शेयर मार्केटची माहिती / Share market in marathi

Share with 👇 Friends.

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेयर मार्केटची माहिती Share market in marathi

Share market in marathi

शेयर मार्केट विषयी तर आपण सर्व जण ऐकून आहोतच, आपल्या पैकी बरेच जण त्यावर ट्रेडिंग देखील करत असतील.

आपल्याला त्याबद्दल माहिती नसल्यामुळे मनामध्ये भरपूर प्रश्न आहेत, त्यामुळे थोडक्यात आणि सोप्या भाषेतआम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे,

या वर अजून माहिती पाहिजे असल्यास कंमेंट करून सांगा.

31 ऑगस्ट 1957 साली Bombay Stock Exchange ला मान्यता मिळाली.

शेयर मार्केटची माहिती

माहितीगारांच्या म्हणण्यानुसार शेयर मार्केट हि एवढी मोठी पैशांची विहीर आहे कि जेथे खूप जण आपली पैशांची तहान भागवू शकतात.

पण शेयर मार्केट मध्ये जोखीम हि आहे. त्यामुळे या क्षेत्रात येण्या अगोदर शेयर मार्केट विषयीची संपूर्ण माहिती घेऊनच ट्रेडिंग करण्यास सुरुवात करावी.

कारण आपल्या मेहनतीचे पैसे आपण येथे लावणार आहोत आणि ते जर असेच माहिती अभावी आपण गमावणार आहोत,

हे माहिती असूनही ती चूक करून एखाद्या व्यक्तीला दोष देण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये.

समजा आपल्याला एखादा उद्योग चालू करायचा आहे, तर तो उद्योग चालू करण्याआधी आपण त्याविषयीची सर्व माहिती अगोदर गोळा करतो.

त्यासाठी भांडवल किती लागेल ? कोठे उद्योग चालू केल्यावर त्याला चालना मिळेल ? दुकानात ठेवायच्या वस्तू कोण-कोणत्या ठेवता येतील,

ज्या ग्राहकांना आवडतील, या उद्योगातून मिळणार नफा किती असेल ? आणि असेच भरपूर प्रश्नांविषयीची माहिती आपण अगोदर गोळा करतो.

मग शेयर मार्केट च्याच बाबतीत एवढा हलगर्जी पणा का करतात भरपूर जण ?

एवढ्या मेहनतीने कमावलेलं पैसे माहिती नसल्यामुळे आपण पाहत असताना आपल्या डोळ्यांसमोर डिमॅट अकाउंट मधून वजा होतात आणि

आपण माहिती अभावी काहीच करू नाही शकत. त्यामुळेच शेयर मार्केट विषयीची किमान बेसिक माहिती घेऊनच याक्षेत्रात यावे.

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Share market information

शेयर मार्केट समजून घेण्यासाठी अगोदर त्या मधील काही टर्म्स आहेत त्या समजून घेऊया.

 • Share
शेयर विकत घेणे म्हणजे एखाद्या कंपनीचा काही हिस्सा विकत घेणे

आपण ज्या कंपनीचे शेयर विकत घेतो.

त्या कंपनी चे आपण भागीदार होतो. म्हणजेच त्या कंपनी चे मालक होतो.

जेवढे जास्त shares , तेवढी जास्त मालकी .मार्केट च्या चड-उतारा मुळे Shares चे भाव कमी जास्त होतात.

दिवसातून करोडो शेयर्सची हेरा-फेरा होते. आणि शेयर्सचा माध्यमातून करोडो रुपयांची सुद्धा.

 • Share Holder
शेयर होल्डर म्हणजे जे कंपनी कडून Shares विकत घेतात, त्यांना Share Holder म्हणतात.

share होल्डर हि एखादी व्यक्ती असू शकते अथवा एखादी संस्था हि असू शकते.

थोडक्यात सांगायचे झालेच तर शेयर होल्डर जेवढे जास्त shares कंपनी कडून विकत घेतात, तेवढे जास्त ते त्या कंपनीचे मालक बनतात.

 • Portfolio
पोर्टफोलीओ म्हणजेच अशी जागा जेथे आपण घेतलेल्या shares हिशोब ठेवला जातो.

आपण किती Shares विकत घेतले आणि ते किती रुपयांना घेतली, सध्या किती नफा झाला किंवा तोटा झाला,

दिवस भरतील मार्केट मधील आपल्याला सर्व shares चा मिळून किती फायदा झाला, हे सर्व एकाच जागी आपल्याला समजते.

आत्तापर्यंत ची आपल्या खात्यामधील शेयर्स ची येकुण रक्कम. या रक्मेमधून किती फायदा होतोय,किती तोटा होतोय.

हे सर्व तपशील पोर्टफोलिओ मध्ये आपल्याला दिसत असते.

 • Primary Market –

हे एक असे मार्केट आहे ज्या ठिकाणी नवीन शेअर्स issue केले जातात. आणि हे शेअर्स डायरेक्ट कंपनी कडून विकत घेतले जातात.

म्हणजेच शेअर्स विक्री झाल्यावर कंपनीला डायरेक्ट पैसे भेटतात. पण हे सर्व कारण असताना सगळ्यात अगोदर शेयर मार्केटची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

आम्ही तर या ठिकाणीकाही बेसिक कन्सेप्ट समजावण्याचा प्रयत्न केला आहेच, पण या व्यतिरिक्त आपणास जर अजून काही माहिती हवी असेल तर

आपण खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता.

IPO म्हणजे काय ?

IPO - Initial Public Offring. 

एखादी प्रायव्हेट लिस्टेड कंपनी पहिल्यांदाच शेअर मार्केट मधे पब्लिक विक्री साठी आपले शेअर्स घेऊन येते.

शेयर मार्केट मध्ये कंपनी आणण्यामागे त्या कंपनीला प्रगती करण्यासाठी लंगणारी पैशांची गरज यामाध्यमातून भागवली जाते.

एखाद्या प्रसिद्ध कंपनीचा IPO येणार म्हंटल्यावर IPO मध्ये ऑलॉटमेंट मिळण्यासाठी ट्रेडर्सची अगदी झुंबड लागते. पण

अप्लाय करणाऱ्या प्रत्येकालाच अलॉटमेंट मिळते असे नाही. आणि ज्यांना IPO ऑलॉटमेंट मिळाली त्यांच्या साठी तर चंगीच होते.

कारण चांगल्या कंपनी असेल तर जेवढ्या किमतीला कंपनीने IPO आणला होता. त्या किमतीच्या जवळपास ४०%, ५० % लिस्टिंग गेन म्हणजे मिळणार नफा असतो. आणि

IPO आल्यापासून हि संपूर्ण प्रक्रिया काहीच दिवसांची असते.

IPO मध्ये लॉट्स च्या प्रमाणात शेयर असतात. आणि एका लॉट्स ची किंमत हि साधारणतः १४२०० च्या आसपास ठेवली जाते,

कि जेणेकरून सर्व सामान्यांना हि IPO ग्यायला परवडेल. एवढ्या कमी कालावधीमढे एवढे पैसे मिळतात म्हणून IPO मध्ये ऑलॉटमेंट मिळण्यासाठी सर्वांची गर्दी होते.

ही खरेदी विक्री Primary Market च्या सहाय्याने होते.

Mutual Funds म्हणजे काय ? 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 • Secondary Market –
पहिल्यांदा शेअर्स Issue झाल्यानंतर ते शेअर्स Secondary Market मधे येतात. 

शेअर होल्डर येथे indirectly शेअर खरेदी आणि विक्री करतात. जेव्हा एखदा शेअर विकला जातो तेव्हा Broker आणि Investor यांना पैसे भेटतात.

 • Intraday –

एखादा शेअर सकाळी ९:१५ नंतर घेऊन तो शेअर दुपारी ३:३० च्या अगोदर विकणे म्हणजे Intraday.

Intraday मध्ये जे शेअर मार्केट मध्ये एक्स्पर्ट असतात, ते दिवसभरात आपला नफा कमवून शेअर विकतात. त्याला Intraday म्हणतात.

Delivery

एखादा शेअर घेवून तो एका दिवसांपेक्षा जास्त hold करून आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेवणे, त्याला Delivery Share म्हणतात.

Delivery मध्ये एका दिवस पेक्षा जास्त म्हणजेच १ आठवडा, १ महिना किंवा १ वर्ष पेक्षा जास्त दिवस ही शेअर ठेवता येतो.आणि

माहितीगारांच्या सल्ल्यानुसार हा एकच सुरक्षित आणि शेयर मार्केट मध्ये पैसे कमावण्याचा पर्याय आहे.

NIFTY विषयी संपूर्ण माहीती 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 • Broker –
Broker हे एक व्यक्ती किंवा एखादी संस्था ही असू शकते. 

हे स्टॉक exchange मध्ये Registered असतात.

ब्रोकर कडे शेअर होल्डर च्या behalf मध्ये खरेदी विक्री करण्यासाठी लायसेन्स असते. आणि

Brokers हे या खरेदी विक्रीचे पैसे घेतात. शेअर्स ला खरेदी विक्री करण्यासाठी एक डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट लागते. हे Account ही ब्रोकर्स पुरवतात.

Divident म्हणजे काय ?

एखाद्या कंपनी ला नफा झाल्यास एक तर ती कंपनी झालेला नफा Reinvest करते अथवा

आपल्या कंपनी च्या share होल्डर्स ना डिवीडेंट च्या स्वरूपात देते.

 • Bull Market –

जेंव्हा shares ची किंमत हि सतत आणि वेगाने वर च्या दिशेने जात असते आणि

पब्लिक ला वाटते कि येणाऱ्या काळात पण या share ची price अशीच वाढेल याला Bull Market म्हणतात.

Bull Market असताना या share ची किंमत वाढत जाते आणि shares ची खरेदीही.

 • Bear Market –
आताच आपण Bull Market पाहिलं, Bear Market हे Bull Market च्या अगदी विरुद्ध असते.

Shares ची किंमत सतत कमी होते, आणि पब्लिक ला वाटते कि येणाऱ्या काळात पण या share ची किंमत अशीच कमी होईल.

त्यामुळे सर्वांचा कल हा खरीदी पेक्षा विक्रीवर जास्त असतो. याला Bear Market म्हणतात.

 • Blue Chip Stocks –

ब्लु चिप stocks हे त्या कंपनी चे Shares असतात ज्या companies खूप दिवसांपासून मार्केट मध्ये लिस्टेड आहेत.

अशा companies ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला असतो. आणि

अश्या companies आर्थिक टृष्ट्या बळकट असतात. आणि यामध्ये खूप कमी रिस्क असते.

 • Stock Exchange –

बाजारात ज्या प्रमाणे प्रॉडक्ट्स ची खरेदी आणि विक्री होते, त्याच प्रमाणे स्टॉक Exchange मधेही Shares ची खरेदी विक्री होते.

भारतामध्ये प्रमुख स्टॉक Exchanges आहेत.

१. NSE – नॅशनल स्टॉक Exchange

२. BSE – बॉम्बे स्टॉक Exchange

आपण आजच्या पोस्टमध्ये शेयर मार्केटची माहिती / Share market in marathi या विषयावर माहिती घेतली.

नवनवीन Recipe Videos पाहण्यासाठी 👈 येथे क्लिक करा.

तुम्हाला आम्ही दिलेली माहीती आवडली असल्यास मित्रपरिवारात नक्की शेयर करा.

!! धन्यवाद !!


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra