पशुपालन हे देशातील एका मोठ्या वर्गाचे उत्पादनाचे साधन आहे. मात्र त्यावर लंपी नावाच्या संसर्गजन्य रोगाने ग्रहण लागले आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे हा लंपी स्किन डिसीज व त्याबद्दलची माहिती. Lumpy in marathi
जनावरांमध्ये एक नवीन आजार काही दिवसांत दिसून येत आहे.
लंपी या विषाणूजन्य व संसर्गजन्य स्किन चा आजार सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत झाला.
बैलपोळा सणाचे महत्व 👈 येथे क्लिक करा.
Lumpy disease in marathi
लंपी स्किन डिसीज आजाराची सुरुवात भारतात सर्वात प्रथम 2019 मध्ये ओडिसा राज्यातून माहिती मिळाली.
त्याचा संसर्ग झपाट्याने होतो, जनावरांना अज्ञात रोगाची लागण होते.
तर हा लंपी रोग त्वचारोग आहे. तज्ञांनी या रोगावर भरपूर अभ्यासही केला व औषधी शोधून काढली.
यांची मुख्य लक्षणे म्हणजे अचानक ताप येणे व त्वचेवर गुत्ती येणे असे आहे.
अशा या पशूंच्या त्वचारोगामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त होत आहेत.
काही दिवसापासून या लंपी रोगाचे पशु आढळत आहेत. या त्वचारोगावर औषध उपचार दिले जातात.
पशुवैद्यकीय यावर उपचार करतात हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा गाईचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येतो.
म्हैस मध्ये 1.6% तर गोवर्गीय मध्ये 30 % आढळून येतो. सर्वसाधारणपणे देशी गोवंश्यांपेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता जास्त असते.
आणि संभाव्यता मृत्युदर एक ते पाच टक्के पर्यंत असते. गाय व म्हैसांची दुग्ध उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात घटते व काही वेळा गर्भपात होतो.
प्रजनन क्षमता ही कमी होते. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंची साधारण्य असणारा आहे.
या डीसीज चा संपूर्ण राज्यात शिरकाव झाला आहे. गाईमध्ये हा रोग प्रामुख्याने आढळतो.
राजस्थान मध्ये लंपी चे सर्वाधिक बळी आहेत. केंद्र सरकार च्या म्हणण्यानुसार हा आजार गुजरात पंजाब उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान आणि आंध्र प्रदेशात पसरला आहे.
कॅप्रीपॉक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा रोग होतो. लंपी चा प्रसार माणसांमध्ये होत नाही. व तो हवेतूनही संक्रमित होत नाही.
रोगप्रसार कसा होतो ?
आजाराचे प्रसाराचे मुख्य कारण म्हणजे डास गोचीड माशा चिलटे आहेत.
लंपी आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो.
जेव्हा विषाणूंचा संक्रमण होतो तेव्हा एक ते दोन आठवड्यापर्यंत ते विषाणू रक्तामध्ये राहतात. आणि
नंतर ते शरीराच्या इतर भागात संक्रमण करतात. त्यामुळे नाकातील श्राव तोंडातील लाळ डोळ्यातील पाणी यामधून विषाणू बाहेर पडून,
चारा व पाणी दूषित होतो आणि यामुळे अबाधित जनावरांना विषाणूचा प्रसार होऊ शकतो.
स्किन वरील खपल्या गळून पडल्यानंतरही त्यामधील विषाणू जास्त काळ जवळपास 35 दिवस जिवंत राहू शकतो.
वीर्यात विषाणू संसर्गजन्य पशूकडून अबाधित पशूकडे येत असल्याने रोगाचा फायदा नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतनातून होऊ शकतो.
या आजाराची लागण गावंजनावरात झाल्यास शक्यतो गर्भपात किंवा रोगग्रस्त वासराचा जन्म होऊ शकतो.
उष्ण व आग्रा हवामानात या रोगाचा अधिक प्रसार होतो. वासरांमध्ये देखील रोगाची तीव्रता अधिक दिसून येते.
हिवाळ्यात थंड वातावरणामध्ये या रोगाचा प्रसार कमी प्रमाणात होतो. Lumpy in marathi
लंपी रोगाची लक्षणे
केंद्र सरकारने केंद्रीय स्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
हिमाचल प्रदेश सरकारने लंबी रोगाला महामारी म्हणून घोषित करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे.
- या आजारात सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनावरांना 41 अंश सेल्सिअस पर्यंत ताप येऊ शकतो.
- स्किन वर हळूहळू 10 -50 mm व्यासाच्या गाठी येतात.
- यामुळे प्रामुख्याने पाय कास मायांग डोके मान भागात येतो व या गाठीतून पू येऊ शकतो. या गाठी वेदनादायी असतात.
- लसिका ग्रंथींना सूज येते
- लंबी आजारामध्ये सर्वात अगोदर पशूंच्या नाकातून व डोळ्यातून पाणी येते.
- सर्वसाधारणपणे एक ते दीड आठवडा भरपूर ताप येतो.
- आजारामुळे मरतुकीचे प्रमाण कमी होते तरी रोगी जनावर अशक्त होत जातात.
- या रोगात स्किन खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते.
- तहान – भूक मंदावते. पायावर सूज येते त्यामुळे जनावरांना नीट चालता ही येत नाही.
- या आजाराची इन्फेक्शन जर नाकामध्ये गेले तर निमोनिया होऊ शकतो.
रोग नियंत्रण कसे करावे ?
लंपी डीसीजच्या आजारामुळे पशुपालकांची होणारे नुकसान टाळण्यासाठी व तसेच या डीसीसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी,
या रोगाबद्दल व करायच्या उपाय योजनेबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. Lumpy in marathi
लंपी स्किन या आजाराबद्दल माहिती व रोग प्रादुर्भाव होऊ नये यासाठीच्या उपाययोजना पशुसंवर्धन खात्याने केले पाहिजे.
तज्ञांच्या मते हा रोग टाळण्यासाठी सर्वोत्तम मार्ग पुढील प्रमाणे
- बाधित जनावरांना वेगळे ठेवावे तसेच अबाधित व बाधित जनावरे वेगवेगळे चरावयास सोडावेत.
- अबाधित जनावरांची बाधित भागातून ने आण बंद करावी.
- चटकन रोग नियंत्रणासाठी डास गोचीड व माशा इत्यादींचे निर्मूलन करावे.
- शक्य होईल तेवढे कीटकनाशक औषधीचा जनावराच्या संपूर्ण शरीरावर व त्यांच्या गोठ्यात फवारा मारावा.
- आपण हा आजार प्रतिजैविके दर 5 ते 7 दिवस देऊन नियंत्रित ठेवू शकतो.
- सध्या वेगाने पसरणाऱ्या या डिसीजवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोटपॉक्स ची लस लावण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जात आहे.
- गोटपॉक्स लस या रोगाशी लढण्यासाठी खूप प्रभावी सिद्ध झाली आहे
- पशूंच्या गोठा मध्ये पाणी साचू देऊ नये, चिखल होऊ देऊ नये, तसेच कपाशी असू नये.
- जेणेकरून तेथे माशा चिलटे इत्यादींचा प्रसार होणार नाही.
लसीकरण कसे करावे ?
प्रयोगशाळा तपासणी द्वारे निदान झालेल्या जनावरांना केंद्र म्हणून 0 ते 5 किलोमीटर परिसरातील,
चार महिन्याच्या वरील सर्व गाई व म्हशी वर्गातील जनावरांना जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मार्फत लसीकरण करण्यात यावे.
जेणेकरून हा आजारामुळे इतर जनावरे बाधित होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत बाधित जनावरांना लसीकरण करू नये.
असा सल्ला सुद्धा देण्यात येतो. पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना संपर्क करावा.
टोल फ्री क्रमांक 180023301 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशु सेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.
जनावरांमध्ये वरील प्रमाणे रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा.
कोणत्याही कागदपत्राशिवाय ही लस मोफत पुरवली जाते म्हणून शेतकऱ्यांनी पशुंना ही लस टोचून घ्यावी. Lumpy in marathi
आजाराचे निदान कसे करावे ?
आपल्याला सर्वप्रथम काही नमुने जमा करता येतात.
रोग झालेल्या जनावरांचे रक्त व रक्तजल नमुने, डोळ्यातील, नाकातील किंवा तोंडातील श्रावणाचा नमुना.
तसेच जनावरांच्या शरीरावरील आलेल्या गाठीतून निघणारा श्रावाचा नमुना घेऊन या आजाराचे निधन करता येते.
लंपी मुळे मृत जनावरांची विल्हेवाट कशी लावावी ?
मृत जनावरांची विल्हेवाट कशी लावावी याची एक वेगळी पद्धत सांगितली जाते.
लंपी आजारामुळे काही जनावरे मृत होतात अशा जनावरे आठ ते दहा फूट खड्डा खोदून पुरावीत.
आणि पुरताना मेलेल्या जनावरांच्या अंगावर चुना किंवा इतर जंतुनाशके टाकून नंतर त्यांची विल्हेवाट लावावी.
जेणेकरून या आजाराचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावी. Lumpy in marathi
या घातक लंपी स्किन डिसीज आजाराबद्दलची माहीती आपल्या सर्व शेतकरी मित्रांना पाठवा. जेणेकरून निरागस जनावरांचे प्राण वाचतील. Lumpy in marathi