पालक पकोडे कसे बनवायचे Palak Pakode At Home

कांदा भजी, मिरची भजी ऐकूनच तोंडाला पाणी येतं, आणि त्यात जर पाऊस पडत असेल मग तर खावेशेच वाटतात.आज आपण पाहणार आहोत, कुरकुरीत पालक पकोडे कसे बनवायचे Palak Pakode At Home .

घरी सहसा एखादा सण असेल तरच भजी खायला भेटतात, त्यामुळे जास्त करून आपण भजी आणि पकोडे हे बाहेर हॉटेल मधेच खातो. आणि ते खूप चविष्ट हि लागतात. पण काही हॉटेल वर आपण पाहतो कि, स्वच्छते कडे जास्त लक्ष दिले जात नाही. त्यामुळे काही वेळेस आपण ते खातहि नाही. जी स्वछता आपल्याला आपल्या घरात मिळू शकते ती बाहेर कधीच मिळणार नाही.एखाद्या ठिकाणी मिळालीच तर घरच्या सारखी चव त्याला येत नाही.

पालक पकोडे कसे बनवायचे Palak Pakode At Home

स्वछता आणि चव हे दोन्ही आपण घरीच बनवून खाल्ल्यावर आपल्या मनासारख्या भेटतील.चला तर मग पाहुयात कुरकुरीत पालकाचे पकोडे बनवण्यासाठी काय-काय सामग्री लागते.

सामग्री

१) पालकाचे पान
२) मीठ
३) जिरे
४) ओवा
५) हिरवी मिरची
६) हळद
७) लसुन
८) खाण्याचा सोडा
९) तेल
१०) कोथंबीर
११) बेसन पीठ

पकोडे बनवण्याची कृती
  • सगळ्यात अगोदर पकोडे जेवढे हवे असतील, तेवढेच पालकाचे पाने स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुऊन घ्या व कोरडी करून घ्या.
  • म्हणजेच आपण जेव्हा बेसन पीठ त्याला लावू तेव्हा ते व्यवस्थित पानाला चिटकतील.
  • खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची , ओवा व लसूण टाकून बारीक कुटून घ्या.
  • तोपर्यंत तेल गरम करायला एका कढई मध्ये ठेवा.
पकोडे मिश्रण
  • आता आपण बनवणार आहोत पकोडे साठी लागणारे बॅटर त्यासाठी मोठ्या भांड्यात एक वाटी बेसन , चवीनुसार मीठ, अर्धा चमचा पेक्षा कमी हळद,
  • बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि उठलेले मिश्रण.
  • या भांड्यात घालून त्यात थोडे-थोडे पाणी टाकत व्यवस्थित फेटून घ्यावे.
  • आपले बेटर खूप पातळ नको आणि खूप घट्ट हि नको ते मध्यम असायला हवे.
  • पकोडे कुरकुरीत होण्यासाठी तेल जास्त गरम करायला नको. त्यासाठी
  • थोडंसं बेसन पीठ जे की आपण भिजवलेला आहे ते थोडं तेलात टाकून बघा तेल जास्त गरम व्हायला नको.
  • जर बेसन पीठ टाकलेले पटकन वरती येत असेल तर समजा आपल्याला हवे आहे तसे तेल गरम झाले आहे.
  • एकेक करून पालकाची पाने मिश्रणात बुडवून त्याला व्यवस्थित वरून मिश्रणाचा लेप व्यवस्थित लावून, ही पाने गरम तेलात सोडायची.
  • पकोडे कुरकुरीत होण्यासाठी मेडियम गॅसच्या आचेवर तीन ते चार मिनिटे व्यवस्थित तळून घ्या.
  • काही जण तेल खाल्ल्याने त्रास होतो म्हणून भजी, पकोडे अथवा तळलेलं पदार्थ खाऊ शकत नाहीत.
  • त्यासाठी आम्ही खाली काही टिप्स दिलेल्या आहेत त्यांचा स्वयंपाक करताना पुरेपूर वापर करावा म्हणजे या गोष्टींचा त्रास होणार नाही.
  • पकोडे व्यवस्थित तळून झाल्यावर ते टिशू पेपरवर अथवा कागदावर काढून घ्या, त्यामुळे त्यातील जास्तीचे तेल टिशू पेपर वेचून घेईल.
  • चला तर मग गरम-गरम आणि कुरकुरीत पालक पकोडे खाण्यासाठी झाले आहेत तयार..

पालक पकोडे म्हणजेच आपले भजे जे कि आपण घरी कधी एखादा सण असेक किंवा कुणी पाहुणे घरी आले तर बनतात. आणि या व्यतिरिक्त सर्वांच्याच घरी बनतात असा एक मौसम म्हणजे पावसाळा. पावसाळा सुरु झाला कि चहा आणि भाज्यांची आठवण येते. आणि भर पाऊस चालू असताना गरम-गरम भजे खाण्याची तर मजाच वेगळी आहे. वाचूनच आलं ना तोंडाला पाणी..साधे भाजी, कांडा भजे तर आपण नेहमीच खातो म्हणूनच आम्ही हि थोडीशी नवीन मात्र आपल्या सर्वांच्या परिचयाची पालक पकोडे हि रेसिपी घेऊन आलो आहोत.

मार्बल केक घरी कसा बनवायचा ? 👈Click here

टिप्स

1.

सर्वात अगोदर एक महत्वाची टीप जे सर्वांनाच माहिती आहे कि तेलाचा वापर कमी आणि मोजका करणे.आपल्या घरातील आज-आजोबा आणि ज्यांना ऍसिडिटी चा भयंकर त्रास होतो अश्यांसाठी तर हि टीप खूप उपयुक्त ठरेल. तेल कमी वापरणे हे सर्वांनाच माहिती असेल पणते कसे हे आज मी सांगणार आहे .अगदीच बारीक-बारीक गोष्टी मधून या अथय गोष्टी करता येतात.* खाण्याचं सोडा वापरू नये – जर कोणताही पदार्थ जो टाळायचा आहे किंवा टेलमधून काढायचा आहे तर त्यामध्ये खाण्याचा सोडा अजिबात घालायचा नाहीये कारण खाण्याचा सोडा जास्त तेल धरून ठेवते. त्यामुळे तळलेले पदार्थ कितीही चविष्ट होत असतील तरी नंतर तेल खाल्ल्याने त्रास झाल्यावर त्याचा काय उपयोग. जर एखादा पदार्थ बनवताना खूपच गरज भासली तर अगदी कमी प्रमाणात म्हणजे जेवढी नेहमी टाकता त्या पेक्षा अर्धा या प्रमाणे खाण्याचा सोडा वापरा. आणि जर खाण्याचा सोडा वापरात आहेत तर मग खालील टिप्स नक्की लक्षात असू द्या.जेणेकरून बनवलेल्या अदार्थामध्ये जास्त तेल राहणार नाही.  

* गरम तेलाचा वापर – गरम तेलाचा वापर करणे म्हणजे आपण जेव्हा काही टाळण्याची तयारी करत असू त्याच वेळी तेल कढई मध्ये
गरम होण्यासाठो ठेवायचे आहे जेणेकरून ते चांगले गरम होईल. कारण काही टाळायचे पदार्थ तेल कमी गरम असताना त्यात तळण्यासाठी
टाकले तर ते प्रमाणापेक्षा जास्त तेल शोषून घेतात. आणि पचपचीत होतात. खातानाही त्या पदार्थपेक्षा जास्त तेलाचीच चव आणि
तेलाचाच वाशी येतो. म्हणून एक खूप माहात्व्हाची गोष्ट आहे कि तेल अगदीच गरम असले पाहिजे जेणेकरून पदार्थ जास्त तेल
शोषून घेणार नाहीत आणि त्यांना तेलाचा वासहि येणार नाही. हे सर्व बारीक गोष्टी आपल्याला माहितीच आहे पण याच बारीक-बारीक गोष्टी
गडबडीत राहून जातात आणि मग बनवलेले पदार्थ घरात कोणी न खाल्ल्याने ते तसेच पडतात. आणि आपण घेतलेल्या एवढ्या
मेहनतीवर पाणी पडत.Palak Pakode At Home

झाऱ्याचा उपयोग

झाऱ्याचा उपयोग करणे हे तर अगदीच सामान्य आणि रोजच्या कामातील गोष्ट आहे असे वाटू शकते.मात्र एखाद्या वेळेस जर झाऱ्या सापडला नाही तर आपण लगेच एखादा चमचा किंवा पाली घेऊन त्याने काम भागवतो. त्या साठीच मुद्दाम हि टिप्स येथे देत आहोत कि चमचा किंवा पळीने जर आपण भाजे काढले तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल राहते, हे आपणही अनुभवले असेल नक्कीच. तर असे न करता झाऱ्याचा वापर करणे खूप महत्वाचे आहे. झारीमुळे अगदी थोडेशे तेल भाज्यांना राहते आणि उरले सुरले प्लेट मध्ये काढल्यानंतर tissu पेपरशोषून घेतो म्हणून झाऱ्याचा उपयोग नक्की नेहमीच करा ज्या वेळेस काही टाळायचे असल्यास अगोदरच सर्व वस्तू शोधून thevaम्हणजे जास्त अडचणी येणार नाहीत. आणि करायचे तर सर्व निटनिटके जेणे करून कोणालाही तो पदार्थ खाल्ल्याने त्रास होणार नाही.

* tissu पेपर चा वापर – तीससु पेपर चा वापर करणे हे सर्वच पदार्थांसाठी वापरू शकता. तळून झाल्यावर ज्या प्लेटमध्ये भाजे किंवा पकोडे काढायचे आहेत त्या प्लेट मध्ये tissu पेपर लावायचा आहे. यांनी भज्यांमध्ये जेवढे तेल असतेते सर्व तेल या पेपर वर राहते आणि बिना तेलाचे आणि तेही चविष्ट खायला सर्वांनाच आवडेल आणि त्रासहि होणार नाही.तर या छोट्या मात्र महत्वाच्या टिप्स नेहमीचीच लक्षात असू द्यायच्या आहेत. कारण ज्यांच्यासाठी आपण एवढी mehnatघेत आहोत आणि एवढी चॅन डिश बनवत आहोत त्यांनाच जर जास्त तेल असल्यामुळे ती खाऊ वाटत नसेल तरएवढी मेहनत घेऊन काय उपयोग. आणि शक्य तेवढ्या पदार्थ बनवताना tissu पेपर चा वापर करणे आवश्यक आहे.Palak Pakode At Home

तर मग तुम्ही पण हि सोपी रेसिपी घरी करून खा, आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी “माझी माहिती” या वेबसाईट वर पुन्हा या.

majhimahiti.com

!! धन्यवाद !!

1 thought on “पालक पकोडे कसे बनवायचे Palak Pakode At Home”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top