KFC Success Story प्रेरणादायी कहाणी

Share with 👇 Friends.

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत KFC चे संस्थापक “कर्नल सैंडर्स” यांची प्रेरणादायी कहाणी. KFC Success Story

मित्रांनो अशी उदाहरणं आपण किती पाहीली आहेत की ज्याला सगळं सेट, अर्थात आयतं, काहीही कष्ट न करता मिळालं आणि तो त्याच्या आयुष्यात खुप यशस्वी ठरला? लोक त्यांच अनुकरण करायला लागले, त्याचं उदाहरण द्यायला लागले? नाह! अशी उदाहरणं तुम्हाला सहसा कधीच मिळणार नाहीत.

KFC Success Story

पण जर मी असा प्रश्न विचारला की एखादं असं उदाहरण तुम्हाला सांगता येईल का की ती व्यक्ती त्याच्या एकुण आयुष्यात बरेचदा अपयशी ठरली पण पुढे प्रचंड यश त्याच्या वाटयाला आलं? हो! अशी उदाहरणं तुम्हाला बरीच मिळतील.

Shop Trendy Shirts

त्याचं महत्वाचं कारण हे की चुका करताय म्हणजे काहीतरी शिकताय हे नक्की! चुका होतील या भितीने काही करायचच नाही यापेक्षा चुका करत करत काहीतरी चांगल करण्याचा प्रयत्न करण नक्कीच यशाकडे जाण्याचा एक सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो.

तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी? खरतर हा आपल्या लिखाणाचा मुद्दाच नाही पण जो मुद्दा अर्थात ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तो मात्र “नॉनव्हेज किंग” आहे, संपुर्ण जगात KFC हा त्याचा ब्रांड नॉनव्हेजीटेरियन लोकांमधे इतका फेमस आहे की विचारू नका. “कर्नल” हरलैंड डेविड सैंडर्स हे त्यांचं नाव!

KFC चे संस्थापक “कर्नल सैंडर्स” यांची प्रेरणादायी कहाणी

जीवनात अनेक टप्प्यांवर अपयश मिळत असतांना स्वतःच्या आंतरीक उर्जेचा आवाज ऐकला आणि हा व्यक्ती न भुतो न भविष्यती इतका यशस्वी झाला. त्यांच्या आयुष्यातील ठळक चढउतारांवर बोलायचे झाल्यास काही ठळक मुद्दे लक्षात येतात ते असे

  • वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी वडीलांच छत्र हरवलं.
  • वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला.
  • 17 वं वर्ष होईपर्यंत जवळजवळ 4 जॉब हातचे गेले होते.
  • 18व्या वर्षी विवाह आणि 19 व्या वर्षी एका मुलीचे पिता.
  • एका रेस्टॉरंट मधे कुक आणि प्लेट वॉश करण्याचे काम केले.

त्यांनी स्वतःचे क्रीयेशन असलेली नॉनव्हेज मधे own recipie बनवुन एक रोडसाईड रेस्टॉरंट सुरू केले. खरंतर निराशेच्या खोल दरीत अडकले असतांना त्यांनी हे रेस्टॉरंट सुरू केले.

पाहता पाहता त्यांच्या हातची चव लोकांना आवडु लागली आणि त्याची चर्चा सर्वत्र होउ लागली. हळुहळु बिजनेस मधले गमक त्यांना उकलु लागले आणि फ्रंचायसी चे वारे डोक्यात घुमु लागले आणि आयुष्य बदलवणारी KFC ची सुरूवात 1952 साली झाली. त्यानंतर मात्र कर्नल साहेबांनी स्वतः सुरू केलेले रोडसाईड रेस्टॉरंट बंद केले आणि संपुर्णपणे KFC ची सुत्र आपल्या हातात घेतली आणि नंतर पुन्हा मागे वळुन बघीतलं नाही.

हळुहळु राज्याबाहेर आणि नंतर देशाबाहेर KFC च्या फ्रंचायसी दिल्या गेल्या आणि हा ब्रांड नॉनव्हेजीटेरियन लोकांचा सगळयात आवडता ब्रांड झाला.

अशी उदाहरणं जेव्हां आपल्या बघण्यात आणि वाचण्यात येतात तेव्हां खरच “NOTHING IS IMPOSSIBLE” हे पटतं नां? म्हणुन मित्रांनो आयुष्यात कुणीतरी येउन बदल घडवेल याची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच होणा.या बदलाचा भाग व्हा!

आयुष्य खुप सुंदर आहे! फक्त गरज आहे ती आपला दृष्टीकोन बदलण्याची . . . . .

कर्नल हरनैल सैंडर्स यांच्याबद्दल काही महत्वपुर्ण माहिती

  • जन्म: 9 सप्टेंबर 1890
  • मृत्यु: 16 डिसेंबर 1980
  • व्यवसाय: रेस्टॉरंट बिजनेसमन

Share on What’s App 👇 KFC Success Story


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra