बैलपोळा सण हा महाराष्ट्रीयन सण असून खूप महत्त्वाचा आहे. बैल हे आपल्या शेतकऱ्याचे खरे मित्र आहेत. चला तर मग जाणून घेऊया बैलपोळा सणाचे महत्व.Bailpola
बैल आहे म्हणून शेतकऱ्यांना शेती करता येते, बैल नसते तर शेती करता आले नसते.भारत देश हा कृषीप्रधान व शेतीप्रधान देश आहे.
शेती आहे म्हणून भारत हा समृद्ध व संपन्न आहे शेतीमुळे कृषी व्यवस्था आपले आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे.
त्यामुळे शेतकरी बांधव हा खूप महत्त्वाचा आहे. आणि शेतकरी बैलावर अवलंबून असून बैल महत्त्वाचा आहे.
बैलपोळा सणाचे महत्व
त्यामुळेच तर महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सांगता झाली की, म्हणजे श्रावपाती नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, हे सगळे सण साजरी होतात. व
श्रावण महिना साजरा होतो. श्रावण संपल्यावर नंतर भाद्रपद महिना सुरू होतो.
बैलपोळा निमित्त मित्रांना तुमचे नाव टाकून शुभेच्छा द्यायच्या असतील तर येथे क्लिक करा
सुरू झाल्या दिवशीच अमावस्या असते. त्याच दिवशी दर्श अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या म्हणजेच “बैलपोळा सण” असतो. आणि
याच दिवशी आपण पोळा सण साजरी करतो. या दिवशी बैलाची पूजा करतात, कारण
बैलराजा आणि शेतकरी यांची मैत्री
बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. बैल शेतकऱ्याचे खूप काम करतो आणि मदत करतो. शेतात नागरणी, वखरणी, कोळपणी करतो.
शेतातील आलेले पीक – धान्य धनाच्या घरी नेण्याचे, बाजारपेठेत नेण्याचे, बैल गाडी ही ओढतो तेव्हा बैल हा प्राणी खूपच महत्त्वाचा प्राणी आहे.
आता या युगात बरेचसे शेतीचे कामे यंत्राच्या सहाय्याने करता येतात, परंतु ग्रामीण भागात बऱ्याच प्रमाणात बैलाचा उपयोग होतो.
तेव्हा शेतकरी त्यांचे लाडाने नावही ठेवतो. जसे सर्जा – राजा, ढवळ्या – पवळ्या, इत्यादी नाव ठेवतात.
Google वर तुमच्या दुकानाची ( Mini Website ) जाहिरात करायची असल्यास येथे क्लिक करा.
बैलाचा सण साजरी का करतात तर बैल हा शेतकऱ्याचा खूप प्रकारे मदत करतो. काही कामे असे आहेत की, ते कामे बैलच करू शकतो.
ग्रामीण भागात बैलाला खूप महत्त्व आहे त्यामुळे बैलाचे शेतकऱ्यावर खूप ऋण आहेत.
शेतकरी बैलाचे लाड आणि प्रेमही भरपूर करतात. त्यामुळे बैलच ऋण व्यक्त करण्याचे शेतकरी प्रयत्न करतो.Bailpola
बैलपोळा सणाची अख्यायिका
बैलपोळा या सणाची अख्यायिका आहे ती अशी ही प्रथा महादेवाने चालू केली. महादेवाचे वाहन नंदी आहे.
त्यांनी नंदीला पृथ्वीवर जाऊन एक संदेश सांगण्यासाठी पाठवले, तो संदेश असा होता – मानवाला असे जाऊन सांगा की दोन वेळा अंघोळ व एक वेळेस जेवण.
हा संदेश देण्यासाठी महादेवाचा सेवक नंदी निघाला. लक्षात राहायचे नाही म्हणून रस्त्याने घोकत निघाले. Bailpola
घोक्ताने थोड्यावेळाने हे वाक्य थोडे बदल झाले, ते नंदीच्या लक्षात आले नाही. तेच वाक्य ते बोलत चालले आणि पृथ्वीवर येऊन त्यांनी मानवाला सांगितले की,
बैलपोळा चे दुसरे नाव बेंदूर असेही म्हणतात.
दोन वेळा जेवण व एक वेळ आंघोळ करा. आणि परत महादेवाकडे गेले. महादेवाने विचारण्यास नंदिनी सांगितले मानवास मी असा संदेश दिला आहे की,
दोन वेळा जेवण व एक वेळा अंघोळ असे खरे ते सांगितले. तेव्हा महादेवांनी या चुकीच्या संदेशामुळे नंदीवर नाराज होऊन म्हणाले की,
नंदी तू आता पृथ्वीवर जाऊन त्या शेतकऱ्यांना मदत कर मग वर्षातून एकदा शेतकरी तुला आंघोळ घालून पूजा करतील,
मिरवणूक काढतील, व तुला सुग्रास अशी पुरणपोळीचे नैवेद्य दाखवतील. आणि एक दिवस तुला कामाला जुम्पणार नाहीत.
म्हणून नंदी खाली आले तेव्हापासून पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण साजरी करतो. तर
पोळा हा सण वाढवडिलांच्या रूपात साजरा करतात. Bailpola
बैलपोळा कसा साजरा करतात.
हा सण असा साजरा करतात – बैलाला सकाळीच खांदे मळणीसाठी कोणी घरीच गरम पाण्याने अंघोळ घालतो, तर
कोणी शेतात नदी ओढा असेल तिथे नेऊन आंघोळ घालतो.
आंघोळीच्या अगोदर बैलाला लोणी व हळद एकत्र करून खांद्यावर चोळतात.
हळद कशामुळे कारण बैल हा नवरदेव असतो. त्याचे संध्याकाळी लग्न करतात, त्यामुळे हळद लावतात व गरम पाण्याने त्याचे खांदे चोळून धुतात.
नंतर पूर्ण शरीर स्वच्छ धुऊन पुसून कोरडे करून त्यावर रंग लावतात यास खांदा मळणी म्हणतात.
अंगावर रंगाने छान डिझाईन काढतात, बाशिंग बांधतात, शिंगांना गोंडे, राख्या किंवा छोटे आरसे बांधतात.
कपाळावर डिझाईन काढतात. सधन घरातील बैलाच्या पाठीवर झुला टाकतात.
आपला बैल सगळ्यात चांगला दिसण्यासाठी बरेच काही बांधतात. गळ्यात घुंगर माळा, पायात घुंगरू बांधतात,
बैलाला बांधण्यासाठी कासरा ही नवीन असतो. हे सगळे खांदे मळणीच्या वेळेस करतात.
आता खांदे मळणीच्या वेळेस बैलाच्या पायावर पाणी टाकून कुंकू लावतात. त्यांना खाण्यासाठी फळ, गव्हाच्या पिठाचे तयार केलेले असतात.
ते खाऊ घालायचे, ओवाळायचे मग बैल सजला की, ढोल ताशाच्या गजरात त्याची वाजत – गाजत मिरवणूक निघते. आणि
मिरवणूक गावातील मंदिरासमोर थांबते, तिथे मंदिराला एक प्रदक्षिणा घालते, मग पोळा फुटला असे म्हणतात.
नंतर बैल आपल्या मालकांच्या घरासमोर येऊन थांबतो तिथे त्याची कुंकू लावून पायावर पाणी घालून,
अक्षदा वाहून दूर्वा व आगडा बेल पान वाहून त्याची पूजा करतात. व वाढतात नारळ फोडतात बैलाला धरलेल्या माणसाला कुंकू लावून,
नारळ साखर प्रसादाच्या रूपात देतात. संध्याकाळी गाईलाही असे सजवून गाय व बैलाचे लग्न लावून देतात.
पोळा या दिवशी बैलाला पूर्ण दिवस हिरवा चारा खाण्यास देऊन, त्याला पूर्ण दिवस आराम देतात. असा हा पोळा सण साजरा होतो.
हा पोळा सण ग्रामीण भागातील झाला जे ग्रामीण भागातील लोक शहरात राहायला आलेले आहेत. बैलपोळा सणाचे महत्व Bailpola
मातीच्या बैलजोडीची पुजा.
मातीचे किंवा पीओपी चे दोन किंवा पाच बैल एक गाय व वासरू विकत आणतात. जिथे पूजा करायची तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची.
तिथे चौरंग ठेवायचा चौरंगा भोवती छान रांगोळी टाकायची, चौरंगावर लाल नवीन कापड टाकायचे.
त्यावर तांदळाची रास टाकायची, कोपऱ्यात तांदळाची रास टाकायची. त्यावर गणपती ठेवायचा. त्याची पूजा करायची. म्हणजे
हळदी कुंकू लावून गणपतीला दूर्वा, आगाडा, बेल पान व फुल व्हायचे ओवाळायचे अगरबत्ती लावायची.
पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य हळद-कुंकू, नागवेलीचे पान, सुपारी, वाती, समई, कापूर, गंध फुल, अगरबत्ती,
आघाडा, बेलाचे पान, दूर्वा, काकडी पाच प्रकारचे फळ, खडीसाखर, नारळ, बैल जोडी, गाय – वासरू इत्यादी.
प्रथम दोन पान खाली ठेवायचे. पानाजवळ तांदळाची रास ठेवायची, त्यावर बैल गाय – वासरू उभे करायचे, बैलांना प्रथम फुलांनी पाणी लावायचे.
नंतर हळद-कुंकू लावायचे, शिंगावर दूर्वा बेल पान आघाडा पान फुल वाहायचे, वस्त्र माळ घालायची.
शिंगोळे करून बैलाच्या शिंगात अडकवायचे, हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून एक फळ व गुळ खोबरे चा नैवेद्य दाखवायचा. व
पूजा करून ओवाळायचे. समयी लावून कापूर टाकून ओवाळायचे. नंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा.
अश्या प्रमाणे पोळा सण साजरा मोठ्या ऊर्जाबचत साजरा करतात. वर्षातून एकदा बैलाला ओवाळून त्याची पूजा करतात. हा पारंपारिक सण आख्या भारतात साजरा होतो.Bailpola
बैलपोळा सणाचे महत्व हा आर्टिकल आवडल्यास मित्रांना नक्की शेयर करा.Bailpola