शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी मिळणार 25 लाख सबसीडी / Goat Farming in marathi

Share with 👇 Friends.

शेळी पालन कुक्कुटपालन योजनेसाठी २५ ते ५० लाख रुपयांपर्यत अनुदान मिळणार असून यासाठी जास्तीत जास्त पशुपालक व शेतकरी बांधवानी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेलेल आहेत. Goat Farming in marathi

तुम्हाला शेळी पालन कुक्कुटपालन सुरु करायचा असेल आणि या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर जाणून घ्या या योजनेविषयी संपूर्ण माहिती.

Goat Farming

शेती व्यवसाय करत असतांना अनेक शेतकरी बांधव शेतीला जोडव्यवसाय म्हणून छोटामोठा शेती पूरक व्यवसाय करत असतात. ज्यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक सहाय्य होते.

नैसर्गिक कारणांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आणि अशावेळी शेतकरी एखादा शेतीपूरक व्यवसाय करत असेल तर शेतकरी बांधव अशा शेतीपूरक व्यवसायामुळे झालेल्या नुकसानीपासून सावरू शकतो.

अर्ज कसा कराल

ग्रामीण भागातील अनेक तरुण सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. दुग्धव्यवसाय, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, वराह पालन इत्यादी व्यवसाय करून आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतात.

वरील व्यवसाय सुरु सुरु करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. या अनुदानाच्या सहाय्याने शेतकरी बांधव त्याचे व्यवसाय सुरु करतात.

दुग्धव्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसाय करण्यास खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. दुध मास अंडी यास दिवसेंदिवस खूप मोठी मागणी होत आहे. यामुळे दुग्धव्यवसाय, शेळी पालन व कुक्कुटपालन व्यवसाय अनेक तरुण करू इच्छित आहेत.

किती अनुदान मिळणार

सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत दुग्धव्यवसाय, शेळीमेंढी पालन, कुक्कुटपालन, वराह पालन व मूर घास निर्मितीसाठी खालील पद्धतीने अनुदान दिले जाणार आहे.

कुक्कुटपालन – २५ लाख रुपये.

शेळी किंवा मेंढी व्यवसाय करण्यासाठी – ५० लाख.

वराह पालनसाठी – ३० लाख.

मूरघास निर्मितीसाठी – ५० लाख.

अर्ज कोण करू शकतो

 • व्यक्तिगत व्यावसायिक.
 • स्वयंसहायता बचत गट.
 • शेतकरी उत्पादक संस्था.
 • कलम आठ अंतर्गत स्थापन झालेली कंपनी.
 • शेतकरी सहकारी संस्था.
 • सहकारी दूध उत्पादक संस्था.
 • सह जोखीम गट.
 • सहकारी संस्था.
 • खाजगी संस्था.
 • स्टार्टअप ग्रुप.
 • राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मिळणार लाभ.

इत्यादी या राष्ट्रीय पशुधन योजनेचा लाभ घेवू शकतात. ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवक तसेच ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुपटीने वाढवावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाच्या विशेष अर्थसहाय्याने विविध योजना राबवल्या जातात.

वेटर काम करून उभा केला केटरिंगचा व्यवसाय

याच योजनेचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने सन 2022 – 2023 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे

उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित नवीन सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेस मंजुरी दिलेली आहे.

ज्या व्यक्ती वरील व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील अशा इच्छुकांनी या अभियान अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत सुरु केला जाणाऱ्या व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अर्ज कोठे कराल

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालन व डेअरी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

योजनेचा अर्ज करण्यासाठी Department of animal husbandry या वेबसाईटला भेट द्या.

योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभाग कार्यालयास भेट द्या.

योजना संदर्भातील सविस्तर माहिती वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

24 रुपये किमतीचा माल 100 रुपयाला विका

योजनेचे स्वरूप काय आहे, अर्ज कसा करावा, किती अनुदान मिळते कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज करता येतो

या संदर्भातील सविस्तर माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

या व्यतिरिक्त नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत देखील शेली मेंढी योजनेचा लाभ मिळतो.

आजच्या लेखामध्ये Goat Farming in marathi या बद्दल माहीती आवडल्यास खालील Whats App बटणावर क्लिक करून मित्रांसोबत नक्की शेअर करा. Goat Farming in marathi

👇 Please share on what’s app. 👇


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Joe Root बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? Apple लॅपटॉप बद्दल तुम्हाला हे माहिती आहे का ? नक्की पहा Article 370 Movie Information Hair Care Tips | केसांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल काही टिप्स GPT Healthcare IPO Information | जीपीटी हेल्थकेयर आईपीओ बद्दल माहिती Ameen Sayani Information | अमीन सयानी यांच्याबद्दल माहिती Indoor Games For Kids | लहान मुलांसाठी घरी बसून खेळ्यासाठीचे खेळ Benefits of drinking lemon water | लिंबू पाणी पिण्याचे फायदे Rituraj Singh Death | टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन 12th HSC Exam New Rule Information 2024 | 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती 2024