हॅलो ! आपण आजच्या पोस्टमध्ये मोबाईल लवकर चार्ज कसा करायचा ? / How to Boost charging speed in marathi या विषयावर माहिती घेणार आहोत .
How to Boost charging speed in marathi
तुम्हाला खूप वेळा वाटत असेल आपला मोबाईल खूप हळू चार्जिंग होत आहे तुमची इच्छा असेल की तुमच्या मोबाईल ला लवकरात लवकर चार्जिंग व्हावी . तर आपण आजच्या पोस्टमध्ये मध्ये मोबाईल लवकर चार्जिंग होण्याचे उपाय यावर माहिती घेणार आहोत .
मोबाईल लवकर चार्ज कसा करावा
१) मोबाईल स्विच ऑफ करा –
मोबाईल लवकरात लवकर चार्ज करण्यासाठी मोबाईल स्वीच ऑफ करणे हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे .
मोबाईल जेव्हा चालू असतो तेव्हा मोबाईल मधील बॅटरी संपत असते म्हणून चार्जिंग करताना मोबाईल स्विच ऑफ केला तर
तुमच्या मोबाईल मधील बॅटरी संपणार नाही आणि मोबाईल लवकरात लवकर चार्ज होईल .
२) airplane mode चालू करा –
जर तुम्हाला जर तुम्हाला मोबाईल स्विच ऑफ करायचा नसेल तर तुम्ही airplane mode सुद्धा चालू करू शकता .
airplane mode चालू केल्यावर तुमच्या मोबाईलचा नेटवर्क सुद्धा बंद होईल आणि कोणता डाटा ट्रान्सफर होणार नाही यामुळे मोबाईल फास्ट चार्ज होईल .
》Delete झालेले Photo परत कसे मिळवायचे ?
३) मोबाईल चार्ज करताना मोबाईल चा वापर करू नका –
काही लोक मोबाईल चार्ज होताना ह मोबाईलचा वापर करतात .
मोबाईल चार्ज होत असताना मोबाईल वापरणे हे तुमच्यासाठी आणि तुमच्या मोबाईल साठी धोकादायक आहे .
असे केल्याने मोबाईल गरम होतो आणि बॅटरी लवकर संपते .
यामुळे मोबाईल लवकर चार्ज होत नाही आणि असे केल्याने मोबाईलचा स्फोट होऊ शकतो . आणि
यापासून तुम्हाला देखील नुकसान होऊ शकतो . म्हणून मोबाईल चार्ज होत असताना मोबाईल वापरू नका .
४) नेहमी ओरिजनल चार्जर वापर करा
कधी कधी काही लोक डुपलीकेट किंवा कमी दर्जाचा चार्जर मोबाईल चार्जिंग करण्यासाठी वापरतात . तर कधीकधी लवकरात लवकर मोबाईल चार्ज होण्यासाठी काही लोक जास्त पाॅवर असलेला चार्जर घेतात. त्याचा मोबाईल वर वाईट परिणाम होतो . मोबाईलला नेहमी चार्जिंग स्पीड सपोर्ट करेल असंच ओरिजनल चार्जर वापरावा .
५) बॅकग्राऊंड ॲप बंद करा –
जेव्हा आपण मोबाईल वापरतो तेव्हा एकाच वेळेला दोन ते तीन ॲप्स वापरतो याचा तुमच्या मोबाईलवर वाईट प्रभाव पडतो . जेव्हा तुम्ही एकदाच खूप ॲप्स वापरता तेव्हा मोबाईलच्या बॅकग्राऊंडला सगळे काम करत असतात आणि यामुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते . म्हणून जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावाल तेव्हा बॅकग्राऊंड ॲप्स बंद करा . यामुळे तुमचा मोबाईल लवकर चार्ज होईल आणि तुमच्या मोबाईल चार्जिंग देखील लवकरात लवकर संपणार नाही .
६) खराब युएसबी पोर्ट –
जा तुमच्या मोबाईल ला खूप कमी वेगाने चार्जिंग होत असेल तर एकदा तुम्ही तुमच्या मोबाईलचा यूएसबी पोर्ट तपासून पहा . कधीकधी मोबाईलच्या यूएसबी पोर्ट मध्ये धूळ गेलेली असते तर कधी कधी काही कचरा देखील अडकलेला असतो किंवा यूएसबी पोर्ट खराब झालेल असतं . तुम्ही एकदा मोबाईलच्या दुकानांमध्ये जाऊन यूएसबी पोर्ट साफ करून घ्या किंवा खराब झाल असेल तर बदलून घ्या .
७) पावर सेविंग मोड चा वापर करा –
मोबाईल चार्ज करता नेहमी पावर सेविंग मोड किंवा किंवा बॅटरी सेव्हर ऑन करा असे केल्याने मोबाईल मध्ये जास्तीचे बॅकग्राऊंड बंद होतील आणि तुमचा मोबाईल लवकर चार्ज होईल .
८) GPS , Bluetooth , Internet आणि Wifi बंद करा –
GPS , Bluetooth , Internet आणि Wifi मुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते मोबाईल चार्ज करणे तेव्हा या सर्व गोष्टी बंद करा.
९ ) मोबाईल पूर्ण चार्ज करा –
मोबाईल नेहमी पूर्ण चार्ज करा कधीकधी काही लोक मोबाईल वापरण्याचे घाई मध्ये किंवा कुठे बाहेर जायचे असेल तर
पूर्ण चार्ज होण्याआधीच वापरायला घेतात तुमच्या मोबाईलची बॅटरी पडतो याने बॅटरी लाईफ कमी होते म्हणून काही दिवसातून एकदा तरी मोबाईल पूर्ण चार्ज करा .
मोबाईल ची चार्जिंग लवकर संपण्याचे कारण
1 ) स्क्रीन ब्राइटनेस – मोबाईलची चार्जिंग लवकरात लवकर संपण्याचा सर्वात मोठा कारण आहे स्क्रीन ब्राइटनेस . तुम्ही जेवढे मोबाईलची स्क्रीन लाईट नाही जास्त ठेवाल तेवढी तुमच्या मोबाईल ची चार्जिंग लवकर संपेल . तुम्हाला चार्जिंग वाचवायची असेल तर स्क्रीन ब्राईटनेस कमी करावा लागेल . आणि आत्ता खूप मोबाईल मध्ये स्क्रीन ब्राईटनेस ऑप्शन आला आहे. जर तुमच्या मोबाईल मध्ये स्क्रीन ब्राईटनेस हा ऑप्शन असेल तर तुम्हाला तो ऑन करायचा आहे . याने तुमच्या मोबाईलला जेवढी गरज असेल तेवढेच ब्राईटनेस राहते आणि तुमच्या मोबाईलची बॅटरी वाचते .
2 ) फक्त गरज असतील तेवढेच नोटिफिकेशन चालू ठेवा – नोटिफिकेशन सेटिंग फक्त जे ॲप्स गरजेचे असतील आणि त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणे गरजेचे असेल त्यांचेच चालू ठेवा याने तुमच्या मोबाईलची बॅटरी जास्त वेळ चालेल. जेवढे नोटीफिकेशन चालू असतील तेवढी तुमच्या मोबाईल ची बॅटरी जास्त संपेल .
मोबाईल बॅटरी बद्दल कोणती काळजी घ्यावी
१) काही लोक रात्री मोबाईल चार्ज करतात . आणि मोबाईल चार्ज होऊनही काही वेळा मोबाईल चार्जर चालु राहतो . याने तुमचा मोबाईल जास्त तापतो आणि कधीकधी मोबाईल ची बॅटरी देखील खराब होते .
२) मोबाईल चार्ज होताना वापरु नका .
३) चांगल्या क्वालिटी चा चार्जर वापरा .
४) मोबाईल पुर्ण चार्ज करा . आणि सगळी बॅटरी संपेपर्यंत मोबाईल वापरु नका .
५) ज्या कंपनीचा मोबाईल आहे त्याच कंपनीचा चार्जर वापरा . आणि चार्जिंग स्पीड सपोर्ट करेल असाच चार्जर घ्या .
६) सारखा मोबाईल चार्जिंग ला लावु नका त्यामुळे बॅटरी खराब होते .
७) फोन चार्ज होत असताना मोबाईल वर बोलणे टाळा .
》Fluffy Coffee कशी बनवायची ? 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आजच्या पोस्टमध्ये मोबाईल लवकर चार्ज कसा करायचा ? / How to Boost charging speed in marathi याबाबत माहिती पाहीली. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर शेयर करा .
!! धन्यवाद !!
best information sir
Nice