काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी उपाय Home Remedies

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरील काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी उपाय Home Remedies .

प्रत्येकालाच वाटते कि आपला चेहरा सुंदर, आणि चमकदार, निस्तेज असा असावा,

परंतु रीक पुरळ, मुरूम, पुटकुळ्या व त्यांच्या पासून निर्माण होणारे काळे डाग.

यांच्या मुळे चेहरा अगदी विचित्र दिसू लागतो. यामुळे कुठल्याही कामात आपले लक्ष लागत नाही.

कोणाला बोलण्याची उच्च होत नाही, सतत एकटं राहावं वाटत. हे सर्व चेहऱ्यावरील बारीक पुरळ, मुरूम, पुटकुळ्या

यावरील उपाय मुळीच नाहीयेत. तर यासाठीच आम्ही काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.

चमकदार आणि सुंदर चेहरा तर सर्वांनाच हवा असतो, आणि त्यासाठी आपण कित्येक पैसे देखील खर्च करतो.

पण हे घरगुती उपाय जर नेहमी करत राहिलात तर नक्कीच चेहरा डागविरहित आणि चमकदार होईल.

कि जे आपल्या घरातील वस्तूंपासून हे उपाय करता येतील. चला तर मग पाहुयात चेहऱ्यावरील बारीक पुरळ, मुरूम, पुटकुळ्या यावरील लाभदायक आणि घरगुती उपाय.

चेहऱ्यावरील काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी उपाय Home Remedies

आम्ही घेऊन आलो आहोत आपल्यासाठी सुंदर आणि डाग विरहित चेहरा दिसण्यासाठी आपण एक घरगुती उपाय. Home  Remedy .

यासाठी आपल्याला खूप कमी सामग्री लागणार आहे.

  1. गुलाब जल
  2. “व्हिटॅमिन E” च्या गोळ्या
  3. एलोवेरा जेल
  • एक प्लास्टिक चा dabba घ्यायचा आहे ज्याला झाकण असेल असा, कारण आपण जे मिश्रण बनवणार आहोत ते खूप काळ टिकेल यासाठी.
  • डबा हा प्लास्टिकचाच घ्यायचा आहे लोखंडी किंवा अल्युमिनियम चा अजिबात नाही कारण डब्याला गंज लागू नये म्हणून.

  • सुरुवातीला डब्यामध्ये गुलाबजल घ्यायचे आहे, आणि जेवढे गुलाबजल घेतले आहे त्याच्या दुपटीने एलोवेरा जेल घ्यायचे आहे.

  • उदा. जर गुलाबजल १००ml घेतले तर एलोवेरा जेल 200ml घावे.

  • आता डब्यामध्ये “व्हिटॅमिन E” च्या ५ गोळ्या टाका. या गोळ्या कोणत्याही जनरल स्टोर वर किंवा मेडिकल स्टोर वर मिळतात.

  • आता या सर्वांचे मिश्रण तयार करायचे आहे, यासाठी १० मिनटे सलग याला मिक्स करायचा आहे.

  • १० मिनिटे झाल्यावर हे मिश्रण जेल सारखे होईल, जास्त घट्ट हि नको नि जास्त पात्तळ हि नको.

  • हे जेल तुम्ही दिवस आणि रात्री दोन्ही वेळा लावून शकता.

  • जेल लावण्या अगोदर फक्त कोमट पाण्याने चेहरा धुवून याला चेहऱ्यावर लावायचं आहे.

  • रात्री लावून चेहरा सकाळी अंघोळीच्या वेळी जरी धुतला तरी चालेल.

  • हे रोज चेहऱ्यावर लावा आणि अगदी काहीच दिवसांमध्ये आपल्याला चेहऱ्यामध्ये फरक जाणवू लागेल.

  • चेहऱ्यावरील काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी हा उपाय नक्की करून पहा, आणि हे आर्टिकल आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये share करायला विसरू नका.

चेहऱ्यावरील बारीक पुरळ व मुरूम, यावरील घरगुती उपाय.

बारीक पुरळ, मुरूम, पुटकुळ्या व त्यांच्या पासून निर्माण होणारे काळे डाग.यांच्या मुळे चेहरा अगदी विचित्र दिसू लागतो. यामुळे कुठल्याही कामात आपले लक्ष लागत नाही.कोणाला बोलण्याची उच्च होत नाही, सतत एकटं राहावं वाटत. हे सर्व चेहऱ्यावरील बारीक पुरळ, मुरूम, पुटकुळ्या यावरील उपाय मुळीच नाहीयेत. तर यासाठीच आम्ही काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.चमकदार आणि सुंदर चेहरा तर सर्वांनाच हवा असतो, आणि त्यासाठी आपण कित्येक पैसे देखील खर्च करतो.पण हे घरगुती उपाय जर नेहमी करत राहिलात तर नक्कीच चेहरा डागविरहित आणि चमकदार होईल.कि जे आपल्या घरातील वस्तूंपासून हे उपाय करता येतील. चला तर मग पाहुयात चेहऱ्यावरील बारीक पुरळ, मुरूम, पुटकुळ्या यावरील लाभदायक आणि घरगुती उपाय.

1.

पपई तर सर्वांनाच खायला आवडते आणि पपई खाणे आरोग्यासाठी खूप उपयुख असते. या सोबतच याचा उपयोग चेहरा उजळावा म्हणून हि करता येतो. पपईची फोड कापून ती चेहत्यावर चांगली रगडायची आहे, जोपर्यंत पपईचा गर पूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला लागत नाही तोपर्यंत रगडायची आहे. जवळपास १ तासाने कोमट पानाने चेहरा धुवून घायचा आहे. पहिल्या वापरताच आपल्याला फरक दिसून येईल.हा उपाय नेहमी केल्याने चेहऱ्यावरील डाग, धब्बे निघून जातात आणि चेहरा खूप उजळतो.

2.

घरातील बटाट्यांचाही उपयोग सौंदर्य वाढवण्यासाठी होतो. बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि उकडल्यानंतर बटाटे थंड होण्यासाठी थंड पाण्यात टाकायचे आहेत. बटाटे पूर्ण थंड झाल्यावर त्याच्या सालीसोबत वाटून घायचे आहेत. बटाटे वाटून झाल्यावर त्याच्या मध्ये काकडी किसून टाकायची आहे आणि थोडासा लिंबाचा रस. हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून एकजीव करायचे आहे.आता आपला बटाटा लेप तयार झाला आहे. तो दिवसातून एकदा चेहऱ्यावर लावायचा आहे. हा लेप नेहमी चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात आणि चेहरा डागविरहित दिसतो.

मुरूम

मुरुमांचा त्रास हा साधारणतः तरुण वयातील मुलांना होतो. आणि फक्त मुलांनाच नाहीतर मुलींनादेखील होतो. ज्यांना हा त्रास आहे ते मुरुमांचा त्रास बारा व्हावा यासाठी खूप आणि वेग-वेगळे इलाज किंवा उपाय करतात मात्र यातून काहीच निष्पन्न होत नाही. या उलट आपण ज्या tubes आणि फेसवॉश वापरतो त्यामधिल chemicals च्या अति वापरामुळे चेहरा अजून बिघडतो.चेहऱ्यावरील मुरुमांना आराम पाडण्यासाठी आम्ही काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. ते पाहूया

3.

मुरुमांना आराम मिळण्यासाठी गुलाब जल, ग्लिसरीन आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण बनवून हे मिश्रण रोज रात्री चेहऱ्यावर लावून झोप आणि सकाळी कोमट पाण्यानी धुवून घ्या. हा उपाय कमीत-कमी किमान महिनाभर करायचा आहे. हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील मुरुमांना आराम तर मिळतोच मात्र याहूनही अधिक त्वचा मऊ आणि तजेलदार बनते. परंतु हे सर्व उपर नियमित केल्यासच यांचा फरक दिसून येतो त्यामुळे हे उपाय काही दिवस सतत करावे ज्याने कि त्रासाला आराम मिळेल.

4.

चेहऱ्यावरील मुरूम जाऊन चेहरा उजळण्यासाठी Home Remedies २ कप दूध आटवून घ्यायचे आहे. २ कपाचे किमान १ कप होईपर्यंत हे दूध आटू द्यायचे आहे. दूध आतून झाल्यावर याला हलवत राहायचे आहे ज्याने कि दूध घट्ट बनेल आणि दुधाला घट्ट बनवत असतानाच त्यात अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आणि पुन्हा हे मिश्रण चांगले मिक्स करायचे आहे. दूध पूर्ण थंड झाल्यावर रात्री झोपताना हा लेप चेहऱ्यावर लावूनझोपायचा आहे. ज्यांना मानेचा काळपट पण घालवायचा असेल त्यांनीही अशीच क्रिम तयार करून आपल्या मानेवर रात्री झोपताना लावून झोपायची आहे आणि सकाळी कोमट पाण्याने धुवून टाकायचीय.हि क्रिया महिनाभर केल्यास चेहऱ्यावरील मुरूम तर नाहीसा होतोच आणि चेहराही उजळतो.

5.

टमाटे, गाजर आणि बिट यांचा उपयोग चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी होतो. पण त्यासाठी आम्ही जे सांगणार आहोत हि क्रिया सतत करायची आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवणासाठी टमाटे, गाजर आणि बिट यांचा बारीक किस करून त्यांचा रस काढायचा आहे. आणि हा रस रोज पिल्याने चेहऱ्यावर तेज येती आणि बारीक नको असलेल्या सुरकुत्या कमी होतात.

वरील सर्व उपाय हे रोज केल्याने यांचा लाभ आपल्याला होऊ शकतो. आणि याशिवाय जर कोणाला अजून चेहऱ्याचये सौंदर्य वाढवण्यासाठी काही घरगती उपाय माहिती असतील तर आपल्या वेबसाईट वरील संपर्क साधा या पागे वर जाऊन तेथे दिलेला फॉर्म भरून आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.अजून कोणत्या विषयावर आपल्याला माहिती हवी असेल तर तरी आम्हास सुचवा आणि चेहऱ्यावरील काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी उपाय Home रेमेडीएस याविषयीची माहिती आपणास आवडली असेल तर खाली दिलेल्या कंमेंट बाँक्स मध्ये आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.

Home Remedies विषयी थोडक्यात दिलेली माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आपल्या मित्रां मध्ये नक्की Share करा आणि कंमेंट करायला विसरू नका.

majhimahiti.cochi

!! धन्यवाद !!

1 thought on “काळे डाग, बारीक पुरळ व सुरकुत्या यासाठी उपाय Home Remedies”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top