डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

मिसाईल मॅन, पीपल्स प्रेसिडेंट, साईन्टिस्ट, प्रोफेसर, पॉलिटिशिअन, इंजिनीअर, ऑथर डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवनाबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. Dr APJ Abdul Kalam

जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाहीत, तोपर्यंत कोणीही तुमचा आदर करणार नाही.

मिसाईल मॅन ” या नावाने जग प्रसिद्ध असणारे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव ” अवुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम” होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1931 मध्ये ” रामेश्वर ” येथे झाला.

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम

Dr APJ ABDUL KALAM SIR
जन्म : 
१५ ऑक्टोबर १९३१ 

ठिकाण : 
रामेश्वरम, तामिळनाडू

पूर्ण नाव : 
अवुल  पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम 

टोपण नाव : 
मिसाईल मॅन, पीपल्स प्रेसिडेंट

पुरस्कार : 
" भारतरत्न ",  " पद्मभूषण ",
" पद्मविभूषण "," इंदिरा गांधी पुरस्कार ",
"  वीर सावरकर ", ई

पुस्तक : 
विंग्स ऑफ फायर, इग्निटेड माईंड्स, 
इंडिया २०२०

भूषविलेले सर्वोच पद : 
भारताचे राष्ट्रपती ( २००२-२००७ )

मृत्यू : २७ जुलै २०१५, शिलाँग 

मिसाईल मॅन ” या नावाने जग प्रसिद्ध असणारे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव ” अवुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम” होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1931 मध्ये ” रामेश्वर ” येथे झाला.

त्यांच्या आईचे नाव अशीअम्मा जैनुलब्दीन असे होते. एका अतिसामान्य घराण्यात त्यांचा जन्म झाला.

परंतु परिस्थिती कितीही कठीण असली तरी न घाबरता त्याला तोंड देऊन त्यातून मार्ग कसा काढायचा व


आपले स्वप्न कसे पूर्ण करायचे हे त्यांना चांगलं माहीत होतं कारण त्यांची विचारसरणी उच्च असल्यामुळे


लहानपणापासून काहीतरी मोठ करायचंय आहे हा आत्मविश्वास त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत घेऊन गेला.


त्यातून कळत कि परिस्थिती कशी असली, कितीही संकटे आली तरी परिस्थितीच कारण न दाखवता त्यातून मार्ग काढणे म्हणजे स्वप्न पूर्ण करायची पहिली पायरी आहे.

स्वप्न ते नाहीत जे झोपेत येतात स्वप्न ते असतात जे झोपू देत नाहीत.

Dr APJ Abdul Kalam

मोलाचे योगदान

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन विभागांमध्ये विशेष प्रगती करून दाखवली.

भारतातील कित्येक नागरिकांचे आणि तरूण पिढीचे प्रेरणास्त्रोत असलेले

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे २००२ साली भारताचे 11 वे राष्ट्रपती झाले.

भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये अब्दुल कलाम यांनी मोलाचे योगदान दिले.

त्यांनी कठीणातून- कठीण परिस्थितीवर मात करत भारतीय सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक ही ओळख प्राप्त केली.

ही ओळख कधीच नष्ट होऊ शकत नाही वैज्ञानिक संशोधन क्षेत्रामध्ये त्यांनी अग्नी एक, अग्नी दोन, अग्नी तीन, प्रक्षेपणाची निर्मिती केली.अब्दुल कलाम यांनी अनुशक्ती मध्ये भारताला एक वेगळ्याच स्थानावर नेऊन ठेवलं.

अतिशय हलाखीच्या परिस्थितून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले त्यासाठी त्यांनी स्वतः पत्र वाटपाची काम करून त्यातून येणाऱ्या पैशातून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले.रामेश्वर मधील एका प्राथमिक शाळेत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढील शिक्षण रामनाथ पुरम मधील श्रावण हायस्कूल येथून पूर्ण केले.पुढे कॉलेजच्या शिक्षणासाठी त्यांना खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या.

जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाहीत, तोपर्यंत कोणीही तुमचा आदर करणार नाही.

उच्च शिक्षण

इंटरमीडिएट या विषयाचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1950 मध्ये  तिरुचिरापल्ली च्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये बी.एस. सी साठी प्रवेश घेतला.

पुढे बी.एस. सी पूर्ण झाल्यावर कलाम यांनी पुढील शिक्षणासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतला.

कॉलेजमध्ये असताना अब्दुल कलाम यांनी अवकाश संशोधन ज्याला इंग्लिश मध्ये एरोनॉटिक्स असे नाव आहे. या विषयावर डिप्लोमा पूर्ण केला.या डिग्री नंतर ते भारतातील एरोनॉटिक्स लिमिटेड बंगलोर येथे कार्यरत होते तिथे त्यांना काही नवीन गोष्टी देखील शिकायला मिळाल्या तिथे त्यांनी दोन प्रकारच्या इंजिनवर काम केले, एक पिस्टन आणि दुसरा म्हणजे टरबाइन.

या कामावर त्यांना अनुभव अजून वाढत गेला तिथे त्यांना विमानाच्या इंजिनाची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवली होती.

तिथून ते अमेरिकेमध्ये गेले तिथे अब्दुल कलाम यांनी ” नासा ” या संशोधन संस्थेमध्ये स्पेस टेक्नॉलॉजी या विषयावरचार ते पाच महिने अभ्यास केला

1958 ते 1963 संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ प्रशिक्षण सुरू केले.

बघता बघता एका गरीब अतिसामान्य घरातला सामान्य मुलगा पुढे जाऊन भारतीय अतिउत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून त्यांना ओळख मिळाली.

त्यांनी कधीच माघार नाही घेतली त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये भारताला एक वेगळीच दिशा दिली

पुरस्कार

भारतातील सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव कौतुक करण्यात आलं 

Dr APJ Abdul Kalam यांनी खूप कष्ट घेत, मेहनत करत व अभ्यास करून एक उत्कृष्ट वैज्ञानिक होऊन दाखवलं,

त्यांचा वैज्ञानिक क्षेत्राच्या अव्वल कामगिरीसाठी अनेक पुरस्कार मिळाले भारतात सर्वोच्च मानले जाणारे ” भारतरत्न “,” पद्मभूषण “,” पद्मविभूषण “,” इंदिरा गांधी पुरस्कार “,” वीर सावरकर “, इत्यादी या पुरस्कारांचे ते हक्काचे मानकरी आहेत.

एपीजे अब्दुल कलाम यांचा एक सामान्य माणसापासून मोठा महान वैज्ञानिक होण्यापर्यंतचा प्रवास

अतिशय खडतर,प्रेरणादायी, कठीण, आणि संघर्षमय होता. लहानपणापासून ते खूप जिज्ञासू आणि हुशार होते.

ते अविवाहित होते त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये एवढं मुलाच्या कार्यामुळे त्यांना राजकारणाचे दरवाजे खुले झाले.

२००१ पर्यंतच्या काळामध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला. अब्दुल कलाम यांची विचारसरणी अतिशय उच्च होती.  

सूर्यासारखे जगायचे असेल तर सर्वात प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील.

पुस्तके 

या जगात भीतीला स्थान नाही, हे जग केवळ सामर्थ्याचा आदर करते.

स्वप्न ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत.

ही प्रोत्साहित करणारी, ऊर्जा देणारी वाक्य डॉ अब्दुल कलाम यांच्या लेखणीतून आली आहे.

त्यांनी भविष्यातील तरुण पिढीसाठी पुस्तकांच्या माध्यमातून आपले विचारआपल्यासाठी सोडले आहेत.
डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेली काही पुस्तके :

जिद्द, युनाइटेड,
द पावर ऑफ इंडिया, इंडिया-माय ड्रीम, 
द पॉवर वीथीन इंडिया, टर्निंग पॉईंट्स, टार्गेट ३ मिलियन,
माय स्पिरिच्युअल एक्सपेरिअन्स, अ व्हिजन फॉर टुमारोज इंडिया, 
विंग्स ऑफ फायर, इग्निटेड माईंड्स, इंडिया २०२०,ई

अशा कित्येक पुस्तकांमधून खूप महत्वाचे आणि मोलाचे ज्ञान त्यांनी दिले आहे.

अशी उच्च विचारसरणी असणारे डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांनी 27 जुलै 2015 रोजी वर्गात शिकवताना मुलांच्या सहवासातइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शिलॉँग या ठिकाणी बसल्या खुर्चीवर जगाचा निरोप घेतला.

आजच्या लेखामध्ये डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. dr apj abdul kalam आणि वरील लेखांमध्ये काही चुकीचे आढळल्यास आम्हाला लगेच ईमेल द्वारे कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top