उद्योजक होण्यासाठी उद्योग निवडण्याची गरज असते उद्योजक होण्याचा एकदा निर्णय घेतला की उद्योग कोणता सुरू करावा ?, कशाचा करावा ?, कुठे करावा ? असे बरेच प्रश्न सर्वांच्या समोर उभे राहतात. How to Choose a Business
सर्वात अगोदर आपली आर्थिक परिस्थिती, उपलब्ध बाजारपेठ, इत्यादी बाबींचा विचार करून आपल्याला कोणत्या व्यवसायाची निवड करावी लागेल हे पहावे.
Choose a Business
बरेचसे नवीन उद्योजक स्वतः मार्केटचा सर्वे करून स्वतःच्या कल्पनेतून एखादा व्यवसाय निवडू शकतात. एखाद्या वस्तूची मार्केटमध्ये मागणी असेल आणि ती सहज उपलब्ध होत नसेल असा व्यवसाय नेहमीच फायदेशीर ठरू शकतो.
व्यवसायाची निवड करताना काही गोष्टींचा विचार करणे खूप गरजेच्या असते. त्या कोणत्या आहेत ते पाहूया.
महत्वाचे पाॅइंट्स
आपल्या जवळील मार्केटमध्ये सर्वे करून पहावे की बाजारात कोणत्या वस्तूची मागणी जास्त आहे.
० त्या वस्तूची बाजारातील सरासरी किंमत काढणे.
० भविष्यात त्या मालाची मागणी वाढू शकते की घटू शकते याचा अंदाज घ्यावा.
ती मागणी असलेली वस्तू आपल्या जवळच्या बाजारात कोठून येते आणि ती किती किमतीला मिळते याचा अंदाज घ्यावा.
० आपण जर ती वस्तू बनवून बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकली तर आपल्याला किती नफा राहतो हे पण लक्षात घ्यावे.
फॅशनेबल आणि ट्रेंडिंग ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
० कारण मागणी असल्यास कमी किमतीतही तुम्ही जास्त नफा मिळवू शकता.
वरील सर्व माहिती बाजारपेठामध्ये स्वतः फिरून, नियतकालिकातून, वृत्तपत्रामधून गोळा करणे आणि एका नोटबुक मध्ये लिहिणे.
त्यासोबतच जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी आणि तुमच्या तालुक्यातील उद्योग निरीक्षकांची भेट घ्या त्यांना आपली सद्यस्थिती सांगा व त्यांच्याकडून सल्ला घ्या व उद्योगाविषयी माहिती करून घ्या.
तुमची आर्थिक परिस्थिती उद्योगा विषयी असलेले ज्ञान आणि अनुभव यांचा विचार लक्षात घेऊन आपल्याला जे चांगल्या पद्धतीने जमेल असे चार ते पाच उद्योग निवडा.
निवडलेल्या उद्योगांमधून त्या वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे जाऊन त्या वस्तूची मागणी किती आहे हे परत एकदा तपासा आणि त्या वस्तूचे उत्पादन कारखान्यांना भेट द्या.
या चार ते पाच उद्योगांचा बारकाईने अभ्यास करा या वस्तूंची बाजारातील मागणी लक्षात घ्या,
कामगारांचे पेमेंट, जागेचे भाडे, कच्चामालाची किंमत हे सर्व वेगळे केल्यानंतर निव्वळ नफा कोणत्या वस्तूंमध्ये जास्त मिळतोय, त्यानुसार व्यवसाय निवडा.
एकदा व्यवसाय निश्चित झाला की त्या वस्तूच्या उत्पादनास उपयुक्त पुढील गोष्टी लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला सहज व्यवसाय सुरू करता येईल.
लक्षात ठेवा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडलेल्या व्यवसायाची सुरुवात कमीत कमी गुंतवणुकीत करता येते का हे पहावे, कोणताही व्यवसाय सुरू करताना जास्त पैसे गुंतवू नये जोपर्यंत तो सुरळीत चालत नाही तोपर्यंत.
● गुंतवणूक कमी आणि खेळते भांडवल जास्त – आपण निवडलेल्या व्यवसाय असा आहे का हे पहावे.
○ लागणाऱ्या मशिनरी विषयी माहिती घ्यावी. कोणत्याही व्यवसायाची सुरुवात ही लहान मशीन पासूनच करावी.
● त्या व्यवसायासाठी लागणारा कच्चामाल आपल्या जवळच्या बाजारपेठेत भेटतो का नसल्यास तो कोठे भेटतो आणि त्यासाठी लागणारा खर्च काढावा.
घरातून ऑनलाईन काम करून लाखो कमवा
● आपण जी वस्तू बनवणार आहेत त्या वस्तूला आपल्या जवळच्या बाजारपेठेत मागणी असायला हवी जेणेकरून सुरुवात आपल्या गावापासूनच करता येईल.
○ त्यामुळे तुमचा खर्चही कमी होईल. व्यवसाय एकदा सुरळीत चालू झाल्यानंतर तुम्ही दूरपर्यंत तुमचा माल पाठवू शकतात.
● आपण करत असलेला व्यवसाय अगोदर किती जण करत आहेत, याची खात्री करून घ्यावी. अन्यथा कॉम्पिटिशन वाढल्याने आपल्याला तोटा होऊ शकतो कारण आपली सुरुवात असणार आहे.
● आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे आपल्याला निव्वळ नफा किती राहतो हे पहावे.
आजच्या लेखामध्ये व्यवसाय कसा निवडावा ? या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. How to Choose a Business
Please Share 👇 on What’s App