मसाला व्यवसाय संपूर्ण माहिती मराठीमध्ये / Masala Business in Marathi

Share with 👇 Friends.

महिन्याला 70 ते 75 हजार रूपये कमवा मसाला व्यवसायातून याविषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये / Masala Business in Marathi

Masala Business

यात काही शंका नाही कि भारत खाण्या-पिण्याच्या पदार्थांच्या varieties मध्ये सर्वाना मागे टाकू शकतो, कारण इथे प्रत्येक राज्यानुसार पदार्थ सुद्धा बदलतात, किंवा इथे राहणाऱ्या लोकांची चव वेग वेगळी आहे.

जसे कि आपल्या महाराष्ट्रात तिखट खाणे पसंत करतात तर गुजरात मध्ये गोड.

आता या सर्व चवींचे चोचले पुरवण्यासाठी लागतात ते फक्त मसाले. या मसाल्यांचा व्यापाराला, आपण कुटीर उद्योग म्हणू शकतो किंवा त्याला Spices business देखील म्हणू शकत.

भारतातील लोकांनी अगदी सुरुवातीपासूनच मसाले बनवण्यावर प्रभुत्व मिळवले आहे.

जगभरात मसाल्यांच्या १०९ जाती आढळतात आणि त्यापैकी ७५ भारताने उत्पादित केल्या आहेत, म्हणजेच संपूर्ण जगाच्या अर्ध्याहून अधिक जाती भारताने तयार केल्या आहेत.

काहिंचे नाव तर आपन रोजच ऐकतो जसे की मिरची, धणे, हळद, लसूण, जिरे, पुदिना, एका जातीची बडीशेप, वेलची इ.

जगात भारतीय खाद्यपदार्थाची ओळख ही फक्त त्यात घालण्यात आलेल्या मसाल्यामुळे आहे, त्यामुळे बाजारात मसाल्यांची मागणी हि नेहमीच राहते.

हे पण वाचा : फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही सहजपणे मसाला बनवण्याचे युनिट उभारू शकता. या व्यवसायात खर्च कमी होतो आणि तुम्हाला जास्त नफा मिळतो.

तुम्ही तुमच्या भांडवली रकमेनुसार मसाल्यांच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू करू शकता.

आपण हा व्यवसाय लहान, मध्यम आणि मोठ्या प्रमाणात सुरू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय घरी खूप लहान प्रमाणात म्हणजेच घरघुती मसाला उत्पादन युनिट सुरू करू शकता.

मसाल्यांची मागणी आपल्याकडे इतकी आहे की अगदी छोट्या युनिटचाही तुम्हाला फायदा होईल.

मसाला उद्योगाचे भविष्य

साहजिकच प्रत्येक व्यक्ती ला नवीन व्यवसाय सुरू करताना हा प्रश्न पडतोच की आपण हा व्यवसाय का सुरू करावा? एवढं तर नक्की आहे की व्यवसाय माणूस पोट भरण्यासाठी करत असतो म्हणजेच पैसे कमवण्यासाठी.

जेव्हा माणूस एखादा व्यवसाय सुरवात करण्यासाठी निवडतो तेव्हा नक्कीच त्याने मार्केट मध्ये त्या व्यवसायाचा पूर्ण अभ्यास केलेला असतो आणि त्याच्याकडे त्या व्यवसायासाठी नवीन प्रणाली असते जी मार्केट मध्ये कोणाकडेच नसते.

राहिला विषय की मसाला उद्योग का सुरू करावा? किंवा मसाला उद्योगात किती स्कोप आहे?

यात तुम्ही Confuse असाल तर आम्ही पुढे काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या वाचून नक्कीच तुमच्या मनातील सगळे doubts clear होऊन तुम्ही घरघुती मसाला व्यवसाय सुरू करण्यास तयार व्हाल.

आपल्या भारतात मसाला उदयोगासाठी लागणारा कच्चा माल अगदी सहज उपलब्ध होतो, कारण जवळ जवळ सगळीकडे मसाला शेती केली जाते.

majhimahiti.com


मसाला व्यवसाय का कमी गुंतवणूक करून सुरू होणारा एक व्यवसाय आहे. यात तुम्ही फक्त grinding machine घेऊन हा व्यवसाय लगेच सुरवात करू शकतात. आणि

सुरवातीला छोटे छोटे मसाल्याचे packets बनवून विक्री करू शकतात.


सगळे मसाले हे फक्त जेवणात च नाही वापरले जात, काही मसाले जसे की मिरची ही लोणचे, चटणी आणि औषधे बनव्यासाठी सुद्धा वापरतात.

त्या नंतर हळद ही सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरात आणली जाते. म्हणून फक्त जेवण हे मार्केट नसून अजून भरपूर असे

मार्केट आहे ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करून आपला मसाल्याचा व्यापार वाढवू शकतात.

मसाला विक्री साठी उपलब्ध असलेले ऑपशन म्हणाल तर फक्त घरघुती स्वयंपाक घर च नाहीये, या व्यतिरिक्त हॉटेल्स, मॉल्स, कॅन्टीन, रेल्वे,

सेना canteens अशा बर्याच ठिकाणी तुम्ही मसाले पुरवू शकतात.
सुरवातीला हा मसाला उद्योग कुटीर उद्योग म्हणून तुम्ही घरी सुद्धा सुरू करू शकतात. यामुळे तुमचे बाहेर दुकानाचे भाडे वाचेल.

मसाला उद्योग कसा सुरु करावा?

याचे उत्तर अगदी सोप्पे आहे. बघा जर तुम्ही हा व्यवसाय अगदी छोट्या स्तरावर म्हणजे ज्याला आपण घरघुती मसाला उद्योग म्हणतो,

अशी सुरवात करणार असाल तर तुम्हाला अन्न परवाने (Food licence) काढावे लागणार नाही किंवा त्याची एवढी आवश्यकता भासणार नाही.

परंतु जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर म्हणजे मसाले पॅकिंग करून ते हॉटेल, कॅन्टीन, दुकाने, यांना supply करणार असाल तर

तुम्हाला काही कायदेशीर आणि इतर काही गोष्टीचा आधी विचार करावा लागेल, ज्याबद्दल आम्ही पुढे सविस्तर समजवलेले आहे.

कच्चा माल


सर्वप्रथम तुम्हाला उत्तम दर्जाचा आणि स्वस्त कच्चा मालाचा शोध घेण्याची आवश्यकता लागेल. कारण नफा मिळवायचा असेल तर कच्चा माल हा स्वस्त मिळणं फार गरजेचं आहे.

जर तुम्ही ग्रामीण भागात हा मसाला व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला तिथेच मसाल्याचा कच्चा माल सहज मिळून जाईल.

या शिवाय तो स्वस्त देखील मिळेल आणि transportaion चा मुख्य खर्च तुमचा वाचून जाईल.

जर तुम्ही शहरी भागात हा मसाला उद्योग करत असाल तर तुम्ही एखादा उत्तम सप्लायर शोधून कच्चा माल मिळवू शकता.

वेटर काम करून उभा केला केटरिंगचा व्यवसाय

टिप – Food business मध्ये दीर्घकाळ टिकायचे असेल तर quality फार महत्वाची मानली जाते, नाहीतर एकदा गेलेला ग्राहक कधीही परत येत नसतो.

कोणत्याही व्यवसायात कच्चा माल हाच पूर्ण बिजनेस चा केंद्र बिंदू असतो.

कारण कच्चा मालच जर गुणवत्तापूर्ण नसेल तर प्रॉडक्ट quality कशी maintain राहणार?
म्हणून कच्चा माल हा स्वस्त आणि त्याहून गरजेचे म्हणजे दर्जेदार आहे याची खात्री तुम्ही केली पाहिजे.

मसाला उद्योगासाठी जागा

तुमच्या घरात जर एखादी मोठी खोली ज्यात मसाले दळण्याचे आणि पॅकिंगचे असे दोघी काम पार पडत असतील तर तुम्हाला बाहेर जागा घेण्याची आवश्यकता नाही.

परंतु अस नसेल तर तुम्हाला एखादा शॉप भाड्याने घ्यावा लागेल. तुम्ही अजून एक गोष्ट करू शकतात जर तुम्हाला असा एखादा 1RK फ्लॅट मिळाला ज्यात आजूबाजूला राहणार्यांना तुमचा काहीच त्रास नसेल तर तुमचे भाडे शॉप पेक्षा नक्कीच कमी लागेल.

टिप – शॉप किंवा एखादा रूम भाड्याने घेताना agreement नक्कीच करून घ्या, कारण पुढच्या कायदेशीर गोष्टीं साठी म्हणजेच अन्न परवाने (Food Licence) साठी ते अगदी
महत्वाचे असते.

मशीनरी


मसाला व्यवसायात नंतर पुढचा पाऊल म्हणजे machinery आणि उपकरणे खरेदी करणे.


आम्ही खाली काही उपकरणे नमूद केली आहेत, ती सर्व तुम्हाला या मसाला उद्योगात उपयोगी ठरतील.


हि उपकरणे मागवताना 3 ते 4 सप्लायर्स कडून Quotations मागवा, त्यातून सर्वात स्वस्त dealer कडून उपकरणे खरेदी करा.

पुढील machinery आणि उपकरणे तुम्हाला मसाला व्यवसायात उपयोगी ठरतील –

  • Cleaner – याचे काम कच्या मालातून घाण म्हणजेच धूळ, माती, छोटे खडक बाहेर काढण्याचे असते.
  • Dryer – कच्चे मसाले दळण्याआधी त्यांना सुखवणे फार गरजेचे असते, आणि ते काम हे ड्रायर करते.
  • Grinding machine – याचे काम कच्चा माल दळून त्याला पावडर मध्ये रूपांतर करणं असते.
  • ग्रेडर – याचे काम दळून झालेल्या पावडर ला ग्रेड देण्याचे असते. म्हणजे यात पावडर जाड व बारीक याचे विलगिकरण करण्याचे काम असते. यात बारीक पावडर खाली आणि जाड वरती राहते.
  • बॅग सिलिंग मशीन – हे उपकरण मसाले वपॅकिंग साठी कामास येते.

कच्चा माल खरेदी करून मसाला व्यवसायाला सुरवात करणे.

majhimahiti.com
हे पण वाचा : शेळी पालन व्यवसाय संपूर्ण माहिती


आपण readymade मसाला बनवण्यासाठी दर्जेदार कच्चा माल शोधला, त्यांनतर व्यवसाय करण्यासाठी जागा शोधली, उपयुक्त असे उपकरणे बघितले,

ते सर्व उपकरणे व्यवस्थित स्थापित झाले असतील तर, या नंतर पुढची स्टेप म्हणजे कच्चा माल आयात करुन मसाला दळायला चालू करणे.

कच्चा माल जवळच्या शेतकरी किंवा supplier कडूनच मागवण्याचा प्रयत्न करा कारण तिकडून स्वस्तात मिळेल आणि

तुम्ही बाजारात टिकू शकाल. कारण बिजनेस चा सर्वात पहिला उद्देश्य नफा कमविणे हाच असतो.

कामगार आणि कच्चा माल जर कमी किमतीत मिळत असेल तर सुरवातीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मार्केट price पेक्षा कमीने आपण आपले मसाले विकले तर नक्कीच सुरवातीलाच ग्राहक वर्ग चांगला मिळेल.

इन्व्हेस्टमेंट

तुम्हाला तुमच्या मसाला व्यवसायासाठी लागणाऱ्या जागेचा खर्च जो तुम्ही निवडलेल्या एरियानुसार असेल.


दुसरा खर्च म्हणजे तुमच्या कच्चा मालाचा जो पुन्हा तुम्ही निवडलेल्या सप्लायर किंवा शेतकऱ्यावर अवलंबून असेल.


तिसरा खर्च जो अगदी स्पष्ट आहे तो म्हणजे मशीन आणि उपकरणे खरेदी साठी लागणार खर्च.


Grinding machine For Spices– हे उपकरण अगदी 1 हजारांपासून ते 50 हजारा पर्यंत सुद्धा येते.

तुम्ही कोणत्या स्तरावर व्यवसाय करताय हे त्यावर अवलंबून आहे.

1 हजार ते 2 हजार वाले मशीन हे Manual Operate करावे लागते जे कुटीर मसाला व्यवसाय म्हणजेच घरघुती मसाला व्यवसाय जे करताय त्यांच्यासाठी पुरेसे असेल. आणि

जे मोठ्या प्रमाणात मसाला उत्पादन करून मसाले पॅकिंग करून बाहेर supply करत असतील त्यांनी 10 हजारापासून ते 50 हजार पर्यंत असलेले मशीन सर्व गोष्टी तपासून खरेदी करावे.

Masala Business in Marathi


Cleaner For Spices– कच्चे मसाले साफ करण्यासाठी लागणारे हे मशीन तुम्हाला ऑनलाईन 10 हजारापासून ते 30 हजारापर्यंत मिळेल.


Bag sealing machine – मसाला बॅग पॅक करण्यासाठीचे हे उपकरण तुम्हाला ऑनलाईन 3 ते 5 हजार रुपयांपर्यंत मिळून जाईल.

बाकी ग्रेडर, ड्रायर आणि इतर तुम्हाला सर्व तुम्हाला 20 ते 25 हजार पर्यंत येऊन जाईल.

म्हणून मसाला उद्योगासाठी इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च किती लागेल? या प्रश्नाच थोडक्यात उत्तर म्हणजे जवळ जवळ 1 लाख रुपये.

परवाना

हा परवाना म्हणजे तुमच्यावर असलेली एक जबाबदारी असते, जेणेकरून तुम्ही ग्राहकांना दिलेले खाद्य पदार्थ हे पूर्णपणे सुरक्षित आहे,

असे सिद्ध होते आणि यामुळे कोणालाही काही त्रास झाल्यास तुमच्यावर एखाद्या ग्राहकाने तक्रार दाखल केल्यास तुमच्याकडे Food Licence असल्याने तुमच्यावर कार्यवाही होण्याचे प्रमाण कमी होऊन जाते. Masala Business in Marathi

म्हणून मसाला उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला खालील परवाने (Licence) काढणे अनिवार्य असेल –

सर्वात आधी तुम्हाला ROC Registration करावे लागेल.
जर तुम्ही छोट्या स्तरावर म्हणजे घरघुती मसाला उद्योग सुरू करणार असाल तर तुम्ही One Person Company registration सुद्धा करू शकतात.
तुम्हाला Local Municipal Authority कडून ट्रेड licence सुद्धा काढावे लागेल.
Food Operator Licence घेणे सुद्धा आवश्यक असेल.
त्या नंतर तुम्हाला BIS Certificate सुद्धा घ्यावे लागेल.

आजच्या लेखामध्ये मसाला व्यवसाय या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Masala Business in Marathi

Please Share 👇 on What’s App


Share with 👇 Friends.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
What Is GDP | जीडीपी बद्दल थोडक्यात माहिती Deepika Padukone Pregnancy One Plus Watch 2 Price In India Thar Price In India Supra Car Price In India How Many States In India Sidhu Moose Wala Supar Hit Songs Virat Kohli Net Worth In 2024 AUSTRALIA vs INDIA How Many District In Maharashtra