपायकारक असतो. अस्तामाचा परिणाम कमी करण्यासाठी सफरचंद फारच प्रभावशाली ठरतो.

श्र्वास घेण्याचा त्रास असलेल्या लोकांना सफरचंद खाणे फायद्याचे आहे .

केळी खाण्याचे फायदे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

१२) त्वचेसाठी फायदेशीर

सफरचंद आणि मध यांचे मिश्रण दुधात मिळवून त्वचेवर लावल्यास त्वचा चमकदार बनते. सफरचंदामध्ये सापडणाऱ्या प्रतीरोधकामुळे त्वचा अधिक चमकदार बनते.

सफरचंदाच्या फेस मास्कमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरुम, डाग कमी होण्यास मदत मिळते. अशा प्रकारे सफरचंद त्वचेसाठी खुप फायदेशीर आहे.

१३) सुज कमी होते

सफरचंदामुळे सुज कमी होण्यास मदत होते. सफरचंद नेहमी साला सोबत खायला पाहिजे.

रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने सुज कमी होण्यास मदत होते. सफरचंदाच्या सालामध्ये फ्लेवोनोइड क्वेरसेटिन असतो त्यामुळे सुज कमी होण्यास मदत होते.

१४) प्रतिकारक शक्ती वाढते

शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती जास्त असणे गरजेचे आहे. रोज उपाशी पोटी एक सफरचंद खाऊन तुम्ही तुमची प्रतिकारक शक्ती वाढवु शकता.

सफरचंदामध्ये प्रोटीन , विटामीन सी , अन्य पोषक तत्त्व जास्त असतात जे प्रतिकारक शक्ती वाढवतात.

सफरचंद खाण्याचे नुकसान

आपण वरील समासात सफरचंद खाण्याचे फायदे पाहिले त्याच प्रमाणे जास्त सफरचंद खाल्ल्याने शरीरावर त्याचे नुकसान ही दिसून येतात. चला तर मग पुढे सफरचंद खाण्याचे नुकसान पाहूया.

१) वजन‌ वाढते

सफरचंद खुप लाभदायक फळ आहे, पण त्याच्यात कॅलेरीज आणि शुगरचे प्रमाण जास्त आहे. याच्या अधिक सेवनाने वजन जास्त वाढते.

२) एलर्जी

काही लोकांना सफरचंद खाल्ल्यावर एलर्जी होते, यामुळे काही लोकांना ओठांना आणि जीभेला सुज येते याशिवाय तोंडाच्या आजुबाजुला खाज सुद्धा येते.

३) शुगर वाढते

सफरचंदामध्ये फाइबर , कार्बोहाइड्रेट्स आणि इतर पोषक तत्व असतात .‌ कार्बोहाइड्रेट्स चा उपयोग शरीरात ऊर्जेसाठी होतो आणि सफरचंद जास्त खाल्ले तर शुगरचे प्रमाण वाढते .‌

४) पोटदुखी

सफरचंदामधील उच्च फायबर मुळे खुप वेळा गैस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टम मध्ये गॅस निर्माण होतो आणि यामुळे पोटात दुखण्यासारखी समस्या उद्भवते.

Kitchen Videos पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सफरचंद विषयी विचारले जाणारे प्रश्न


सफरचंदाची शेती कुठे केली जाते ?
 सफरचंद जास्तीत जास्त पर्वतीय प्रदेशात आढळतो. सफरचंदाची शेती मुख्यता : जम्मू – काश्मीर , हिमाचल प्रदेश , उत्तराखंड मध्ये केली जाते. काश्मीर‌ सफरचंदासाठी खुप प्रसिद्ध आहे.


सफरचंद खाण्यासाठी योग्य वेळ ?  

तुम्ही‌ सकाळी नाष्टा केल्यानंतर एक तासा नंतर किंवा जेवण झाल्यानंतर एक ते दोन तासानंतर नियमितपणे सफरचंद खाऊ शकता .

आम्ही तुम्हाला या पोस्ट मध्ये सफरचंद खाण्याचे फायदे / Benefits of Apple in marathi याबाबत माहिती दिली . जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेयर करा .

majhimahiti.com

   

4 thoughts on “सफरचंद खाण्याचे फायदे / Benefits of Apple in marathi”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top