चला मग थोडक्यात जाणून घेऊया की पूर्वीचे जीवण कसे होते. LIFE BEFORE TECHNOLOGY
तंत्रज्ञानाच्या या युगात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व काही सहज आणि सोप्या पद्धतीने काही बटन दाबले की सर्व कामे अगदी झटपटीत होतात.परंतु तंत्रज्ञानाच्या या यूगाच्या अगोदर चे जीवन कशाप्रकारे होते, तेव्हापासून मानवी जीवनामध्ये काय बदल घडत गेले.. हे होणारे सर्व बदल आपले आई-वडील आजी आजोबा या सर्वांनी होताना पाहिली आहेत.तर चला मग थोडक्यात जाणून घेऊया की पूर्वीचे जीवण कसे होते ??How was the Life Before Technology
पूर्वीचे जीवण कसे होते ? LIFE BEFORE TECHNOLOGY
तंत्रज्ञानाचे युग आला जवळपास 1990 पासून सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. तर आता आपण 1990 सालचे अगोदरचे जगजीवन कसे होते ते पाहणार आहोत..
मानवाला जगण्यासाठी फक्त तीनच मूलभूत गरजा होत्या त्या म्हणजे “रोटी, कपडा और मकान”.
या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी नोकरदार व्यापारी यांची धडपड असायची.
पूर्वी शेतकरी हा शेतात भरपूर पीक पिकवायचा कारण त्याकाळी पाऊस आहे भरपूर पडायचा.
पंधरा-पंधरा दिवस पाऊस चालूच राहायचा परंतु तेव्हा सुधारित अवजारे नव्हती
शेतकरी हे बैल यांच्या साह्याने शेती करायचे.त्याकाळी शेतीमध्ये कापूस मका तूर मूग मटकी फुलके उडीद बाजरी या पिकांचे रब्बीला उत्पन्न घ्यायचे.पूर्वी शेतकरी हा शेतात भरपूर पीक पिकवायचा कारण त्याकाळी पाऊस आहे भरपूर पडायचा.
आणिखरीप हंगामाला ज्वारी गहू हरभरा हे पीक घ्यायचे.
विना रासायनिक खत शिवाय शेणखत जास्त वापरायचे.शेतमाल विकायचा तेव्हा बैलगाडीने शेतातील माल बाजारापर्यंत पोहोचवायचे.
पूर्वीचे जीवण कसे होते ? LIFE BEFORE TECHNOLOGY
पूर्वीचे जनावरं गाय म्हैस बकरी हे सगळे खूप दूध द्यायचे. पूर्वीचे जीवण कसे होते ?घरातील आई आजी या दुधापासून दही ताक लोणी तूप करायच्या शेतात गेले की,जांभूळ करवंद गाजर पपई सिताफळ खूप काही खायला मिळायचं..पूर्वी 500 किंवा 600 लोकसंख्येचे खेडे असायचे या खेड्यात एक तरी नदी असायची त्यामुळे पाण्याची कमी नसायची. गावामध्ये टपाल पेटी असायची.शाळा सातवी वर्गापर्यंत असायची आणि पुढच्या शिक्षणाला तालुक्याला किंवा जिल्ह्याला सायकलवर जावे लागायचे, कारण त्याकाळी मोटरसायकल गाड्या नव्हत्या. सर्व जीवन अगदी सहज आणि सोपे होते. आता तंत्रज्ञानाने खूप प्रगती केलीय मात्र या महत्वाच्या आणिलहान-लहान गोष्टीचा आजच्या पिढीला कुठे तरी विसर पडतो आहे, याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.
गणवेश –
मुलींसाठी शाळेचा ड्रेस हा निळा स्कर्ट किंवा चॉकलेट स्कर्ट पांढरे ब्लाऊज असायचे डोक्यामध्ये दोन वेण्या वर रिबीनीने बांधून त्यांचे फुल.आणि मुलांना पांढरा शर्ट व खाकी रंगाची हाफ पॅंट असायची.विना गणवेश गुरुजी शाळेमध्ये घ्यायचे नाही. त्याकाळचे गुरुजी ही खूप कडक असायचे.पाढे उजळणी दिलेला गृहपाठ पूर्णच करावा लागत असे, नाही तर पालकांना घेऊन या असं गुरुजी सांगायचे.शाळेत जाण्यासाठी दप्तर नाही तर वायरची किंवा कपड्याची छोटी पिशवी असायचे कधी पायामध्ये साधी निळ्या रंगाची चप्पल असायची तर कधी अनवानी. श्रीमंत घरची मुले पिशवीऐवजी स्टील ची पेटी आणायची.
दळण वळण –
दळणवळणाचे साधन खूप कमी होते. गावामध्ये श्रीमंत आकडे मोटर बाईक असायचे.एसटी बस खूप कमी प्रमाणात असायच्या. नातेवाईक मित्रमंडळींना संपर्क साधण्यासाठी फोन नव्हते, त्या ऐवजी पोस्ट ऑफिस होते. पत्र आणायचे लिहायचे व टपाल पेटीत टाकून द्यायचे.मग त्यांना ते एक आठवड्यानंतर पत्र मिळायचे आणि तिकडून उत्तर येण्यासाठी एक आठवडा लागायचा.
पोशाख –
पुरुषांचा पेहराव धोतर शर्ट व फेटा असा रुबाबदार असायचा आणि स्त्रियांचा पेहराव नऊवारी काष्टा घालून लुगड घालायचा. शहरी भागातील पुरुषांचा पेहराव हा शर्ट पॅन्ट व स्त्रिया सहा वार साडी नेसायच्या.पूर्वीच्या काळी सण हे मोठ्या उत्साहात साजरे व्हायचे. एखादा सण आला कि घरातील लहान मुलांना आवर्जून कपडे घायचे, आणि जर थोडे फार जास्तीचे पैसे असतील तर घरातील मोठ्यांना कपडे आणि महिलांना लुगडे घ्यायचे.
१. वट सावित्री पूर्णिमा –
वट सावित्री पौर्णिमा हा सण बायकांचा. सकाळपासून स्वयंपाकाच्या तयारीला लागायचे.
दुपारपर्यंत स्वयंपाक आटोपून नवीन साडी नेसून सर्व बायका वडाच्या झाडाजवळ एकत्र यायच्या आणि वडाच्या झाडाला दोरा बांधून प्रदक्षिणा घालत असे.
आताही हे सर्व सण होतात मात्र तो उत्साह मात्र नक्कीच हरवला आहे. काही बायका तर
या मोठ्या सणांना ड्रेस घालतात. यात काहीच गैर नाही पण या सणांना साडी नेसायचा मन असतो.
अशी जुन्या काळातील लोकांची समाज असायची.
२. आषाढी एकादशी –
“पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनिया गाठ” म्हणत आषाढी एकादशीला स्त्रिया व पुरुष हे सर्व पंढरपूरला उपवास पकडून पायी वरी असायची.पायी वारी मध्ये “विठ्ठल विठ्ठल जय हरी” या नामाचा जप करत पंढरपूरला जायचे.विठ्ठल-रुकमुनींचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तांचा जीव लागलेला असतो.
३. नागपंचमी –
नागपंचमी हा सण स्त्रियांचा, मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. नागपंचमीच्या दिवशी नागाच्या भुयाराला महिला ओवाळतात, भुयारावर दूध टाकतात. असे म्हंटले जाते कि पंचमीच्या दिवशी नाग देवता दूध पितात. या सणाला मुलगी माहेर येते जोके खेळते व नंतर नवीन साडी नेसून परत सासरी जाते.
४. बैलपोळा –
वर्षभर शेतामध्ये जनावरे प्रामुख्याने यांचा हा सण. शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना सकाळीच धुतात,
जनावरांना रंगरंगोटी करून अंगावर नक्षी काढून. झुला टाकून गळ्यामध्ये पितळी घुंगर माळा घालून,
शिंगे रंगवून संध्यकलच्या वेळी घरातील पुरुष मंडळी नवे कपडे घालून बैलाला गावात मिरवण्यासाठी घेऊन जातात.
त्यांना पुरणपोळी खाऊ घालतात आणि रात्री गाय व बैल यांच्या लग्नाचा कार्यक्रम होतो.
५. राखी पौर्णिमा ( नारळी पौर्णिमा ) –
राखी पौर्णिमा/ रक्षाबंधन हा कार्यक्रम खास बहिण-भावाचा.
या सणाला कधी भाऊ बहिणीच्या घरी राखी बांधून घ्यायला येतो तर कधी बहिण भावाच्या घरी जाते.
आणि नारळी पौर्णिमा ही कोळी बांधवांचे असते समुद्राला भरती आल्यावर कोळी बांधव त्यामध्ये नारळ वाहतात व समुद्राला प्रार्थना करतात की सगळं मंगल होऊ दे.
६. गणपती –
गणपती बाप्पा येणार ऐकूनच घरातील चिमुकली मंडळी उत्साहाने गणपती बाप्पा मोरया गुणगुणू लागतात.
हा सण १० दिवसांचा. हे दहा दिवस अगदी आनंदात आणि उत्साहात जातात.
गणेश मूर्ती स्थापन होते आणि सकाळ संध्याकाळ आरती साठी सगळे एकत्र येतात.
प्रसाद वाटला जातो. दहा दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. नंतर बाप्पा बहिणीला घेऊन येतात.
७. मंगळा गौरी –
मंगळागौरी म्हणजेच लक्ष्म्या आल्यावर घरामध्ये सजावट होते छान छान देखावे केले जातात.
घरामध्ये लाडू करंज्या चकली बनवले जातात. घरातील लहानग्यांची तर धुम असते.दुसऱ्या दिवशी पंचपक्वान्नाचे जेवण करतात. तिसऱ्या दिवशी भेटी गाठी घेऊन परत जातात.
८. दसरा –
दसरा सण खूप मोठा, आनंदाचा नाही तोटा. नवे कपडे घालून पुरुष मुले गावाच्या सीमेवर जाऊन,
तेथे म्हणजेच आपट्याची पाने वाटून सीमोल्लंघन करतात. सोन्याची पाने एकमेकांना द्यायची आणि
थोरामोठ्यांना दिल्यास त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे.दसऱ्याच्या दिवशी घरातील धन, द्रव्याची पूजा करतात. सोने खरेदी नवीन घर नवीन गाडी दुकानाची नवीन सुरुवात दसऱ्याच्या दिवशी केल्यास भरभराट होते.
९. दीपावली –
दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. या दिवशी राम जिंकून आले त्यामुळे दिवाळी साजरी केली जाते दिवाळी.हा चार दिवसांचा सण. मोठ्या उत्साहात फटाके वाजवून साजरा केला जातो.अंधारातून प्रकाशाकडे नेणारा या सणानिमित्त घरामध्ये लाडू करंज्या चकली बुंदी शंकरपाळे असे अनेक गोड-धोड प्रकार घरामध्ये बनवतात. पाहुणे, मित्रमंडळी याना फराळाचे करण्यासाठी घरी बोलाविले जाते.त्यानिमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे होते, भेटी गाठी होतात हा त्या मागचा उद्देश असतो.चिमुकल्यांची तर दिवाळीला असते नवीन कपडे फटाके दिवाळीच्या सुट्ट्या. दिवाळीचा सण आला म्हटलं की मामाच्या गावाला जायची तयारी. सगळेच अगदी मोठ्या उत्साहात असतात.LIFE BEFORE TECHNOLOGY
१०. संक्रांत –
संक्रांत हा स्त्रियांचा सण असतो. पुरणपोळीचा स्वयंपाक करून झाल्यावर,
या दिवशी स्त्रिया एकमेकींना भेटून हळदी-कुंकू, वान देतात.
या दिवशी स्त्रिया आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढावे यासाठी प्रार्थना करतात.
संक्रांतीला घरामध्ये खान-पानाची खूप चंगळ असते. लहान मुलांची तर मज्जाच असते.
पूर्वीचे जीवण कसे होते ? LIFE BEFORE टेकनॉलॉजि किती साधारण राहणीमान आणि मनमिळाऊ लोक होते.
पैशानं पेक्षा जास्त माणुसकीला महत्व दिले जायचे. सना-वाराला एखाद्याचा घरी काही अडचणींमुळे गोड केलेलेनसेल,
तर त्यांना आपल्या घरी आवर्जून बोलावून सोबत घेऊन जेवण करायचे.
पूर्वी कशाचीही अपेक्षा नसायची कि,मी याच्या साठी हे केलं तर त्याने पण माझ्यासाठी ते करावे. हे सर्व प्रकार आता पैशांना महत्व आल्याने खूप ठिकाणी दिसून येते.
११. वेळा अमावस्या –
वेळ अमावस्या या सणाला स्वयंपाक करून शेतात घेऊन जातात आणि तिथे नातेवाईक शेजारी मित्र-मैत्रिणी यांना बोलावून शेतामध्ये जेवू घातले जाते.
त्यावेळी गव्हाची खीर आणि ताकाची आंबील यांचा मान असतो.
LIFE BEFORE TECHNOLOGY