भारत यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा Har Ghar Tiranga in marathi
ही मोहीम म्हणजे आजादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभरामध्ये वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उत्सव १३ ते १५ ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला २ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.
स्वातंत्र्य लढ्यामध्ये अज्ञात सैनिक जवान क्रांतिकारक स्वातंत्र्य लढ्यामध्ये घडलेल्या विविध घटना याची आठवण व्हावी, देशभक्तीची जाज्वलय भावना कायमस्वरूपी जन्मनात रहावी.
हर घर तिरंगा Har Ghar Tiranga in marathi
यासाठी डोळे दिपणार्या इतिहासाचे अभिमान पूर्वक स्मरण राहण्यासाठी,स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात या कार्यक्रमासाठी
दिनांक 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर झेंडा हा तीन दिवसांचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तर
हर घर झेंडा या विषयावरील शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम हा 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत
राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, यांचे इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयं स्फूर्तीने करणे गरजेचे आहे.
तेव्हा तिरंग्याचा इतिहास नियम व अटी ही आपल्याला माहिती पाहिजे
प्रथम आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा इतिहास पाहूया
- 1906 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकात्याच्या अधिवेशनात ध्वज फडकला होता.
- त्याचा रंग सगळ्यात वर हिरवा, त्याखाली पिवळा रंग व त्यामध्ये वंदे मातरम लिहिलेले होते. त्याखाली केशरी हे तीन रंग होते.
- 1907 मध्ये जर्मनीमध्ये भारताच्या चळवळीत इंग्रजांच्या विरोधात ‘मॅडम भिकाजी कामा’ यांनी स्टोअर गार्ड च्या सामाजिक चळवळीत काम पाहिले,
- तेव्हा ध्वज पुन्हा बदलून त्यामध्ये ध्वजाचा रंग सर्वात वर केसरी व त्यात 8 कमळाचे फुल होते,
- त्याखाली पिवळा रंग व त्यामध्ये वंदे मातरम लिहिलेले होते व शेवटी हिरवा रंग त्यावर सूर्य व चंद्र असे चित्र होते.
- 1917 पासून भारतात ‘होमरूल लीग’ ही चळवळ टिळकांनी सुरू केली.
- त्यांनी ध्वजाचा रंग चौकोनामध्ये वर लाल त्याखाली हिरवा (लाल हिरवा) असा सात पट्ट्यांमध्ये झेंडा तयार केला.
- 1921 मध्ये विजय वाड्यात पांढरा हिरवा व लाल भडक असा तीन रंगाचा ध्वजा ठरला.
- कालांतराने महात्मा गांधींचे वर्चस्व वाढत चालले होते त्यामुळे गांधीजींनी हिरव्या रंगात तीन दांड्याचा चरखा लावला.
- 1917 मध्ये आंध्र प्रदेशातील व्यंकय्या पिल्ले यांनी आपला तिरंगा तयार केला.
- सर्वात वर केशरी मध्यभागी पांढरा रंग व सर्वात शेवटी हिरवा रंग आणि पांढरा रंगावर सारनाथ चे विजयस्तंभ. 24 आर्या असणारा अशोक चक्र आहे.
18 जुलै १९४७ ला कायदा तयार झाला यावेळी भारत पाकिस्तान यांची युद्ध झाले व यामध्ये भारतापासून पाकिस्तान दोन तुकड्यात झाला. व
बांगलादेश वेगळा झाला अखंड भारत म्हणून भारत देश वेगळा झाला.
भारत स्वातंत्र होतानी रक्तरंजित म्हणजे कित्येक सैनिकांचे, नागरिकांचे रक्त सांडले म्हणून भारताने त्यानुसार राष्ट्रध्वज बनविला, तर
आपल्या व्यवसायाची गुगल वर ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रध्वज/तिरंग्याच्या रंगाचे वर्णन यानुसार
सर्वात वरती आहे तो केशरी रंग लढलेल्या दारातील ती पडलेल्या शहिदांच्या शौर्याचे प्रतीक आहे.
पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. यामध्ये महात्मा गांधीजींनी शांततेचा, हिंसा न करण्याचा संदेश दिला. गौतम बुद्ध यांनी अहिंसेचा संदेश दिला.
सर्वात खाली हिरवा रंग आहे. हिरवा रंग हे दर्शवते की भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी व्यवस्थेवर भारताची अर्थव्यवस्था आधारित आहे.
पांढऱ्या रंगांमध्ये चक्र आहे ते निळ्या रंगाचे सारनाथ येथील विजयस्तंभ, या स्तंभामध्ये 24 आर्या असून याचा अर्थ 24 तास ‘सुजलाम सुफलाम’ असा होतो. हे अशोक चक्र आहे.
झेंड्याची लांबी – रुंदी किती पाहिजे ?
झेंडा हा कधीही तीन फूट लांब व दोन फूट रुंद असावा आणि झेंडा खूप मोठा करायचा असल्यास 12 फूट लांब व आठ फूट रुंद आणि मध्यम करायचा असेल तर नऊ फूट लांब व सहा फूट रुंद असावा अशी मान्यता आहे.
या झेंड्याचे कापड 1947 सालापासून ते आतापर्यंत खाली ग्रामोद्योगाने खादीचे कापड पुरविले.
झेंडा हा रेशीम धाग्यांनी बनविलेला पाहिजे किंवा लोकरी पासून झेंडा तयार केलेला पाहिजे.
आता 2022 मध्ये राष्ट्रीय ध्वज हा सॅटीन सिल्क मध्ये बनविण्यास सांगितले आहे.
1947 मध्ये स्वातंत्र्य भारतावर झेंडा फडकवायचा होता म्हणून प्रथम ध्वज तयार करून ध्वज फडकवला. त्यानंतर राष्ट्रगीत तयार करण्यात आले.
26 जानेवारी 1950 रोजी संविधान तयार झाले व घटना लागू करण्यात आली. त्यानंतर
रवींद्रनाथ टागोर यांनी ‘काव्य गीतांजली’ संग्रह मधून पहिले कडवे घेऊन त्याचे राष्ट्रगीत तयार केले.
रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे व बांगलादेशाचे राष्ट्रगीत लिहिले आहे. राष्ट्रगीत हे 52 सेकंदातच म्हणायचे असते.
आतापर्यंत आपल्याला झेंडा खादी रेशीम लोकरी धाग्यांपासून झेंडा बनविला जात होता परंतु आता सेटिंग सिल्क मध्ये तयार करण्यात येईल.
हर घर झेंडा हा दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दिवस प्रत्येक घरावर झेंडा लागेल. हर घर तिरंगा Har Ghar Tiranga in marathi
झेंडा फडकवण्याचे काही नियम
- झेंडा स्वच्छ इस्त्री केलेला असावा फाटका किंवा चूरगळलेला नसावा.
- झेंडा सकाळी सूर्योदयाच्या वेळी फडकवावा व संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी उतरवावा.
- प्रभात फेरीमध्ये फिरताना झेंडा उजव्या हातामध्ये धरावा आपला हात दुखला असेल तर शेजारच्या मुलाच्या ही उजव्याच हातात झेंडा द्यावा.
- राष्ट्रीय ध्वज अडचणीत उभा करू नये उदाहरणार्थ घराजवळ मोठे झाड आहे आणि आपला झेंडा झाडात लपला आहे असे नसावे.
- झेंड्यावर काही झाकण नसावी झेंडा निरभ्र आकाशात दिसला पाहिजे.
- झेंड्याचे चित्र चप्पल वर किंवा अंतर वस्तरावर नसावे निदान कमरेखालील भागात तरी नसावी त्यामुळे झेंड्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी.
- झेंड्यावर काही पक्षांनी घाण केले असल्यास तो काढून घेऊन त्याला स्वच्छ करणे.
- झेंडा जमिनीवर पडू न देणे तसे झाल्यास झेंड्याचा अपमान होतो, देशाचा राष्ट्राचा अपमान होतो, आणि
- जबाबदार व्यक्तीला यात शिक्षा तीन वर्षे होऊ शकते आणि दंडही ठोठावू शकतात.म्हणून तर
- शाळेत झेंडा फडकवला किंवा तिथे एक सेवक वेळापासून ते उतरविण्यापर्यंत तिथेच येऊन बसायचे,
- लहानपणी वाटायचे हे काय करत असतील ?
- ध्वज राष्ट्रीय शोक असेल तेव्हा म्हणजे कोणी मोठे मंत्री किंवा नामवंत यांचे निधन झाले असेल तर शासकीय झेंडा अर्ध्यावर उतरविता येतो.
- राष्ट्रीय ध्वज देशाचे प्रतीक आहे त्यामुळे नेहमी उंच ठिकाणी पाहिजे.
- घरावर देवाचे किंवा संघटनेची झेंडे असतील तर त्यांच्याहून उंच राष्ट्रीय ध्वज हा लावला पाहिजे.
- झेंड्याचा नेहमी सन्मान केला पाहिजे रस्त्यावर झेंडा पडला असेल तर एका ठिकाणी जमा करावं खेडे असेल तर ग्रामपंचायत मध्ये जमा करावा आणि
- शहर असेल तर युवकांनी हे जमा करण्याचे काम करावे.
- झेंड्याचे काम झाल्यावर पटकन गडी घालून कपाटात ठेवून द्यावे उगाचच टेबलावर ठेवायचा नंतर त्यावर काही वस्तू ठेवल्यात हे चांगले नाही.
- इंडिया रंगीत डिझाईन काढू नये.झेंडा खादी किंवा सिल्कचा असावा.
- झेंडा सकाळी फडकवताना आदराने सलामी द्यावी व झेंडा संध्याकाळी उतरविताने अगोदर झेंड्याला सलामी द्यावी व नंतरच ध्वज उतरवावा.
- आपण या देशाचे नागरिक असल्याकारणाने आपले कर्तव्य आहे की आपण झेंड्याची चांगली काळजी करावी.
- जिल्ह्यावर पालकमंत्री झेंडा फडकवितात, त्यानंतर तालुक्यावर कलेक्टर झेंडा फडकवतात, खेड्यामध्ये सरपंच झेंडा फडकवतात.
राष्ट्रीय ध्वजा संबंधी काही घटना क्रम:
22 जुलै 1947 रोजी व्यंकय्या पिलाई यांनी भारतातील
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेवर राजेंद्र प्रसाद समवेत 284 सदस्यांनी सह्या करून समितीला स्वीकृत केली.
24 जानेवारी 1950 रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या राष्ट्रगीतात मान्यता मिळाली.
14 ऑगस्ट 1950 रोजी केंद्रीय विधायक आयोग अमलात आले.
25 जानेवारी 1950 रोजी मतदान केंद्र निर्माण झाले त्यामुळे 25 जानेवारी हा दिवस मतदान दिवस साजरा करतात.
1952 मध्ये प्रथमच लोकसभेच्या निवडणुका झाल्या.
26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू करण्यात आली.
हर घर तिरंगा प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करायचं ?
- http://www.harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- तिथे Pin a flag हा पर्याय निवडा.
- त्यानंतर रिकाम्या रकान्यांमध्ये विचारलेली माहिती भरा. यात व्यक्तीचं नाव, फोन नंबर अशा तपशीलाचा समावेश असेल. गुगल अकाऊंटवरुनही या पेजवर थेट माहिती भरता येईल.
- तुमची लोकेशन अॅक्सेस करण्याची परवानगी वेबसाईटला द्या.
- परत एकदा pin a flag वर क्लिक करा.
- Download ऑप्शनवर क्लिक करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
‘हर घर तिरंगा Har Ghar Tiranga in marathi हा आर्टीकल मधील माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेयर करा.