योग करण्याचे फायदे आणि योगाचे प्रकार / Benefits of yoga in marathi

हॅलो ! आपण आजच्या पोस्टमध्ये योग करण्याचे फायदे आणि योगाचे प्रकार Benefits of yoga in marathi या विषयावर माहिती घेणार आहोत.

Benefits of yoga in marathi

योगाच्या मदतीने शारीरिक-मानसिक आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त केला जातो.

योग शब्द संस्कृत च्या युज धातूने तयार झाला आहे. याचा अर्थ जोडणे म्हणजे शरीर मन आणि आत्मा एकत्र बांधणे होय.

योग करण्याचे फायदे आणि योगाचे प्रकार

योगाचे प्रकार

आष्टांग योग

या योगाला जास्तीत जास्त महत्त्व आहे.

ऋषी-मनींनी योगाच्या द्वारे शरीर मन आणि प्राण यांची शुद्धी आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आठ साधन सांगितले आहेत.

अष्टांग योगाच्या अभ्यासाने मनाला शांती आणि शेवटी अध्यात्मिक जागृती आणि मुक्ती मिळते .

बिक्रम योग

बिक्रम योगाची सुरुवात योग गुरु विक्रम रॉय चौधरी यांनी केली होती.

हा योगा गरमीच्या वातावरणात करावा लागतो.

याने शरीराची लवचिकता वाढते हा योगा केल्याने हाडे देखील मजबूत होतात.

हठ योग

हठ योग नियमित केल्यामुळे तुमचे चांगले स्वास्थ्य आणि मानसिक शांती तुम्ही परत मिळवू शकता‌.

हा योगा केल्यामुळे तुमच्यामध्ये सुख आणि शांती येते.

तसेच हा योग केल्याने शरीर शक्तिशाली , दृढ हलका आणि निरोगी होतो.

योगाची रोज सवय करा. आपले आरोग्य निरोगी करा.

आयंगर योग

शरीर फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी आयंगर योग लाभदायक आहे.

शरीराला लवचिक आणि मजबूत ठेवण्यासाठी आयंगर योग लाभदायक आहे.

एकाग्रता वाढवण्यासाठी सुद्धा आयंगर योग लाभदायक आहे.

जिवामुक्ती योग

जिवामुक्ती या शब्दाचा अर्थ आहे ‘ जिवंत रहात असताना मुक्ती ‘ श्वास अभ्यासाने फुप्फुसांना जास्त ऑक्सिजन भेटतो आणि ब्लड सर्कुलेशन वाढतो.

कृपालु योग

हा योग करणाऱ्याला स्वताःचे शरीर समजायला , स्वीकार करायला आणि शिकण्याचे ज्ञान देतो.

डोकेदुखी वर घरगुती उपाय 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

योगाची मुद्रा

स्थायी योग


कोणासन प्रथमकोणासन द्वितीयकतिचक्रासनहस्तपादासनवीरभद्रासनवृक्षासनपश्चिम नमस्कारासनगरुडासनउत्कटासन


बसून करण्याचे योग

पूर्वोत्तानासन, पश्चिमोत्तानासन, जनु शिरसाना, अर्ध मत्स्येन्द्रासन, पद्मासन, बद्धकोणासन, वज्रासन, गोमुखासन


 ● पोट योग साठी मुद्रा


वसिष्ठासना, धनुरासन, भुजंगासन, शलभासन 


पाठीवर झोपून करायचे योग


नौकासन, सेतु बंधासन, मत्स्यासन, पवनमुक्तासन, हलासन, सर्वांगासन 

पूर्ण जगभरात २१ जुन ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. 

योगा करण्याचे फायदे

१) रक्त प्रवाह सुरळीत होतो


जेव्हा शरीरात रक्त प्रवाह सुरळीत असतो तेव्हा शरीरातील सगळे अंग चांगल्या प्रकारे काम करतात .

योगा केल्यामुळे रक्त प्रवाह सुरळीत होतो . त्याचप्रमाणे सगळ्या अंगांना पुरेसा ऑक्सिजन भेटतो.


२) ब्लडप्रेशर


 चुकीच्या जीवनशैलीमुळे खूप लोकांना ब्लडप्रेशर ची समस्या उद्भवत आहे . योग केल्यामुळे ब्लडप्रेशर संतुलित राहतो.‌


 ३) श्वास घेण्यास सोपे


 जेव्हा आपण योगा करतो तेव्हा फुफ्फुस खुप चांगल्या रीतीने कार्य करायला सुरुवात करते . याने श्वास घेणे सोपे होते .


४) दुखणे सहन करण्याच्या क्षमतेत वाढ


आपल्या शरीरात खुप दुखणे असते .‌ हात , पाय , कंबर दुखीचा त्रास खूप लोकांना असतो .‌

जेव्हा आपण योगा करतो तेव्हा दुखणे सहन करण्याची क्षमता वाढते . आणि आपण योगाने मी केला तर आपल्या शरीराचे दुखणे कमी देखील होऊ शकते .

योगा से ही होगा..


५) हृदयरोगासाठी लाभदायक


हृदय आपल्या शरीराचा नाजुक हिस्सा आहे .‌ योगा करणे हे हृदय रोगासाठी लाभदायक आहे .


६ ) संतुलित वजन


खूप लोकांना वजन जास्त असण्याची समस्या असते . काही लोकांना वजन कमी असण्याची समस्या असते .‌‌

तुम्ही योगाच्या मदतीने वजन कमी करू शकता किंवा वाढवू शकता .


७) तणाव कमी होतो


तणाव असणे आपल्या शरीरासाठी खुप नुकसानदायक असते .‌ तणाव कमी करायला योगा मदत करतो .


8) सकारात्मक विचार


योग केल्यामुळे आपले विचार सकारात्मक होतात .‌ योग केल्यामुळे शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते .

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचे उपाय 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


९ ) प्रतीकारक शक्ती


आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती जास्त असणे गरजेचे आहे .‌

प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपल्याला आजारापासून लढायला मदत मिळते .‌‌

योगा केल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढू शकते .


१०) झोप चांगली येते


नेहमी योगा केल्याने झोप चांगली येण्यास मदत होते .

दिवसभर काम केल्यावर रात्री चांगली झोप येणे गरजेचे असते आणि दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी शरीराला तयार व्हायला मदत मिळते .


११) दमा


दम्याचा त्रास असल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो . या अवस्थेत कोणी योगा केला तर फुफ्फुसांवर जोर पडतो . आणि

फुफ्फुस अधिक क्षमतेने कार्य करायला सुरुवात करतात . यामुळे दम्याचा त्रास काही प्रमाणात कमी होतो . 

सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


१२ ) मायग्रेन


मायग्रेन असल्या लोकांनी योगा केला तर डोकेदुखी कमी होते.


१३ ) शरीरातील साखर नियंत्रण


आत्ता‌ कमी वयात देखील मधूमेह होतो . शरीरातील इन्सुलिनची‌ निर्मिती होण्याचे प्रमाण कमी झाले की शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते .

अशा वेळी हे नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा लाभदायक आहे . 


१४ ) त्वचेसाठी लाभदायक


योगा केल्याने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते . याचा चांगला परिणाम त्वचेवर होतो .

त्वचेवर मऊपणा आणि ताजेपणा दिसायला लागतो . योगा त्वचेचे सामान्य आजार दुर होण्यास नक्कीच उपयोगी ठरतो .

योगासनाचे नियम

  • नियमानुसार योग सूर्योदयाच्या आधी किंवा सुर्यास्तानंतर करायचे असते . सकाळी लवकर उठून योगा करणे खुप लाभदायक असते.
  • योगाची सुरुवात ताडासन पासून करायला पाहिजे.
  • सकाळी योगा उपाशी पोटी करायला पाहिजे .
  • पहिल्यांदा योगा करताना हलक्या रोगापासून सुरुवात केली पाहिजे . त्यानंतर हळूहळू स्तर वाढवायला पाहिजे .
  • योगा करताना आरामदायक कपडे घालायला पाहिजे .
  • ज्या जागेवर तुम्ही योगा कराल ती जागा स्वच्छ आणि शांत असायला पाहिजे .
  • गर्भवती महिलांनी डॉक्टरचा सल्ला घेऊन प्रशिक्षकाच्या देखरेखी खाली योगा केला पाहिजे .
  • योगासनाच्या शेवटी शवासन करावा . याने तन मन पूर्णपणे शांत होतो . शवासन केल्यानंतर योगाचा पुर्ण लाभ भेटतो .
  • तुम्ही गंभीर आजारात असाल तर योगा करणे टाळा .
  • तुमचे संपुर्ण लक्ष योगावर केंद्रित करा .
  • बळजबरीने आणि जबरदस्तीने योगा करू नका .
  • योगा केल्यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नका .
  • योगा केल्यानंतर एका तासाने आंघोळ करा .‌ Benefits of yoga in marathi
  • कोणताही शारीरीक त्रास असल्यास योगा करण्यापूर्वी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा .‌
  • योगा करताना काही त्रास वाटल्यास किंवा नवीन समस्या उद्भवल्यास योगाभ्यास थांबवावा .
  • योगासनाचे प्रकार करण्याआधी तुम्ही तुमच्या शरीराचं वाॅर्मअप करणं आवश्यक आहे .
  • यामुळे शरीरामध्ये थोडी उष्णता निर्माण होते . आणि तुम्ही व्यवस्थित योगा करू शकाल .

नवनवीन Recipe Videos पाहण्यासाठी येथे क्लिक करा.



       

आपण आजच्या पोस्टमध्ये योग करण्याचे फायदे आणि योगाचे प्रकार Benefits of yoga in marathi या विषयावर माहिती घेतली .

तुम्हाला आम्ही दिलेली माहीती आवडली असल्यास मित्रपरिवारात नक्की शेयर करा.

!! धन्यवाद !!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top