१५ ऑगस्टचे महत्व 15 August in marathi

Share with 👇 Friends.

आज जाणून घेणार आहोत १५ ऑगस्ट चे महत्व काय आहे.15 August in marathi लहानपणी शाळेत असताना १५ ऑगस्ट च्या २ दिवस अगोदर पासूनच आपली तयारी सुरु व्हायची.

शाळेचा ड्रेस स्वच्छ धुवून त्याला इस्त्री करून ठेवायचा, कोनाचा तर नवीन ड्रेस घेण्यासाठी हट्ट तर कोणाचा नवीन बूट घेण्यासाठी.

शाळेमध्ये विविध उपक्रम असायचे, त्याची तयारी करायची. शाळेत, ग्रामपंचायतीत पताके, झिरमाळ्या,चिटकवण्याची अगदी झुंबड असायची.

हे सर्व करत असताना आपल्याला १५ ऑगस्ट म्हणजे एखादा सणच वाटायचा आणि तो आपल्यासाठी आहे सुद्धा,

परंतु त्या मागचे खरे महत्व काय आहे, हे मात्र लहानपणी नक्कीच भरपूर जणांना माहित नव्हते.

चला तर मग आज जाणून घेऊयात १५ ऑगस्ट चे महत्व काय आहे.15 August in marathi

१५ ऑगस्ट चे महत्व Importance of 15 August in marathi

१५ ऑगस्ट हा दिवस आपण “स्वतंत्रता दिवस” म्हणून साजरा करतो.

सर्वच देश हे पूर्वी कोणत्या न कोणत्या तरी कम्म्युनिटीचे गुलाम होते. त्याच प्रकारे आपल्या भारत देशावर इंग्रंजांचे २०० वर्षे राज्य होते.

जे त्यांची चाकरी करत, त्यांना वेगळी वागणूक आणि जे त्यांचे ऐकण्यास मनाई करत त्यांच्यावर ते जुलूम,अत्याचार करत .

याच सर्व अन्यायापासून भारताला १५ ऑगस्ट दिवशी इंग्रजांपासून स्वतंत्र मिळाले. म्हणून १५ ऑगस्ट हा दिवस आपण “स्वतंत्रता दिवस” म्हणून साजरा करतो. कारण याच दिवशी आपण इंग्रजांपासून स्वतंत्र म्हणजेच आजाद झालो होतो. १५ ऑगस्ट ला इंग्रजी मधून “INDEPENDENCE DAY” म्हणतात.

याच जुलमी इंग्रजांच्या तावडीतून आपल्या भारत देशाची सुटका करण्यासाठी सर्व भारतीयांनी एकजूट होऊन लढा दिला,

इंग्रजांनी आपल्या लोकांवर खूप अन्याय केले, त्यांना चुकीची वागणुग दिली, इंग्रजांपासूनच आपल्या समाजामध्ये भेदभावाची तेढ निर्माण झाली.

स्वतंत्रता घोषणा

आपला भारत देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला हि घोषणा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट येथे भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकावला. त्यांनी हि घोषणा करताना संपूर्ण भारत वासियांना संबोधित केले.पंडित जवाहरलाल नेहरू हे पुढे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले.

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल,चंद्रशेखर आझाद, मौलाना अबुल कलाम आझाद, खुदिराम बोस, लोकमान्य बालगंगाधर टिळक, लाल लजपत राय,गोपाळ कृष्ण गोखले, आणि भरपूर महान व्यक्तींनी देशासाठी आपले सर्वस्व त्यागले. आणि आझाद भारत वर्षाचे स्वप्न साकार केले. या असंख्य वीरांमुळेच आपण आज आजाद भारतात मोकळा श्वास घेऊ शकत आहोत.स्वतंत्र वीरांचे शौर्य, चातुर्य आणि बलिदान आपण कधीही विसरू शकत नाहीत. यासाठीच

१५ ऑगस्ट च्या दिवशी राष्ट्रगीत गायिल्यानंतर सर्वजण राष्ट्रीय प्रतिज्ञा घेतात.

भारतीय राष्ट्रीय प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करिन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मन ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यातच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद
१५ ऑगस्टचा उत्साह

१५ ऑगस्ट हा दिवस आपल्या साठी खूप उत्साही आणि देशभक्ती पूर्वक दिवस असतो.दिवस भर सगळीकडे देशभक्ती चे गाणे ऐकायला मिळतात, शाळांमध्ये विविध कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात.मुलांची तर सकाळी ५ वाजल्यापासून तयारी सुरु होते. सकाळीच उठून अंघोळ करून,

इस्त्री केलेला गणवेश घालून,हातामध्ये तिरंगा घेऊन लगबगीने शाळेत जायची घाई करतात.तिरंग्याला मानवंदना देऊन झाल्यावर प्रतिज्ञा होते.

देशभक्ती पर भाषण स्पर्धा होतात, गीत गायिले जातात.विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप केले जाते.

दिवस भर उत्साहाने संपूर्ण गाव बहरून जातो. संध्याकाळच्या वेळेला गायन आणि डान्सच्या स्पर्धा घेतल्या जातात. घरासमोर-दुकानासमोर मोठं-मोठ्या रांगोळ्या काढून देशाला नमन केले जाते. 15 August in marathi

भारताला स्वतंत्र कधी मिळाले?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला संपूर्ण स्वतंत्र मिळाले

१५ ऑगस्ट २०२१

भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र होऊन ७४ वर्ष झाली. या वर्षी स्वतंत्रता दिवसाची थिम “नॅशन फर्स्ट, अल्वेस फर्स्ट” ठेवण्यात आली आहे. परंपरेनुसार 15 august या दिवशी जो कि रविवारी आहे, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे लाल किल्ला येथून संपूर्ण राष्ट्राला संबोधित करतील. सलग आठव्यांदा श्री.नरेंद्र मोदी हे लाल किल्ला येथून भाषण करतील.या वर्षीचे टोकियो ऑलम्पिक मधील पदक विजेता आणि ऍथलेटिकस यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. मागच्या वर्षी प्रमाणेच कोरोनाच्या महामारीमुळे लोकांना या ठिकाणी प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे.आणि कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. तर सर्वांनी घरी राहूनच आपल्या देशाला आणि तिरंग्याला सलामी द्यायची आहे.

एकता

भारत हा देश विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात विभिन्न प्रकारचे लोक राहतात, अनेक जाती, धर्म

या दिवशी संपूर्ण भारत भर राष्ट्रगीत गायिले जाते. देशभक्ती पर गीत ऐकले जातात. हा एकमेव असा सण आहे,

विविधता असताना एक सण आहे जो सर्वच जण मोठ्या उत्साहाने साजरा करतात तो म्हणजे “स्वतंत्रता दिवस”.

वेग-वेगळ्या भागात अनेक सण-उत्सव साजरे होतात. ते त्या भागावर अवलंबून असते. परंतु एवढ्या सगळ्या मध्ये

त्यांचे विचार वेग-वेगळे. भारत हा एकमेव असा देश आहे कि येथे एवढ्या प्रकारच्या विभिन्नता आढळतात,

सर्वांच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या त्याप्रकारे

त्यांच्या अनेक भाषा, बोली त्याप्रकारे त्यांचे राहणं-सहन, पोशाख.

एवढ्या सर्व विभिन्नता असून देखील विविधतेत एकता दिसून येते.

दिवसभरातील घडामोडी

आपल्या घरामध्ये ज्या प्रमाणे पहाटेच १५ ऑगस्टची तयारी सुरु असते त्याच प्रमाणे संपूर्ण भारतभर हा शौर्याचा दिवस सगळीकडे उत्साहाने साजरा करण्याची तयारी सुरु असते.भारताचे पंतप्रधान दिल्ली येथील लाल किल्ला या ठिकाणी ध्वजारोहण करतात.आकाशात फायरिंग करून सैनिकांकडून तिरंगी ध्वजाला सलामी दिली जाते.हा संपूर्ण क्षण रोमहर्षक असतो. पाहताच क्षणी अंगावर शहारे येणारा असतो. भारतीय जवान या ठिकाणी विविध प्रकारच्या कवायती करून दाखवतात, तलवार चालवण्याचे चातुर्य सादर करतात.त्याचप्रमाणे विविध कला सादर करतात. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण टीव्ही वर आपल्याला पाहण्यास मिळते.

१५ ऑगस्ट – स्वतंत्रता दिवस आपला राष्ट्रीय सण आहे जो कि संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. पण या दिवसासाठी अनेक शूर-वीरांनी आपले प्राण दिले. अनेकांनी इंग्रजांच्या कोठड्या भोगल्या, इंग्रजांचे अन्याय-अत्याचार सहन केले, त्यांच्या अथक परिश्रमानंतर 15 august 1947  रोजी भारताला स्वतंत्र मिळाले.त्या सर्व शूर-वीरांना शत-शत नमन.

तिरंगा

तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तिरंग्या विषयी खूप प्रेम आहे आणि प्रत्येक जण तिरंगी ध्वजाचा सन्मानही करतो. यामध्ये ३ रंग आहेत सर्वात वरच्या भागात केशरी , मधोमध पांढरा, खालच्या भागात हिरवा आणि मधोमध निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे ज्यामध्ये २४ आऱ्या असतात.

केशरी - धैर्य, कर्तृत्व आणि साहस याचे प्रतीक आहे.

पांढरा - शांती, पावित्र्य आणि सत्याचे प्रतीक आहे.

हिरवा - समृद्धी, विश्वास, प्रगतीचे प्रतीक आहे.

अशोक चक्राचा निळा रंग - सागराप्रमाणे निळे व अथांग आहे.
 
अशोक चक्र - संयम, आरोग्य, त्याग, सेवा, प्रेम, मैत्री, बंधुत्व, संगठन,
      समृद्धी, उद्योग,सुरक्षा, नियम, समता, नीती, न्याय, 
      सहकार्य,कर्तव्य, अधिकार आणि बुद्धिमत्ता.

भारताला स्वतंत्र मिळण्या अगोदरच २२ जुलै १९४७ रोजी भारतीय संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय ध्वजाला सर्वांनी स्वीकृत केले होते.आंध्रप्रदेश मधील पिंगली वैंकैया यांनी हा तिरंगा बनवला होता. राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकविण्याचे काही नियम आहेत त्यानुसारच तो फडकावला जातो.राष्ट्रीय ध्वज संहिता हा कायदा आहे. यामध्ये तिरंग्याचा अपमान झाला असेल तर अपमान करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगाची सजा भोगावी लागू शकते.

तिरंगा काही नियम
 • तिरंगा कॉटन किंवा खादीच्या कापडाचा असावा.
 • प्लास्टिकचा झेंडा बनवायला साफ मनाई आहे.
 • याचा आकार आयताकार असतो.
 • तिरंग्याचे प्रमाण हे ३:२ या प्रमाणात असते.
 • अशोक चक्रामध्ये २४ आऱ्या असतात.
 • कोणत्याही परिस्थिती तिरंगा जमिनीवर पडता काम नये. हा तिरंग्याचा अपमान असतो.
 • दुसरा कुठलाच झेंडा हा तिरंग्याच्या उंचीच्या वर किंवा बरोबरीने लावता येत नाही.
 • राष्ट्रीय ध्वज बनवण्याचा भारतातील परवाना असलेले एकमेव ठिकाण हे बंगरुळु पासून ४२० km अंतरावर हुबळी या ठिकाणी आहे.

देशासाठी शहीद होणारे सैनिक आणि महान व्यक्ती यांना तिरंग्यामध्ये गुंडाळले जाते. यादरम्यानकेशरी रंग डोक्याकडून आणि हिरवा रंगाची पट्टी पायाच्या दिशेने असली पाहिजे.शव जाळल्यानंतर किंवा पुरल्यानंतर गोपनीय पद्धतीने तिरंगाला सम्मान पूर्वक वजन बांधून पवित्र नदीमध्ये जलसमाधी दिली जाते.

मी एक भारतीय आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Takeoff pics Day of the Dead Avatar movie release date 10 Most Interesting things about Virat Kohli memories of aaron carter facts about palak muchhal interesting facts about total lunar eclips Interesting facts about Hardik Pandya CMA Awards 2022 Story of Lindsay Lohan