तुझी तुलाच पुरी करायची / Tuzi Tulach Puri karaychi viral song

Share with 👇 Friends.

तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची ही व्हायरल कविता या लेखात पाहूया. नक्की वाचा व कवितेचा अर्थ समजून घ्या. Tuzi Tulach Puri karaychi viral song

Tuzi Tulach Puri karaychi viral song

तुझी तुलाच पुरी करायची

    हौस आकाशी उंच उडायची..

गड्या तयारी ठेव मनाची

    कधी झुकायची कधी नडायची..

दुनिया डोक्यावर घेणार हाय र

    तुला उचलून घेणार हाय र..

दुनिया डोक्यावर घेणार हाय र

    तुला उचलून घेणार हाय र..

आला जरी कधी कठीण क्षण तो

          खंबीर उभ तू ऱ्हायचं.. 

  गड्या खंबीर उभ तू ऱ्हायचं..

हटायचं नाय गड्या झटायच

    पुढ पुढ तू चालत जायचं

    पुढ पुढ तू चालत जायचं

ताज्या दमाचं तरुणाईच

        मिळालं रे वरदान..

  तुला मिळालं रे वरदान..

रेशमी कापड हातात तुझ्या

        करू नको बारदान..

  त्याच करू नको बारदान..

आईबापाच्या पायावर डोकं

      बाकी जगाशी ऱ्हा रोकठोक

अगदी नाही असं पण नाही

    साथीला शिल्लक चांगली लोक 

सलामी झुकून 

    सलामी ठोकून 

      सलामी वाकून 

          देणार हाय र..

तुला उचलून घेणार हाय र

दुनिया डोक्यावर घेणार हाय र..

      तुला उचलून घेणार हाय र..

मोबाईलवर ऑनलाईन व्हिजिटिग कार्ड बनवा

..

majhi

..

आजच्या लेखामध्ये Tuzi Tulach Puri karaychi viral song या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.


Share with 👇 Friends.

1 thought on “तुझी तुलाच पुरी करायची / Tuzi Tulach Puri karaychi viral song”

  1. कविता खूप छान आहे त्याचा अर्थ खूप मस्त आहे पगारे

    Reply

Leave a comment