नमस्कार, केक घरी कसा बनवतात हे जानुन घेण्याची आपल्याला नेहमीच उत्सुकता असते, त्यातल्या त्यात मार्बल केक घरी कसा बनवायचा ? Marble Cake recipe in marathi हे तर काही नवीनच आहे.
Marble Cake recipe in marathi
परंतु अगदी सोपा आणि खूप सहज होणारा मार्बल केक घरी कसा बनवायचा Marble Cake हे आज आपण पाहणार आहोत. मार्बल केक बनवताना काय काळजी घ्यायची?
बनवताना कश्याप्रकारे अडचणी येतात आणि त्या होऊ नये म्हणून काय करायचे हे सर्व आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत.
चला तर मग मार्बल केक साठी काय-काय साहित्य लागते ते पाहुयात.
सामग्री
१) व्हॅनिला प्रेमिक्स
२) चॉकलेट प्रेमिक्स
३) गोड तेल
४) बटर पेपर
5) साखरेचं पाणी
मार्बल केक घरी कसा बनवायचा ?
- सर्वात अगोदर एखादा गोल डब्बा किंवा केक चा टिन असेल तर तो घ्यायचा आहे.
- एक छोटासा बटर पेपर घेऊन कात्रीच्या साहाय्याने डब्याच्या तळाशी बसेल असा कापून घ्यायचा आहे.
- आता टिनच्या तळाशी ब्रश च्या साहाय्याने तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यावर बटर पेपर ठेऊन यालाही तेल लावायचे आहे.
- तेल लावल्याने आपला केक खाली चिटकणार नाही आणि निघताना अगदी अलगद निघेल.
- भरपूर जणांना वाटते कि केक बनवण्यासाठी ओव्हन ची गरज लागते, परंतु ओव्हन असावेच असेही नाही याशिवायही केक उत्तम प्रकारे बनतो.
- कढई किंवा शिट्टी काढून कुकर मधेही केक बनवू शकतो त्यासाठी, गॅस कमी आचेवर ठेवायचा आहे आणि फ्री-हिट होण्यासाठी म्हणजे
- कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यात छोटासा स्टॅन्ड ठेवून त्यावर ग्लास लीड किंवा साधे झाकण ठेवून १०-२० मिनिटे ठेवायचे आहे.
१/२ किलो केक साठी
- आज आपण १/२ किलो चा केक बनवणार आहोत त्यासाठीचे माप आपण घेऊयात, जर तुम्हाला १ किलो चा बनवायचा असेल तर
- यापेक्षा दुप्पट माप घ्या. माप घेताना व्यवस्तीत मोजून घ्यायचा आहे, कारण एकदा सुरुवातीलाच माप घेताना चुकले तर संपूर्ण cake चुकू शकतो.
- १/२ किलो साठी २५०ml प्रेमिक्स वापरणार आहोत, मार्बल केक साठी आपण दोन प्रकारचे प्रेमिक्स वापरणार आहोत त्यात
- चॉकलेट प्रेमिक्स १२५ml आणि व्हॅनिला प्रेमिक्स १२५ml घ्यायचा आहे, भरपूर जण मैदा पासून हि केक बनवतात.
- आता २ पातेले घ्या एका पातेल्या मध्ये चॉकलेट चे प्रेमिक्स घ्या आणि दुसऱ्या पातेल्यात व्हॅनिला प्रेमिक्स घ्या.
- प्रत्येक प्रेमिक्स मध्ये १/२ चमचा तेल घाला प्रत्येक प्रेमिक्स मध्ये १/२ चमचा तेल घाला
- ६० ml पाणी प्रत्येकी वापरा. पाणी एकदाच न टाकता थोडे-थोडे करून टाकायचे आहे आणि हॅन्ड व्हिस्कर च्या साहाय्याने फेटून घ्यायचे आहे..
- दोन्ही प्रेमिक्स फेटताना हे बॅटर एकसारखे झाले पाहिजे, त्यामध्ये बुबल्स राहता काम नये. आता बटर लावलेल्या टिन मध्ये थोडं-थोडं दोन्ही प्रेमिक्स टाकायचे आहेत.
- ३ वेळेस चॉकोलेट आणि ३ वेळेस व्हॅनिला चे बॅटर टिन मध्ये टाकायचे आहे तर त्या प्रमाणात थोडे-थोडे करून टाकून घेऊयात.
- अगोदर आपण चॉकोलेट चे बॅटर खाली टाकुयात, त्यासाठी मधोमध बॅटर टाकुण्यात जेणे करून ते सर्व टिन वर बरोबर पसरेल.
- त्यावर मधोमध व्हॅनिलाचे बॅटर टाकायचे आहे, परत दोन्ही वेळा हीच क्रिया करायची आहे.
- अश्या प्रकारे ३ थर झाल्यास, टिनला हलकासा टॅप करायचा आहे जेणेकरून टिन मध्ये प्रेमिक्स व्यवस्थित सेट होईल.
- आता केक ला आपण डिजाईन करूया त्यासाठी एक काडी घेऊन केक च्या मधोमध ८ आडव्या रेषा मारल्यावर अगदी फोटोत दाखवल्या प्रमाणे आपला केक बनेल.
केक – बेक
- केक ला बेक करण्यासाठी कढई वरचे झाकण काढून आता हा टिन कढई मधींल स्टॅन्ड वर २५-३० मिनिटे झाकण लावून परत ठेवायचा आहे.
- २५ मिनिटांनी एका काडी किंवा चाकू घेऊन केक चा मधोमध घालून पाहायचा आहे, जर केक थोडाही त्याला चिटकला तर अजून थोडा वेळ ठेवायचा आहे.
- तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये ४ चमचे साखर आणि साखर विरघळेल एवढा पाणी घेऊन चमचानि ढवळायचा आहे.
- आता आपला केक तयार झाला असेल त्याला कढई मधून बाहेर काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचा आहे.
- केक थंड झाल्यावर पिझ्झा प्रमाणे ८ भागात तुकडे कापून घ्यागचे आहेत. आणि
- आपण बनवलेले साखरेचे पाणी पूर्ण केक वर टाकायचे आहे याने केक गोड आणि चवदार लागेल.
- चला तर मग आपला मार्बल केक झाला आहे खाण्यासाठी तयार.
मार्बल केक हा खाण्यासाठी खूप चविष्ट आणि दिसायलाही उत्कृष्ठ दिसतो, त्यामुळे या केक चे चाहते भरपूर आहेत.हा केक जास्त करून तर घरीच पाहायला मिळतो कारण या केक ला मार्केट मध्ये जास्त करून कोणीही विकत नाही.
कारण चवीने खूप गोड असला तरी आईस केक हा यापेक्षा चांगला दिसतो म्हणून कदाचित. विशेष म्हणजे दोन्ही केक बनवायची पद्धत जवळपास सारखीच आहे.
त्याला थोडीशी जास्त मेहनत आणि थोडेसे सामान जास्त लागते. आणि त्याची किंमतही त्याप्रमाणेच असते.मार्बल केक बनवताना थोडीशी काळजी घेतली कि केक कसा मस्त फुगतो आणि त्यावरची डिसाइनहि खूप खुलून वर येते.
टिप्स
1.
मार्बल केक बनवताना अगोदर डब्बा किंवा टिनला संपूर्ण तेल लावायचे आहे, हे तर आपण मगाशीच वाचलं असेल पण
जर तेल पूर्ण भांड्याला लागलं नाही तर जिथे तेल लागले नाही त्या हकानी आपला केक चिटकून बसेल आणि तेवढा तुकडा त्या डब्यालाच राहील
याने आपण बनवलेला केक का बेढब दिसणार. म्हणजे एवढी मेहनत घेऊन, इतका वेळ त्यासाठी घालायचा आणि
जेव्हा सर्व जण केक पाहून म्हणतील कि एवढा वेळ किचन मध्ये घातला आणि काय बनवलं तर हे याला धड आकार हि नाही.
असा व्हायला नको म्हणून थोडीशी एक्सट्रा काळजी या बारीक गोष्टीं वर असुद्या म्हणजे केलेली मेहनत वाया गेली असे व्हायला नको.
2.
ज्यांनी कधी केक बनवलेला नाहीये, त्यांना एक प्रश्न तर नक्की पडतो कि आपल्याकडे ओव्हन नाहीये तर मग आपण कसे काय केक बनवू शकतो??
तर याचे उत्तर असे कि, तुम्ही जे विडिओ पहिले आहेत ज्यामध्ये ओव्हन चा वापर करून केक बनवला जातो.
ते खूप प्रगत झालेले आणि मेहनत करून पुढे गेलेले लोक आहेत. त्यांनी हि अगोदरसुरुवात करताना खूप साधी आणि कमी खर्चात केलेली असेल.
हळू-हळू जसा रिस्पॉन्स भेटत गेला त्याप्रमाणे त्यांनी आणि आपणही आपल्या वस्तू वाढवू शकतो.
त्यामुळे या चुकीच्या समाजामध्ये मुळीच राहू नये कि केक बनवण्यासाठी ओव्हन लागतोच.
आम्ही सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही जर केक बनवला तर मुळीच अडचण येणार नाही कारण हा आम्ही स्वतः करून पाहलेलाच केक चे फोटो आहेत आणि नंतरच आपल्यासाठी आम्ही हे रेसिपी आर्टिकल घेऊन आलो आहोत.
3.
डेकोरेशन म्हणजेच केक ची सजावट. मार्बल केक ला सजवण्यासाठी आईस केक सारखी क्रिम वापरता नाही येत.
वर वाचल्याप्रमाणे प्रेमिक्स च्या साहाय्याने आपण त्याला पाहिजे त्या प्रमाणे डिसाइन करू शकतो मात्र प्रेमिक्स टाकताना चुकता काम नये,
नाहीतर सर केक ची डिसाइन बिगडू शकते. वरील बेक झालेल्या फोटो प्रमाणे माझ्या कडून प्रेमिक्स टाकताना हात झटकल्यामुळे शेवटी तयार झालेली डिसाइन हि थोडीशी चुकलेली aahe.
त्यामुळेच मी तुम्हाला या बारीक बारीक गोष्टींचे लक्ष करून देत आहे कि, जेणे करून आपणही त्याच चुका करू नये.
बाकी चवीला एकदम उत्कृष्ट आणि चविष्ठ, आपल्याला जसा खायचा अगदी तसाच केक तयार झाला आहे.
तुम्ही पण हि रेसिपी नक्की घरी करून पहा या नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझीमाहिती या वेबसाईट वर पुन्हा भेट द्या.
त्यामुळे त्याला काय डिसाइन करायचं ते केकला बेक करायच्या आधीच ठरवावी लागते.
तर मग तुम्ही पण मार्बल केक घरी कसा बनवायचा ? Marble Cake recipe in marathi ची सोपी रेसिपी घरी करून खा, आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी “माझी माहिती” या वेबसाईट वर पुन्हा या.
!! धन्यवाद !!
Nice Recipe
Ya cake var creame lavli tar chalel ka ?