नमस्कार, आज आपण पाहात “तूप” घरी कसे बनवायचे ? How to Make Clarified Butter .
आपले स्वागत आहे Kitchen IRANI Channel मध्ये. आज आपण पाहणार आहोत लहान-मोठे सर्वांचेच आवडते आणि स्वादिष्ट. ज्याला आपण दूध, डाळ, वरण, भात, हलवा, शिरा, बिर्याणी, आणि अश्या भरपूर डिशेश सोबत आपण या रेसिपी ला खाऊ शकतो.
आज आपण पाहणार आहोत लहान-मोठे सर्वांचेच आवडते आणि स्वादिष्ट.
हॉटेल मध्ये भेटत तसं पण घरगुती व शुद्ध देशी तूप, जे आपण या रेसिपी च्या माध्यमातून बनवणार आहोत, चला तर मग देशी तूप बनवायला उशीर कशाला. आपण आज जी रेसिपी पाहणार आहोत ती एकदम शुद्ध आणि जुन्या काळा प्रमाणे बनवणार आहोत.
“तूप” घरी कसे बनवायचे ? How to Make Clarified Butter
गाईच दूध खाण्यास चांगले मानतात म्हणून आम्ही गाईच्या दुधाची साय आम्ही रोज सलग ८ दिवस फ्रीझ मध्ये साठवली होती. त्यालाच आपण मलाई म्हणतो.मलाई काढताना ती थंड जागेतच ठेवायची नाहीतर ती खराब हि होऊ शकते,त्यामुळेच आम्ही मलाई फ्रीझ मध्ये ठेवण्याचे सुचवितो.८ दिवसांनी जमा झालेली मलाई एका मोठ्या पातेल्या मध्ये घ्यायची आहे,कारण आता आपल्याला त्या मलाई पासून लोणी तयार करण्यासाठी सोप्प जाईल.
- त्यासोबतच लोणी काढण्यासाठी आपला पारंपरिक रवी जो कि सर्वांच्याच घरात असेल. आणि १ ग्लास पाणी.
- चला तर मग मलाई च्या पातेल्या मध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि याला आता रवी नि घुसळायचंय.
- सलग थोडा वेळ घुसळल्यावर लोणी वेगळं होताना दिसेल.
खूप लोक तर फक्त या कारणांनी तूप खात नाहीत कि तूप खाल्ल्याने जाडी वाढेल, वजन वाढेल, खरी गोष्ट तर हि आहे कि शुद्ध तूप खाल्ल्यानं वजन आणि कोलेस्टेरॉल दोन्ही कमी होतात आणि चेहरा हि टवटवीत दिसतो.
- तूपमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असल्या कारणाने ते आपल्या शरीराला ड्राय होण्यापासून वाचवते.
- शुद्ध देशी तूप पचनासाठी मदत करते, त्यांना अपचनाचा त्रास असेल त्यांनी तूप नक्की खायला पाहिजे .
- तुपामध्ये “व्हिटॅमिन ए, डी & इ” असल्यामुळे हृदय साठी देखील खूप लाभकारी असते.
- जवळपास २० मिनिट घुसळून झाल्यानंतर अर्धे लोणी तयार होईल, अजून १० मिनिट रवीने घुसला म्हणजे पूर्ण लोणी वर येईल आणि
- खाली फक्त ताक राहील
- शुद्ध तुपाची हि खासियत असते कि ते कधीही खराब होत नाही आणि खूप काळासाठी आपण त्याला साठवून ठेऊ शकतो.
- अर्ध्या तासानंतर आपले लोणी वेगळे झालेले आपलयाला दिसेल आणि ताक खाली राहील,
- लोणीला गोल गोळ्याच्या आकारामध्ये गोळा करायचंय आणि वेगळ्या पाटल्या मध्ये ठेवायचं.
साजूक तूप
- आता गॅस ला कमी करून लोण्याला गॅस वरती ठेवायचं, गॅस वर ठेवताच लोणी पाघळू लागत.
- लोणी पूर्ण पाघळल्यानंतर त्याला गॅस वरच ३० मिनिटे उकळू द्यायचा आहे.”तूप” घरी कसे बनवायचे ? How to Make Clarified Butter
- लोणी चांगल उकळू लागल्यावर त्यात एक लवंग टाकायची आहे. लवंग ऐवजी तुळशी किंवा नागेली च पण पण आपण त्यात टाकू SHAKTO.
- तूप नियमित खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते, प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीरातील उत्साह पण वाढतो
- त्यामुळे नियमित तुपाचे सेवक करणे गरजेचे असते .
- २० मिनिट तूप उकळल्यानंतर त्याला हलकासा पिवळसर रंग येऊ लागेल. मग एका चम्मच ने तुपाला हळुवारपणे हलवत राहायचं
- यामुळे तूप खाली लागणार नाही
- ३० मिनिटे झाल्यानंतर तुपाला चॅन असा पिवळा रंग आणि वास येत असेल तर मग आता गॅस बंद करायचंय. आणि तुपाला थंड होण्यासाठी अजून ३० मिनिटे ठेवायचं.
- तूप पूर्ण पाने थंड झाल्यानंतर तूप वरच्या वर तरंगत असेल आणि खाली बारीक बारीक गोळ्या सारखी बेरी जमा झाली असेल,
- त्याला वेगळा करण्या साठी एकाद्या चाळणीने त्याला गाळून घ्यायचा आहे.
- चला तर मग आपले हॉटेल सारखे पण घरगुती, शुद्ध देशी गाईचे तूप खाण्यासाठी तयार झाले आहे.
तर मग तुम्ही पण हि सोपी रेसिपी घरी करून खा, आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी “माझी माहिती” या वेबसाईट वर पुन्हा या.
Khup Sopy Paddhat sangitlya baddal Thank You