साधारण पोटात दुखत असेल तर न घाबरता पोटाच्या समस्या व त्यावरील उपाय घरी करून पहा.यांनी पोटदुखीसाठी नक्कीच आराम मिळेल. potdukhi upay in marathi
आम्लपित्त, बद्धकोष्ठता, पोटात मुर्डी येणे, मळमळ होणे, पोटात आग होणे, ई या पोटाच्या सर्व साधारण समस्या आहेत.
पण कधी-कधी याच समस्यांमुळे आपल्याला खूप त्रास जाणवतो. डॉक्टर कडे जावेसे वाटते, परंतु या समस्यांचे उपाय हे आपल्या घरातच असतात.
टीप : दीर्घ कालीन किंवा जास्त पोटदुखी असेल तर घरगुती उपाय न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
majhimahiti.com
potdukhi upay in marathi
potdukhi upay
अनुक्रम : 1)आम्लपित्त (ऍसिडिटी) 2)बद्धकोष्टता 3)पोटात आग होणे 4)पोटातील गॅस
१) आम्लपित्त ( ऍसिडिटी )
एखाद्याला आपण जर म्हंटल कि तुला आम्लपित्त होत का ? तर तो म्हणेल हे असलं काही नाही आपल्याला,
आणि आता त्यालाच म्हंटल तुला ऍसिडिटी होते का ? तर तो म्हणेल हो ना रोज होते. खूप जळजळ होते आणि त्रास होतो.
आम्लपित्त हे असं दुखणं आहे जे आज-काल सर्वांनाच म्हणजे अगदी लहानांपासून मोठयांना जाणवते.
तर काय असतील ऍसिडिटी होण्यामागची कारणं ते अगोदर पाहू आणि त्यानंतर त्यावरील उपाय जाणून घेऊ.
ऍसिडिटीची कारणे
ज्यांना रात्री खूप वेळ जागन्याची सवय आहे, त्यांना ऍसिडिटीचा त्रास नक्कीच जाणवत असेल.
उशिरा झोपणे आणि लवकर उठणे यामुळे आम्लपित्तचा त्रास वाढतो.
आपण घराबाहेर कामावर, किंवा कॉलेजात गेलो कि कोणी ना कोणी ओळखीचे भेटते आणि चहा हा होतोच.
आणि तोही भरपूर वेळेस आणि चांगला उकळूदे म्हणून सांगितलेला. चहाने तर ऍसिडिटी खूप जास्त वाढते पण ते लवकर लक्षात येत नाही.
तुरीचे वरण खायला तर सर्वांनाच आवडते आणि भातासोबत म्हंटल्यावर तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं.
मात्र तुरीचे वरण खाल्ल्याने हि ऍसिडिटी खूप वाढते.
त्याचप्रमाणे आम्लपित्त हे प्रत्येकाच्या जीवनशैली, खान-पानावर आवलंबून आहे. म्हणून जर हा त्रास जास्त प्रमाणात जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आता हे सर्व झाले कि ऍसिडिटी कश्यामुळे होते. आता यावरील घरगुती उपाय पाहुयात कि जेणेकरून आम्लपित्त चा त्रास थोडा असेल तर त्यावर घरच्या-घरीच उपाय करून त्रासापासून मुक्ती मिळवता येईल.
ऍसिडिटी वरील उपाय
- लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून सायंकाळी प्यायल्याने ऍसिडिटी कमी होते.
- एक कप गरम पाणी व एक चमचा लिंबाचा रस एक-एक तासाने तीन वेळा घेतल्यास लवकर आराम येतो.
- सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर एक-एक लवंग चघळल्याने ऍसिडिटी तुन आराम मिळतो.
- आम्लपित्तास चहा नुकसान कारक असतो. म्हणून जोपर्यंत ऍसिडिटीचा त्रास असेल तोपर्यंत चहा घेऊ नये.
- आम्लपित्ता साठी हरड हे श्रेष्ठ औषध आहे.
- लहान काळी हरड चे चूर्ण दोन ग्राम व दोन ग्राम गूळ मिसळून सायंकाळी जेवणानंतर खाऊन पाणी प्यावे.
2) बद्धकोष्टता
पोट हा शरीराचा अति महत्त्वाचा भाग आहे, आणि त्यामुळेच पोट साफ आणि निरोगी असणे खूप महत्वाचे आहे.कारण भरपूर अशे आजार आहेत जे फक्त पोट व्यवस्थित पोट साफ न झाल्याने जडतात.
काही आजार तर दीर्घकालीन असतात त्यातलाच एक आजार म्हणजे बद्धकोष्टता. ज्याला आपण इंग्लिश मध्ये constipation नावाने ओळखतो.जास्त वेळ न लावता अगोदर जाणून घेऊयात, बद्धकोष्टता होण्यामागची कारणे कोण-कोणती आहेत आणि त्यानंतर त्यावरील घरगुती उपाय.
बद्धकोष्टता होण्यामागची कारणे
दिवसभरातून भरपूर पाणी न पिल्याने अथवा कमी पाणी पिल्याने पोटातील अन्न पचत नाही आणि मग कालांतराने बद्धकोष्टता आजाराचा त्रास सुरु होतो.
दिवस भर एकाच ठिकाणी बसून राहिल्यानेहि हा त्रास जाणवो. त्यामुळे कामावर असताना किमान प्रत्येक तासाला खुर्ची वरून उठून उभे राहावे. अथवा फिरून यावे.ते
तेलकट,तुपकट आणि मसालेदार खायला सर्वांनाच आवडते, परंतु सतत मसालेदार खाल्ल्याने पोटाचे आजार जाणवतात आणि कालांतराने बद्धकोष्टता होते.
भरपूर लोकांना सवय असते काहीही दुखू लागले कि, मेडिकल मध्ये जाऊन पेन किलर गोळी विकत घेतात आणि रोज खातात. पण अशा चुकीच्या पद्धतीने सुद्धा हा त्रास जाणवू शकतो.
बद्धकोष्टता वरील उपाय
- रात्री झोपताना एक कप दुधात उकळलेले एक अंजीर व बिया काढलेली दोन मनुका चांगले चावून खावे.
- सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे त्याने बद्धकोष्टता आजाराला आराम मिळतो.
- पपई फळ पोटासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळेही पोट साफ राहते.
- रात्री झोपताना दुधामध्ये मध मिसळून पील्याने पोट साफ राहते.
- गरम पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ टाकून पिल्याने बद्धकोष्टता त्रास कमी होतो.
- रात्री झोपताना दुधामध्ये एरंडेल तेल मिसळून पिल्याने हा त्रास कमी होतो.
3) पोटात आग होणे
पोटात आग होणे हि सर्वसाधारण समस्या आहे. जी जवळपास कधी ना कधी सर्वानाच जाणवते.अगदीच लहानापासून मोठ्यांना हा त्रास जाणवतो आणि आपण त्याकडे काही खास लक्ष देत हि नाही.परंतु
एखाद्या दिवशी पोटात जास्तच आग होत असेल तर हे खालील घरगुती उपाय करून पहा. त्याअगोदर आग होण्यामागची करणे पाहुयात जेनेकरून आपल्या लक्षात येईल.
पोटात आग होण्यामागची कारणे
पोटात आग होण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मसालेदार आणि तेलकट जेवण.वेळेवर जेवण न करणे हेही एक कारण असते ज्याने पोटात आग होते.
सतत आम्लपित्ताचा त्रास झाल्यानेहि पोटात आग होते आणि जळजळ जाणवते.
जेवण केल्यास पाणी कमी पिणे, हे सर्वसाधारण कारण आहे ज्यांनी हा त्रास जाणवतो.
जास्त तिखट आणि मसालेदार खाल्ल्याने हि पोटात आग होते.जेवण पचन न झाल्यास पोट गच्च होते आणि पोटात आग होते.
आपण वरील समासात पोटात आग होण्यामागची कारणे पहिली आता पोटात आग झाल्यास घरगुतीउपाय काय करता येतील ते पाहुयात. potdukhi upay in marathi
पोटात आग झाल्यास उपाय
- पोटात आग होत असल्यास थोडासा आद्रक चा तुकडा चघळून खावा. याने पोटाला आराम पडेल.
- गूळ खाऊन त्यावर पाणी पिल्याने पोटाचा त्रास कमी होतो.
- जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने पोट फुगणे, आम्लपित्त होणे अशे त्रास होत नाहीत.
- कच्चे सिंगाडे खाल्ल्याने पोटाच्या त्रासाला आराम मिळतो.
- पोटात आग होत असल्यास ओवा खाल्ल्यानेही आराम मिळतो.
4) पोटातील गॅस
पोटातील आजारांचे लक्षणे हि जवळपास सारखीच आहेत परंतु होणार त्रास नक्कीच वेग-वेगळा आहे. मानवी शरीरातील भरपूर आजार हे पोटमुळेच उद्भवतात. त्यामुळे पोटाची निगा राखलीच पाहिजे.
पोटातील गॅस कमी करण्यासाठी गोळ्या औषधे खान ऐवजी हे घरगुती उपाय करून पहा, फरक पडेल. त्याअगोदर पोटात गॅस होण्यामागची करणे पाहूया त्यानंतर उपाय.
पोटात गॅस होण्यामागचे कारणे
भरपूर आणि बळजबरीने जेवण हे एक कारण साधारण आहे सर्वांमध्ये. पाहुण्या ठिकाणी जेवण जास्त झाल्यास पोट गच्चं होत आणि त्यामुळे पोटात गॅस होतात.
रोजच्या धावपळीत जेवणाची निश्चित वेळ नसल्याने म्हणजेच अवेळी जेवण, यामुळेही पोटात गॅस होतात. त्यामुळे जेवणाची रोजची निश्चित वेळ ठरवा.
फास्टफूडचे अति सेवन म्हणजेच पिझ्झा,बर्गरच नव्हे तर वडापाव, सामोसा हे देखील. शक्यतो बाहेरील खाणे-पिणे टाळावे.त्यातल्यात्यात तळलेले पदार्थ पोटाचे आरोग्य बिगडवतात.
पोटात गॅस झाल्यास पोट गुबरते, करपट ढेकर येतात. कधी-कधी हा प्रकार खूप लाजिरवाणा हि होऊ शकतो. त्यासाठी असे कधी झाल्यास खालील घरगुती उपाय करून पहा आराम पडेल.
पोटाच्या गॅसवरील उपाय
- सोडा आणि पाणी घेतल्यास पोटातील गॅस कमी होतात.
- रोजच्या जेवणामध्ये आल्याचा वापर केल्यास गॅस होताच नाहीत.
- लिंबू आणि पाणी मिक्स करून प्या त्यानेही गॅसला आराम पडतो.
- थोडा वेळ आल्याचा तुकडा चावल्यास ढेकर येऊन पोटाला आराम मिळेल.
- दुधाचा चहा, तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत यांनी गॅसेस चा त्रास अजून वाढेल.
पोटाच्या समस्या व घरगुती उपाय विषयी माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रां मध्ये Share करा.
majhimahiti.com