डोकेदुखी वर घरगुती उपाय

Share with 👇 Friends.

डोकेदुखी हे सर्वसाधारण पणे सर्वाना जाणवणारे लक्षण आहे. चला तर मग पाहूया डोकेदुखी वर घरगुती उपाय Dokedukhi gharguti upay in marathi

Dokedukhi gharguti upay in marathi

सर्वसाधारण पणे सर्वाना जाणवणारे लक्षण म्हणजे डोकेदुखी. त्या मागचे कारण कधी-कधी मोठा आजार नसून डोक्याला असणारा मानसिक तणाव, उपासमार, अपचन, कानाला लागणारी थंड हवा, इत्यादी कारणांमुळेही दुखी होत असते. त्यामुळे सर्वसाधारण पणे डोकेदुखी हि बाब दुर्लक्षित केली जाते. कधी-कधी तर गरम चहा पिल्यानेही डोखे दुखी दूर होते. तरीही डोखे दुखी न थांबल्यास सर्वांना परिचित असणारी पॅरासिटामोल गोळी घेतल्याने डोखे दुखीला काहीच वेळात अराम भेटतो.

डोकेदुखी वर घरगुती उपाय

जर डोखे दुखी जास्त असेल तर घरघुती उपाय केल्या पेक्षा डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे असते.

लसूण

लसणाचे अनेक फायदे आपल्याला माहित आहेत त्याचप्रमाणे जर लसूण चिरडून डोक्याला लावल्यास त्याने डोखे दुखीला तात्काळ अराम मिळतो.

शरीर कमकुवत वाटत असल्यास भाजलेला लसुन अवश्य खावा, याने शरीराची झीज भरून निघते.

शरीरातील रक्त कमी असल्यास लसुन खाल्ल्याने फायदा होतो, कारण याच्या सेवनाने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

लसनाचे नियमित सेवन केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते पुरवठा सुरळीत होतो.

संशोधनातून असे समोर आले आहे की आठवड्यातून किमान तीन वेळा कच्चा लसूण खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

अजून एक घरगुती रामबाण उपाय म्हणजे भाजलेला लसूण खाणे.

ज्यांना लसणाची ॲलर्जी असेल किंवा संडास होत असेल त्याबरोबरच लो ब्लड प्रेशरचा त्रास असेल त्यांनी लसूण अजिबात खाऊ नये.

लसणामुळे रक्त पातळ होते त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवस लसूण खाणे टाळणे योग्य ठरते.

याचे काही दुष्परिणामही आहेत म्हणून याचा अतिसार करणे टाळावे शक्यतो डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्यच.

सर्दी खोकला घरगुती उपाय 👈 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अद्रक

अद्रक हे डोकेदुखी साठी जालीम उपाय म्हणून वापरली जाते.आयुर्वेदात अद्रकेच्या गुणांचा प्रभाव वेगळाच आहे.

याच्यामुळे डोकेदुखी थांबते कारण डोक्याच्या पेशी मध्ये आलेली सूज हे अद्रक खाल्याने तात्काळ कमी होते व डोके दुखी लगेच थांबते.

त्या सोबतच थोडासा लिंबाचा रस मिसळल्याने डोखे दुखी थांबण्यास लवकर मदत होते.

लिंबू

कोमट पाण्यात अर्धा लिंबू मिसळून त्यात थोडेसे काळे मीठ घातल्याने डोके दुखीला फरक पडतो.

त्या सोबतच ज्यांना अपचनाचा त्रास आहे तोही या मिश्रणाने दूर होतो, आणि रोजच्या धावपळीने शरीराची होणारी झीज हि लिंबू पाणी करून पिल्याने भरून निघेल.

लिंबाचे महत्व सांगायचे झालेच तर लिंबू हा जवळपास प्रत्येक आजारावर थोडा फार का होईना फरक देणारा घटक आहे.

लिंबामध्ये “व्हिटॅमिन सी” असल्याकारणाने प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते आणि झालेले आजार लवकर बरा होता.

सर्दी खोकल्यासाठी लिंबू, मध आणि इलायची यांचे मिश्रण करून ते थोडे-थोडे प्यायल्यानेही सर्दी खोकल्याला आराम मिळतो.

लिंबू हे शरीराच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचा घटक आहे याची किंमत आपल्याला खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लक्षात येते.

सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लिंबामध्ये विटामिन सी असते ज्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

जे लिंबाचे सेवन नियमित प्रमाने करतात त्यांना छोटे आजार कधी जाणवत नाही.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामाच्या स्वरूपात शरीरातील पाणी बाहेर पडते, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते म्हणून लिंबू पाणी करून पिल्याने शरीरातील पाण्याची झीज भरून निघते

बाहेरून आल्यास थोड्यावेळाने लिंबू पाणी करून पिणे फायदेशीर ठरते.लिंबू पाणी पिल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

पोट खराब असल्यास लिंबू चे सेवन करणे फायदेशीर ठरते. निंबाचा नियमित सेवन खूप महत्त्वाचे आहे.

तुळस

तुळशीचे पान खूप गुणकारी असते हे तर आपण सगळ्यांनीच ऐकलं पण डोके दुखी वर तुळशी लाभदायक असते.

पान चावून खाल्ल्याने डोके दुखीला अराम मिळतोच. तसेच डोकं शांत हि होते आणि तोंडाला येणार वास हि तुळशीचे पानचावून खाल्ल्याने गायब होतो.

तुळशीचे पाने घेऊन त्याला ठेचून त्यातून निघणारा रस पिल्याने डोके दुखीला खूप फरक पडेल.

तुळशी मध्ये मोठ्या प्रमाणावर एंटीऑक्सीडेंट असतात जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात.

त्वचेचा काही समस्या असतील तर तुळशीचे पाण्यात आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने ते दूर होते.

तुळशीला आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान आहे कारण तुळशीचे पाणी नियमितपणे खाल्ल्याने त्याचा चांगला परिणाम मानवी आरोग्यावर दिसून येतो.

तोंडाचा उग्र वास येत असेल, तोंडाला चव नसेल किंवा तोंड सतत कोरडे पडत असेल तर तुळशीचे चार-पाच पाने तोडून खायला हवे मुखवास म्हणून याचा उपयोग केला जातो.

तुळशीच्या पानांचा रस प्राशन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात.चार-पाच तुळशीची पाने चहात मिक्स करून पिल्याने शरीरातील थकवा दूर होतो.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुळस हि खूप गुणकारी मानली जाते त्यामुळे सकाळी तुळशीची चार-पाच पाने नियमित खाणे फायदेशीर ठरू शकते.

परंतु डोके दुखीचा त्रास जास्त जाणवत असेल तर ग्लास भरून पाण्यात तुळशीचे नऊ दहा पाने उकळून घ्यावीत आणि त्यात थोडासा मध मिसळून पिल्याने डोके दुखणे कमी होईल.

दालचिनी

दालचिनी आयुर्वेदामध्ये दालचिनीचे खूप महत्व आहे डोके दुखी साठी दालचिनी हि अत्यन्त गुणकारी मानली जाते.

त्यासाठी दालचिनी चा बारीक भुगा करून त्यात थोडे पाणी मिसळावे आणि त्याचा लेप कपाळाला लावावा आणि थोडा वेळ राहू दिल्यास धून टाकावे.

थोडा वेळ राहू दिल्यास धून टाकावे. त्यामुळेही डोके दुखीचा त्रास कमी होतो.

मसाला चहा

गुळाच्या चहाची Recipe पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मसाला चहा हा देखील डोके दुखी वर सोपा आणि सरळ उपाय आहे. मसाला चहा मध्ये आपण सर्व साधारण पणे लवंग, मिरे, ओवा, विलायची, दालचिनी, अद्रक, इत्यादी वस्तू बारीक वाटून घालतात.

हा चहा शक्यतो आपण घरीच पितो कारण हॉटेल वर याची जास्त मागणी नसल्याने तो सहज उपलब्ध होत नाही.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये चहाला खूप महत्व आहे. भारतामध्ये जवळपास प्रत्येकजण चहाचा दिवाणा आहे.

चहा मध्ये अद्रक आणि तुळशीचे पाने टाकून गरम-गरम पिल्याने घसाला तुरंत फरक जाणवतो वडोके दुखीला आराम मिळतो.

डोके दुखीचे प्रमाण जास्त असल्यास दिवसातून तीन-चार वेळा घेऊ शकता.

चहा मध्ये अद्रक आणि तुळशीचे पाने टाकल्यावर चहाला चांगलं उकळू द्यायचं आहे.

आल्याचा चहा करून पिल्याने घशाला आराम पडतोपोटाची चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते.

पचन संस्था दुरुस्त करते.आल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.

थकवा जाणवत असल्यास आल्याचा चहा करून पिणे फायदेशीर ठरते त्यामुळे शरीरातील थकवा दूर होऊन स्फूर्ती संचारते.

चहा मुळे पोटात गॅस होत असतील तर त्यात आले मिसळून दिल्यास हे होत नाही.

आम्ही आशा करतो की डोकेदुखी वर घरगुती उपाय Dokedukhi gharguti upay in marathi विषयी दिलेली माहीती आवडली असल्यास आपल्या मित्रपरिवारात नक्की शेयर करा.


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Best Hill Stations in Maharashtra (2024) National Parks In Maharashtra Dry Day In Maharashtra 2024 Maharashtra Top Engineering Colleges Jyotirlinga In Maharashtra | महाराष्ट्रात असलेले ज्योतिर्लिंग SAG Awards 2024 Red Carpet Arrivals some pics Musheer Khan यांच्याबद्दल ५ इंटरेस्टिंग माहिती. नक्की वाचा Joe Root बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? Apple लॅपटॉप बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? नक्की पहा Article 370 Movie Information