“राखी बंध वालो प्यारे भैया राखी लेके आई बहना राखी बंध वालो” असं म्हणत येणारा हा सण पारंपारिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला असून.रक्षाबंधन हा बहीण-भावाचा सण. बहीण या दिवसाची वर्षभर वाट पहाते.आपल्या भारतात रक्षाबंधन चे महत्व खूप आहे आणि ते प्रत्येक कडून जपलेही जाते . Rakshabandhan in marathi
रक्षाबंधन चे महत्व Rakshabandhan in marathi
वर्षभर भाऊ बहिणीने कितीही भांडण, राग रुसवे,फुगवे, नाराजी असे असले तरी रक्षाबंधन हा असा दिवस आहे की, जो सर्वजण आपुलकीने साजरा करून जे काही वर्षभरात घडले ते विसरून अगदी प्रेमाने बहिण भावाला राखी बांधते.
रक्षाबंधन इतिहास
कधी पासून सुरुवात झाली असेल रक्षाबंधन सणाला ? हे जरी माहित नसले तरी पुराणामध्ये रक्षाबंधन या सणाचे वर्णन केले आहे.
देव आणि दानव यांच्या मध्ये युद्ध सुरु होते तेंव्हा भगवान इंद्र हे ब्रहस्पती यांच्याकडे मदतीसाठी गेले.
इंद्र आणि त्यांची पत्नी इंद्राणी हे दोघेही गेले होते. हि सर्व घटना इंद्राणी ऐकत होत्या तेंव्हा त्यांनी इंद्र यांचा हातामध्ये मंत्र शक्तीच्या साहाय्याने एक रेशमी धागा बांधला आणि याच दिवशी श्रावण पौर्णिमा होती म्हणून त्या दिवसापासून लोकांची अशी समजूत झाली कि,
मंत्र शक्ती केलेला धागा बांधल्यानेच इंद्र यांना लढाईत विजय मिळाला. त्या दिवस पासून श्रावण पौर्णिमेच्या दिवशी हातात धागा म्हणजेच रक्षाबंधनाची प्रथा सुरु झाली.
फोटो राखी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.
रक्षाबंधन का साजरी केला जातो?
आता लवकरच रक्षाबंधन येणार आहे. रक्षाबंधन येणार-रक्षाबंधन येणार असे ऐकूनच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमठायला लागते.
रक्षाबंधन येणार या विचारानेच मन प्रसन्न होते,लेकी बाळी ला माहेरी जायला भेटते.भाऊ आणि बहिणीचे नातं एवढा अनमोल असतं,
की ते आपण शब्दात मांडू ही शकत नाही. भाऊ आणि बहिणीचे नातं एवढं पवित्र असतं की त्याचा सन्मान प्रत्येक जण करतो.
कदाचित असं कोणीच नसेल की ज्यांना माहिती नसेल की रक्षाबंधन काय आहे आणि तो कसा साजरी केला जातो ?
भाऊ व बहिणीची बॉण्डिंग ही पूर्णतः युनिक असते. यावर्षी रक्षाबंधनाचा सण 22 ऑगस्ट रविवारी आला आहे.
रक्षाबंधन कशी साजरी करतात ?
रक्षाबंधनला ‘ बहीण भावाला रीतसर ओवाळते, अगोदर कुंकवाचा टिळा लावून त्यावर तांदूळ लावते. आणि मग आपल्या भावाला खूप प्रेमाने राखी बांधते, यावेळी दोघेही भावुक होऊन जातात.
बहिणीने औक्षवंत केल्यावर भाऊ दिव्याच्या ताटात भेटवस्तू किंवा पैसे टाकतो,
असे मानले जाते की कोणी आपल्या बहिणीला पैसे, कोणी ड्रेस, बांगड्या, नेकलेस, कोणी कॉम्प्युटर गिफ्ट देत तर कोणी मोबाईल बहिणीचे ताट औक्षवंत केल्यावर रिकामे जाऊ नये.
रक्षाबंधनाचा खरा अर्थ तर त्याच्या नावातच आहे ‘ रक्षा ‘आणि ‘ बंधन ‘ या दोन नावावरूनच आपल्याला सर्व काही अर्थ समजून जातो.
भाऊ हा सदैव बहिणीची रक्षा करीत असतोच; परंतु वर्षातून एकदा येणार्या रक्षाबंधन सणातून बहीण भावाला जाणीव करून देत असते, की
” भाऊ तूच आहेस माझा पाठीराखा.” रक्षाबंधनाच्या सणाला बहिण भावालाच नव्हे तर, मामा- भाचीला, पुतणी – काकाला, लेक – मावश्याला, आपल्या मावस भाऊ, चुलत भाऊ, मानलेल्या भावांना राखी बांधू शकते.
रक्षाबंधनाच्या दिवशी साधा धागा जरी बांधला तरी तो लाख-मोलाचा मानला जातो, परंतु
आजकाल बाजारात नवनवीन प्रकारच्या राख्या उपलब्ध असतात. त्यावर छान- छान डेकोरेशन, डिझाईन आणि ‘ प्यारे भैया, प्रिय दादा, प्रिय भाऊ ‘
असे लिहिलेले देखील असते. लहान मुलांसाठी मस्त कार्टूनच्या राख्या सुद्धा भरपूर येतात.
फोटो राखी कॉम्बो खरेदी करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.
तयारी रक्षाबंधनाची
रक्षाबंधनाचा जसजसा सण जवळ येत जाईल तसतसा महिनाभर अगोदर पासूनच बाजारात ग्राहकांची झुंबड व्हायला लागते.
व्यापारी लोक आपापले दुकाने रोडावर मांडून बसतात. मन आकर्षून घेणारी अशी एकशे एक राखी बाजारात विकली जाते.
लहान मुले मिठाईचा आस्वाद घेतात, त्यांना मामाच्या गावाला जायला भेटतं, मजा करायला भेटते, मग नवीन कपडे आणि बस धमाल….
शाळकरी मुले व मुली शाळेतच रक्षाबंधनाचा सण साजरी करतात. मुली मुलांना, सरांना व मॅडम सरांना, हेडमास्टर, प्रिन्सिपल यांना राखी बांधते.मुले मुलींना वही, पेन, पेन्सिल, खोडरबर,चॉकलेट गिफ्ट देतात अशा भेटवस्तू म्हणून देतात.
रक्षाबंधनाच्या दिवशी रविवार असेल किंवा शाळेला सुट्टी दिली असेल तररक्षाबंधनाच्या एक दिवस अगोदर किंवा नंतर देखील राखी बांधतात.
ज्यांना भेटणे शक्य होत नाही ते Happy Rakshabandhan असे मेसेज पाठवतात
आपले पूर्वज तर सांगत असतात, रक्षाबंधन हा सण पूर्ण ऑगस्ट महिनाभर असतो. रक्षाबंधनाला स्त्रिया, मुली हातावर छान मेहंदी काढतात ,
सकाळी लवकर उठून अंगणात मोठी रांगोळी टाकतात, नवीन कपडे घालतात. लग्न झालेल्या बायकांना माहेरा वरून भाऊ मुराळी येतो.
रक्षाबंधनाला बायकांना माहेरी जायला मिळतं. भाऊ बहिणीला साडी घेतो. बाहेर फिरायला नेतो तिच्या पसंतीच्या वस्तू तिला घेऊन देतो.
बंधन प्रेमाचे
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला किंवा भावाला जर काही कारणास्तव भेटता येत नसेल, तर अशा वेळेस बहीण आपल्या लाडक्या भावाला पोस्टाने राखी पाठवते.
आणि ज्या वेळेस त्यांची भेट होईल तेव्हा पुन्हा ती आपल्या भावाला राखी बांधते.
बहीण-भावाचं नातं आहेच एवढं घट्ट कि लहानपणी ज्या बहिणीला आपण खेळतक मारायचो, आई-बाबांना सांगून तिला त्यांच्याकडून मर बसवायचो,
बोलणे खाऊ घालायचो तीच बहीण आपल्या भावाला भेटण्यासाठी अगदी उतावळी असते.
कधी माझा भाऊ येईल आणि कधी मी त्याला राखी बांधून स्वतःच्या हातानी केलेला गोड खाऊ घालेल.
श्रावणी
रक्षाबंधन हा सण प्रामुख्याने मराठी महिन्यातील श्रावण या महिन्यात आल्याने या सणाला श्रावणी असेही म्हणतात.
या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्याची प्रथा हि खूप पूर्वी पासून चालत आलेली आहे, आणि हा सण साजरा केल्याने घरातील वातावरणंही अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित असते.
या सणामुळे आप-आपसातील भांडण-तंटे दूर होतात.वर्षभरातील राग-रुसवे निघून जातात.
घरात सर्वांचा चेहऱ्यावर आपुलकी आणि समाधान पाहायला मिळते. Rakshabandhan in marathi
आपण लहान आसनी सतत आपल्या आत्या आणि वडिलांमध्ये किंवा आपली आई आणि मामा यांत कुरबुर होत असतायची प्रत्येकाचे कारण हे वेग-वेगळे असायचे. भेटले कि सतत तक्रारी आणि बडबड. कधी-कधी तर हि भांडणे खूप जास्त वाढायची म्हणजे दोघेही एकमेकांचे तोंड पाहणार नाही इतपर्यंत शपत घ्यायचे आणि एक-मेकांना बोलणे त्या दिवशी पासून बंद व्हायचे.आणि जशी रक्षाबंधनाची तारीख जवळ यायची त्या वेळेस आपली आई सतत कॅलेंडर चालायची किती दिवस राहिले अजून,तिला खात्री असायची काहीही झाल तरी माझा भाऊ येईल आणि माझ्या हातून राखी बांधून घेईल. मी त्याला माझ्या हातच गोड-धोड घायला घालीन. त्याच प्रमाणे बाबा आणि आत्याचं असायचं.. कारण हे नातंच एवढं घट्ट आहे कि अश्या छोट्या-मोट्या घटनांनी या नात्यावर काहीही फरक पडत नाही.
रक्षाबंधन कशासाठी ??
रक्षाबंधन या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे. बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भावाकडून वाचन घेते कि तूच माझी रक्षा करणार. आणि भाऊ हि या बंधनातून आपल्या बहिणीला वाचन देतो कि परिस्तिथी काहीही असो मी तुझी प्रत्येक अडचणीत तुझी साथ देईन,प्रत्येक वाईट गोष्टींपासून तुझी रक्षा करेन. थोडक्यात रक्षा करण्यासाठी बांधलेलं बंधन. मग हे बंधन फक्त भावालाच नाही तर मुली आपल्या वडिलांना, मामा,चुलते आणि प्रत्येक अशी अशी व्यक्ती जी तिला जवळची आणि प्रेमाचं असते, अशा सर्व व्यक्तींना ती हे रक्षेच बंधन बंधू शकते.
भावाच्या हातात राखी बांधताना प्रत्येक बहीण हि आपल्या भावाच्या प्रगतीची, सुरक्षेची, आरोग्याची, सुख-शांती आणि समृद्धीची प्रार्थना करत असते.
फाटक राखी बांधण्या पुरतेच नव्हे तर नेहमीच ती आपल्या भावासाठी देवाकडे त्याच्या चांगल्यासाठी प्रार्थना करत असते.
आणि याप्रमाणेच भावाचे देखील असते. असे म्हणतात कि भावाचे लाग झाले कि तो बहिणीपासून थोडासा लांबवतो परंतु असे काहीही नसते.
प्रत्येक भाऊ हा आपल्या बहिणीवर मनापासून प्रेम करत असतो. त्याला नेहमी आपल्या बहिणीची काळजी असते.
रक्षाबंधन चे महत्व Happy Rakshabandhan
तिला काही अडचण असेल, काही त्रास होत असेल तर तो भाऊच असतो जो सर्वात अगोदर तिला भेटून तिची विचारपूस करतो.
काही वेळेस अशीही परिस्तिथी असते कि हे दोघेही एक-मेकांशी बोलत नाहीत. आणि कधी-कधी परिस्तिथी अशी असते कि
बोलत असूनही मनातले बोलता येत नाही, पण याचा अर्थ असा मुळीच नाही होत कि भाऊ हा आपल्या बहिणीवर प्रेम करत नाही.
तो नेहमीच करतो, मनामध्ये बहिणी विषयी खूप काळजी असते कि माझी बहीण कशी आहे, तिला काही अडचण तर नसेल ना अशे जाऊन
विचारावे वाटते पण कित्येक वेळा ते जमत नसते. रक्षाबंधन चे महत्व Rakshabandhan in marathi