झटपट पुरणपोळी कशी बनवायची Instant Puranpoli

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कि झटपट पुरणपोळी कशी बनवायची Instant Puranpoli .

पुरणपोळी चा स्वयंपाक करायचं म्हंटल कि अर्धा दिवस लागतोच.

सना-वारा दिवशी तर आपण उत्साही आणि स्वयंपाकासाठी तयारीत असतो मात्र इतर दिवशी,

अचानक चिमुकल्यांनी पुरणपोळी खायचं म्हंटल्यावर लगेच त्यांची इच्छा पूर्ण करावी वाटते, परंतु वेळ जास्त लागेल म्हणून करायचे राहून जाते.

झटपट पुरणपोळी कशी बनवायची Instant Puranpoli

त्यासाठीच हि अत्यंत चविष्ट आणि झटपट पुरणपोळी ची रेसिपी मी घेऊन आले आहे तुच्यासाठी.

चला तर मग झटपट पुरणपोळी करण्यासाठी काय काय ingredients लागतात ते पाहू.

Ingredients :

  • चणा डाळ ( १ तास भिजवून घ्यायची आहे )
  • गव्हाचे पीठ
  • तूप/तेल/डालडा
  • गूळ
  • इलायची पावडर

झटपट पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया

सुरुवातीला १ तास भिजवलेली चणा डाळ, १ वाटी गूळ, इलायची आणि थोडासा पाणी टाकून,

त्याला मिक्सर मधून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचाय. तोपर्यंत

बॅटर

एका पातेल्या मध्ये १ छोटी वाटी गव्हाचे पीठ, आणि मिक्सर मधील मिश्रण, १ चमचा तूप किंवा तेल

आणि थोडीशी हळद (हळद पूर्ण पाने ऑपशनल आहे ). आता हे सर्व व्यवस्तीत मिक्स करायचंय,

मिक्स करण्यासाठी पळी किंवा असेल तर Patula चा वापर करायचंय.

झटपट पुरणपोळी साठी बॅटर बनवायचाय आणि त्याची consistancy एक सारखी होई पर्यंत मिक्स करायचंय.

भाजणे

पुरणपोळी भाजून घेणासाठी गॅस चालू करून तवा किंवा पॅन ठेवायचा आहे.

पॅन किंवा तव्याला सगळीकडून तूप लावून घ्यायचा आहे, यामुले पोळी जळणार नाही.

तवा थोडासा गरम झाल्यावर एका चम्मच ने आपण बनवलेलं बॅटर तव्याच्या मधोमध टाकायचं आहे.

चम्मच च्या साहाय्याने या बॅटर ला पूर्ण तव्यावर पसरवायचा आहे, ज्याप्रमाणे डोसा उत्तप्पा पसरवतात त्याप्रमाणे.

पसरवल्यावर तव्यावर झाकण ठेवून २ मिनिटे थांबायचं आहे, २ मिनिटांनी झाकण काढून पोळीला तूप लावून पोळी दुसऱ्या बाजूने पालटायचीय.

या बाजूनेही तीच पद्धत वापरून पुरणपोळी नीट भाजून घेऊया, दोन्ही बाजूने शिकल्यावर एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे.

चला तर मग झाली आहे आपली झटपट पुरणपोळी तयार, पुरणपोळी ला दूध किंवा तूप लावून खाऊ शकतो .

झटपट पुरणपोळी आवडली असल्यास आपल्या मैत्रिणीनी सोबत share करा आणि कंमेंट करायला विसरू नका.

तर मग तुम्ही पण हि सोपी रेसिपी घरी करून खा, आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी “माझी माहिती” या वेबसाईट वर पुन्हा या.

!! धन्यवाद !!

1 thought on “झटपट पुरणपोळी कशी बनवायची Instant Puranpoli”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top