ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ?

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ?

आपण सर्वच जन दिवसातला भरपूर वेळ मोबाईल पहण्यामधे घालवतो आणि कोविड मुळे तर मोबाईल चा वापर अजूनच वाढलेला आहे. कधी व्हिडिओ, कधी गेम्स, कधी क्रिकेट तर कधी फिल्म पाहण्यासाठी मोबाईलचा जास्त वापर केला जातोय. पण कधी विचार केलाय का याच मोबाईल च्या साहाय्याने आपण काम करून पैसे ही कमाई शकतो.असे भरपूर प्रकार आहेत कि ऑनलाईन काम करून पैसे कमावता येतात, पण त्या विषयी भरपूर जणांना पुरेशी माहिती अभावी किंवा अपुऱ्या वेळे अभावी करता येत नाहीत. त्यामुळेच आम्ही काही सोप्या पद्धती ज्याचा विषयी थोडीशी माहिती घेऊन त्यातून तुम्हाला काम करून थोडे जास्तीचे पैसे कमावता येतील.चला तर मग आपण पाहुयात की मोबाईल च्या मदतीने ऑनलाईन काम करून पैसे कसे कमावता येतील.

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ?

आजच्या वाढत्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहे प्रत्येक जण पैसे कमवण्यासाठी जीवाची ओढाताण करताना आपल्याला दिसते.परंतु लंच टाईम मध्ये ट्रेनमध्ये रात्री वेळ भेटल्यास अशा जास्तीच्या फावल्या वेळामध्ये थोडेसे काम करून,मोबाईल च्या मदतीने काही पैसे कमावले तर तेवढेच पैशांचा हातभार लागेल आणि मन ही समाधानी होईल.तर मोबाईल वर थोडं थोडेसे काम करून ऑनलाईन पैसे कसे कमवता येतील ते आपण आता पाहणार आहोत चला तर मग..

1) ऑनलाइन ब्लॉग
2) युट्युब
3) डिजिटल मार्केटिंग
4) फ्रीलान्सिंग

हे सर्व प्लॅटफॉर्म खूप प्रसिद्ध आणि सर्वांना माहीत असणारे आहे त्यामुळे आपण याविषयी सविस्तर पाहणार आहोत या व्यतिरिक्त अजूनही भरपूर अशा साईट्स आहेत,

येते की ऑनलाइन काम करून आपण पैसे कमवू शकतो पण सध्या या आर्टिकल मध्ये आपण या विषयी सविस्तर माहिती पाहूयात..

सुरुवातीला ऑनलाइन ब्लॉग त्याविषयी माहिती घेऊयात.

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ?

• ऑनलाइन ब्लाग –

आपण ब्लॉग विषयी भरपूर ऐकून आणि पाहून आहोत चला तर मग समजून घेऊयात हे ऑनलाईन ब्लॉग काय असतात ते ?

आपल्याला एखाद्या विषयावरील असलेली माहिती ती ऑनलाइन स्वरूपात एका वेबसाईटवर टाकने म्हणजेच ऑनलाईन ब्लॉग लिहिणे होईल.

ऑनलाइन ब्लॉग आपण आपल्या ला विस्तृत व माहिती असलेल्या किंवा अभ्यासलेले विषयावरती लिहायचा असतो.

आणि त्याला वाचकांनी पसंती दिली किंवा आपला ब्लॉग ची पोस्ट वाचली की त्याचे पैसेही आपल्याला मिळतात.
हे सर्व एवढ्या लगेच होत नाही त्यासाठी थोडासा वेळ ही लागू शकतो.

आता आपण पाहूयात ऑनलाईन ब्लॉग लिहिण्यासाठी आपल्याला कोणकोणते प्लॅटफॉर्म सहज रित्या उपलब्ध होऊ शकतात.

# Bloggers.com –

ऑनलाइन ब्लॉग मोफत सेवा देणारी ब्लॉगर ही वेबसाईट गुगल ची एक शाखा आहे, म्हणजेच गुगलच्या अंडर काम करते ब्लॉगर्स.कॉम या वेबसाईट वरून खूप मोठ मोठ्या ब्लॉगर्सनी आपल्या ब्लॉग लिहिण्याची सुरुवात केली कारण एक फ्री ब्लॉगिंग वेबसाइट असल्याने,आणि वापरण्यासाठी खूप सोपी असल्याने सगळेच याला पसंती देतात. अगदी लहान मुलांपासून सर्वच जण ब्लॉगर्सचा वापर करू शकतात. फक्त त्यासाठी थोडीशी बेसिक माहिती असणे गरजेचे आहे आणि काही गोष्टी ज्या थोड्याशा नेक्स्ट लेवल असतात त्या अकाउंट काढल्यानंतर हळू-हळू समजत जातात. याचा वापर करणं एवढा सहज आणि सोपा आहे. फक्त करायची इच्छा आणि लिहिणाची आणि वाचनाची आवड असायला पाहिजे म्हणजे या क्षेत्रात आपल्याला आपला पाय भक्कम पाने रोवता येईल.एकदा का जॅम बसला म्हणजे पैसे तर मिळतातच पण त्याहूनही अजून नवीन-नवीन आणि अशा गोष्टी ज्या विषयी आपण कधी ऐकलेही नाही त्या शिकायला मिळतात. हे एक वेगळेच विश्व् आहे.

आता पाहुयात या वर अकाउंट उघडण्यासाठी काय करावे लागेल ? म्हणजे आपल्याला ब्लॉग लिहिता येईल.मोबाईलच्या ब्राउझर वर जाऊन ब्लोगर्स. कॉम असे टाईप केल्यास येणाऱ्या पहिले लाईन वर क्लिक करून आपल्याला या साईटच्या मेन पेज वर जाता येते,आणि तिथे गेल्यास समोरच क्रीएट ब्लॉग या र्यायाला क्‍लिक करून आपल्या जीमेल आयडी आणि पासवर्ड टाकून यांच्या सहाय्याने आपल्याला आपलेही अकाउंट ब्लॉगर्स वर काढता येते.Bloggers.com वर अकाउंट ओपन करून त्या विषयी अजून माहिती हवी असल्यास कमेंट मध्ये सांगा त्यावर आपण सेपरेट आर्टिकल आणि व्हिडिओ च्या मदतीने सांगता येईल.

# WordPress.com –

WordPress.com या प्लॅटफॉर्मचा वापर करून मोठमोठ्या वेबसाईट बनवल्या जातात भरपूर पैसे कमावणारे ब्लॉग्स लिहिले जातात.

तर आपल्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच पडला असेल की मग Bloggers.com आणि WordPress.com या दोघांमध्ये काय फरक आहे ?

Bloggers.com ही एक फ्री ब्लॉगिंग वेबसाईट आहे पण त्या विरुद्धच WordPress.com ही एक पेड म्हणजेच येते ब्लॉग लिहिण्यासाठी अगोदर पैसे देऊन होस्टिंग विकत घ्यावे लागते,

आणि मग डोमेन विकत घ्यावे लागतो. म्हणजेच .com, .in, .org, .online अश्या प्रकारचे. आणि मग त्यानंतर वर्ल्ड प्रेस वर अकाउंट क्रिएट करता येते.

वर्डप्रेस वर ब्लॉग लिहिणे आणि वेबसाईट बनवणे खूप सोपे आणि सहज आहे मात्र पैसे देऊन म्हटलं की आपण अगोदरच घाबरून जातो.
वर्डप्रेसवर खूप सोप्या पद्धतीने लगीन च्या साह्याने प्रत्येक गोष्ट करता येते फक्त ड्रॅग अँड ड्रॉ पद्धतीने.

वर्डप्रेस या वेबसाईटवर ब्लॉग किंवा वेबसाईट बनवायची असेल आणि काही अडचण येत असेल,

तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा होईल तेवढी मदत करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.

आता सर्वांच्याच मनात पडलेला प्रश्न म्हणजे

ब्लॉग ला पैसे सुरू होण्यासाठी काय करावे लागते ?

ब्लॉग वर पैसे सुरु होण्यासाठी ब्लॉग वर जाहिराती याव्या लागतात आणि ब्लॉग वर जाहिराती लावण्यासाठी कमीत कमी 100 पोस्ट किंवा आर्टिकल ब्लॉग वर असणे आवश्यक आहे त्याशिवाय गुगल Addsense Approval मिळत नाही.

काही बाबतीत ४०-५० पोस्ट वर पण गुगळे चे ऍडसेन्स अपृवल मिळते पण ते या कामात
कौशल्यवान आणि माहितगार लोक असतात. ते संपूर्ण आभास आणि खूप दिवसाच्या मेहनती नंतर शक्य होते.
सध्या आपली सुरुवात असेल तर आपण गुगल ने दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत.

हे सांगून आपणास भीती दाखवण्याचा मुळीच उद्देश नाही परंतु ब्लॉग किंवा वेबसाईट वर ऍड लावून जाहिराती दाखवून त्याचे पैसे मिळवायचे असतील तर 100 पोस्ट असणे ही त्यांची अटच आहे.

तर ब्लॉग इच्छा असेल त्यासाठी शंभर पोस्ट लिहिण्याची तयार ठेवा कारण थोडे दिवस काम करून सोडून देण्यात मज्जा नाही करायचे

तर पूर्ण काम झाल्यास वेगळेच समाधान मिळते आणि पैसे ही..

आपण पाहिलं की ऑनलाइन ब्लॉग सोप्या पद्धतीने कशा प्रकारे लिहितात आता पुढील पॉईंट युट्यूब वरती पैसे कशाप्रकारे कमवता येतात ते पुढील पेज वरती आपण पाहणार आहोत…

ब्लॉग बनवणे जेवढे सोपे आहे तेवढेच त्यावर टिकून राहणे आणि सतत ब्लॉग लिहिणे आहे.सर्व कामाप्रमाणेच ब्लॉगिंग करण्यासाठी हि सातत्य खूप महत्वाचे आहे. काही दिवस ब्लॉग लिहायचे आणि मग लिहू असे म्हणत असाल तर अप्रोवाल कसे मिळेल.आणि आपल्या ब्लॉग ला जर अड्स मिळाल्या नाहीत तर एवढ्या दिवस मेहनत घेऊन काय फायदा होईल.या सर्व गोष्टींचा या क्षेत्रात सुरुवात करताना विचार करूनच यायला पाहिजे. जेणेकरून निराशा होणार नाही.आणि करणाऱ्याला डर कशाचे म्हणतात त्याप्रमाणे प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तर जग हि जिंकता येते म्हणतात.

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ? याचा उर्वरित भाग खाली दिलेल्या Next बटनावर क्लिक करून पाहू शकता.

1 thought on “ऑनलाईन पैसे कसे कमवायचे ? HOW TO EARN MONEY ONLINE ?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top