उद्योजिका मीनाक्षी निकम यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या शब्दात / Swayamdip – Minakshi Nikam

तुमच्या मित्रांना 👇 शेअर करा.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजिका मीनाक्षी निकम यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या शब्दात / Swayamdip – Minakshi Nikam

पोटासाठी हाती घेतला सुई दोरा आणि बनली उद्योजिका,

Swayamdip – Minakshi Nikam

अस म्हणतात स्वतःच पोट भरन सोपं असत पण दुसऱ्याच पोट भरता आलं पाहिजे,

मला स्वतःच पोट भरणही शक्य नव्हतं, जन्मापासून दोन्ही पाय पोलिओने निकामी,

वयाच्या बाराव्या वर्षी पितृछत्र हरपले, वडील गेले आणि कुटुंब दगमगल,

आई आजारी, मी घरात मोठी. चार भाऊ बहीण लहान, गरिबी असल्यामुळे एवढ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ?

म्हणून मी शिलाई मशीनचा आधार घेतला, हात मशीनच्या साह्याने शिवण काम करण्यास सुरुवात केली,

जिद्द चिकाटी आणि संघर्ष

प्रशिक्षण घेण्याची परिस्थिती नाही, प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर पडता येत नव्हते,

हे सगळे स्वअनुभवामुळे घरात राहणाऱ्या माझ्या दिव्यांग मुलींवर काय वेळ असेल हा विचार तेव्हा होता,

पण तेव्हा स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी होती, म्हणून रात्रंदिवस मशिनवर गोधडी शिवून कुटूंबाचे पोट भरले.

जिद्द चिकाटी आणि संघर्ष, काम करण्याचा अट्टाहास बघून एक महिला मला शिवण प्रशिक्षण देण्यासाठी घरी येऊ लागल्या.

सगळं प्रशिक्षण घेऊन माझा शिवण व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू झाला. मदतीला गरजू महिला घेऊन त्यांनाही रोजगार मिळू लागला.

15 वर्ष कुटुंबासाठी दिले, कुटुंब उभे राहिले मग विचार केला –

आता फक्त माझ्या दिव्यांग समाजासाठी.

पुनर्वसनाचे काम सुरू झाले. हे करत असताना लक्षात आले माझ्या सारख्या अनेक दिव्यांग भगिनी घरात बसून आहेत,

त्यांना शिवण प्रशिक्षण द्यायचे, प्रशिक्षण देऊनही आत्मिक समाधान मिळत नव्हते.

त्यांना रोजगार दिल्याशिवाय त्या प्रशिक्षणाचा उपयोग नाही म्हणून स्वतः ड्रेपरी व्यवसाय सुरू केला.

त्यात काहीच महिलांना रोजगार मिळायचा.

उनिफाम युनिट

महिलांची संख्या वाढली. करायचे काय ? एवढं काम आणायचे कुठून ? हा प्रश्न सतावत होता.

40 दिव्यांग महिलांसाठी मग उनिफाम युनिट सुरू केले. हे शहरी दिव्यांग महिलांसाठी शक्य होत होते पण ग्रामीण भागातील अतितीव्र दिव्यांग मुलींसाठी निवासी व्यवस्था म्हणून निवासी केंद्र सुरू केले.

या निवासी फक्त 20 महिला राहू शकतात, त्यांना तिथे मोफत राहणे खाणे सगळी व्यवस्था होते.

तिथेच त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला जातो.

majhimahiti.com

जिल्हा उद्योग जळगाव ,उद्योग समूह कडून स्वयंदीप ची दखल घेतली गेली आणि,स्वयंदीप गारमेंट क्लष्टरला 9 फेब्रुवारी 2019 रोजी मंजुरी दिली,

स्वयंदीप क्लष्टर साठी MIDCत प्लांट P,7 चाळीसगाव मध्ये 25 हजार cm जागा 3 मार्च 2020 रोजी पजेशन मिळाले.

आता स्वयंदीप क्लष्टरचे बांधकाम पूर्ण झाले आहे व काम सुरळीत चालू आहे.

सांगण्याचा उद्देश एवढाच

या सगळ्या प्रवासात संवेदशील समाज मिळाला म्हणून आज 100 महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. यात 40 दिव्यांग 60 विधवा आहेत.

ABP माझा चा कार्यक्रम - माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमात मिनाक्षीताई निकम

Swayamdip – Minakshi Nikam

मीनाक्षी निकम यांचा खडतड प्रवास 👈 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तुमच्या मित्रांना 👇 शेअर करा.

Leave a comment