हॅलो ! आपण आजच्या पोस्ट मध्ये लोकमान्य टिळक यांची माहीती / Lokmanya tilak information in marathi या विषयावर माहिती घेणार आहोत .
Lokmanya tilak information in marathi
लोकमान्य टिळक भारतीय राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हणुन ओळखले जातात.
लोकमान्य टिळक यांची माहीती
नाव | केशव गंगाधर टिळक |
टोपन नाव | बाळ |
जन्म | 23 जुलै 1856 |
जन्म स्थान | चिखली ता. दापोली जि. रत्नागिरी |
वडिलांचे नाव | गंगाधर टिळक |
आईचे नाव | पार्वतीबाई गंगाधर टिळक |
पत्नीचे नाव | सत्यभामाबाई |
शिक्षण | बी.ए, एल.एल.बी |
मृत्यू | 1 ऑगस्ट 1920 |
लोकमान्य टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे नाव केशव असे होते.
लोकमान्य टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते .
" स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच "
अशी घोषणा लोकमान्य टिळकांनी दिली.
लोकमान्य टिळकांचे शिक्षण
लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच हुशार होते . गणित हा त्यांचा आवडता विषय होता.
त्यांनी त्यांचे पहिले शिक्षण वडिलांकडून घरीच घेतलेले. त्यापुढे त्यांनी पुण्यातील ॲंग्लो व्हरनॅक्युलर स्कुल मधुन शिक्षण घेतले .
त्यानंतर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधून पदवी मिळवली . त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मधून एल एल बी ची पदवी मिळवली .
लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते . ते मराठी शाळेत शिक्षक होते .व आईचे नाव पार्वतीबाई होते .
टिळक १६ वर्षांचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले . लोकमान्य टिळकांचा विवाह तापीबाई यांच्याशी झाला .
लग्नानंतर तापीबाई यांचे नाव सत्यभामाबाई असे ठेवले गेले . त्यांना तीन मुली आणि तीन मुले झाली .
लोकमान्य टिळकांचे कार्य
इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९० मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकमान्य टिळक खूप मोठे समाजसुधारक होते . लोकमान्य टिळक पुणे म्युन्सिपल आणि मुंबई विधानसभेचे सदस्य होते .
लोकमान्य टिळकांनी बालविवाहाचा विरोध केला आणि विध्वा पुनर्विवाहावर भर दिला .
टिळकांनी केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्रे सुरू केले ही दोन्ही वृत्तपत्रे लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली .
लोकमान्य टिळकांनी आपल्या वर्ग मित्रांसोबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली .
याचे उद्दिष्ट शिक्षणामध्ये गुणवत्ता आणने आणि तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे हे होते.
》डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यात जीवनप्रवास
१८८५ साली लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन काॅलेजची स्थापना केली .
लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली .
१८९५ साली लोकमान्य टिळकांची मुंबई प्रांत विनिमयन बोर्डचे सभासद म्हणुन निवड झाली .
लोकमान्य टिळकांनी त्यांच्या वृत्तपत्रांद्वारे इंग्रजांच्या विरोधात लेख लिहिले . म्हणुन त्यांना जेलमध्ये जावे लागले .
● टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले त्यातील काही खालीलप्रमाणे
१) सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय २) टिळक सुटले पुढे काय ३) हे आमचे गुरुच नव्हेत ४) उजाडले पण सुर्य कुठे आहे ५) प्रिन्सिपॉल शिशुपाल की पशुपाल ६) टोणग्याचे आचळ ७) बादशहा ब्राम्हण
लोकमान्य टिळकांनी लिहिलेली पुस्तके
१) द आर्क्टिक होम इन द वेद –
टिळक येरवड्याच्या तुरुंगात असताना या पुस्तकाची कल्पना त्यांना सुचली. या पुस्तकात त्यांनी आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे,
हे अनुमान वेदांतील ऋचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा ग्रंथ टिळकांनी इंग्रजी मधून लिहिला .
२) ओरायन –
ओरायन हा एक लोकमान्य टिळकांचा संशोधनात्मक प्रबंध आहे. 1892 च्या लंडन येथील ओरिएंटल परिषदेसाठी तो तयार करण्यात आला होता. त्यात वेदाचा कालनिर्णय हा विषय हाताळला आहे . हा ग्रंथ टिळकांनी इंग्रजी मधून लिहिला .
३) गीतारहस्य –
लोकमान्य टिळकांनी जेलमध्ये राहून गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. गीतारहस्य’ ग्रंथामध्ये अनेक भारतीय व पाश्चिमात्य तत्वज्ञ लेखकांची मते उद्धृत करण्यात आली आहेत.
मूल ‘गीतारहस्य’ ग्रंथ लोकमान्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला आणि नंतरही त्यामध्ये सुधारणा केल्या.
लोकमान्य जेव्हा मंडालेचा तुरुंगवास संपवून पुण्याला आले, त्यावेळी ग्रंथाची हस्तलिखित प्रत ब्रिटिश सरकारच्या ताब्यात होती. हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मराठी मधुन लिहिला .
》डाॅ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा थोडक्यात जीवनप्रवास
लोकमान्य टिळकांचा मृत्यु –
जालियनवाला बाग हत्याकांडाचा टिळकांवर खोल परिणाम झाला . त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळु लागली .
त्यानंतर लोकमान्य टिळक मधुमेहाच्या विळख्यात सापडले . त्यानंतर त्यांची प्रकृती अजुनच दिवसेंदिवस खराब होत गेली .
लोकमान्य टिळकांनी १ ऑगस्ट १९२० रोजी अखेरचा श्वास घेतला . त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर सगळ्या देशभरात शोककळा पसरली .
लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेसाठी लाखो लोक जमले होते . लोकमान्य टिळकांवर ‘लोकमान्य: एक युग पुरुष’ ही फिल्म सुद्धा बनवली आहे .
टिळक स्मारक मंदिर ही लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ पुणे शहरात बांधलेली वास्तू आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ही वास्तू उभी आहे.
टिळक स्मारक मंदिर म्हणजे पुण्यातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीचे माहेरघराच आहे.
लोकमान्य टिळकांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि कार्य कधीही विसरता येणार नाही. एवढा महान युगपुरुष जन्माला येणे ही भारतासाठी खुप अभिमानाची बाब आहे .
लोकमान्य टिळकांनी देशासाठी केलेले कार्य एका नजरेत
१) लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरु केली. या वृत्तपत्रांद्वारे लोकमान्य टिळकांनी आपले सरकार बद्दलचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले . ही दोन्ही वृत्तपत्रे खुप लोकप्रिय झाली .
२) इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९० मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
३) लोकमान्य टिळकांनी बालविवाहाचा विरोध केला आणि विध्वा पुनर्विवाहावर भर दिला .
४) लोकमान्य टिळकांनी आपल्या वर्ग मित्रांसोबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली . याचे उद्दिष्ट शिक्षणामध्ये गुणवत्ता आणने आणि तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळणे हे होते .
५) १८८५ साली लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन काॅलेजची स्थापना केली . लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली .
६) लोकमान्य टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले . आणि गीतारहस्य , द आर्क्टिक होम इन द वेद , ओरायन हे ग्रंथ लिहिले .
》नवनवीन Recipe Videos पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आजच्या पोस्ट मध्ये लोकमान्य टिळक यांची माहीती / Lokmanya tilak information in marathi संपुर्ण जीवनाबद्दल माहिती थोडक्यात दिली आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेयर करा .