महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा फेब्रुवारी 21 पासून सुरु होत आहे
22 जानेवारीपासून परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून ऑनलाइनपद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे
परीक्षेसंदर्भात बोर्डाने नवीन सूचना जारी केल्या आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तासा आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे
बोर्डाकडून प्रत्येक केंद्राला सूचना देण्यात अल्ल्या आहेत कि पेपर सुरु झाल्या नंतर येणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही त्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्रावर अर्धा तास आदी जाणे बंधनकारक असणार आहे
पूर्वी विद्यार्थ्यांना पेपर सुरूहोण्याआधी दहा मिनिटे लवकर प्रश्नपत्रिका दिली जायची. पण आता ही पद्धत बंद केली आहे विद्यार्थ्यांना पेपरच्या शेवटी दहा मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे.
या वेळेस वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर नंबर येणार आहेत या वेळेस दरवर्षी सारखे एकाच कॉलेजवर किंवा शाळेत नंबर येणार नाहीत
या वेळेस परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे आणि त्याच बरोबर सीसीटीव्ही ची देखील नजर हि केंद्रावर राहणार आहे
विद्यार्थ्यांनी परीक्षेबद्दल कोणतीही भीती न ठेवता व्यवस्तीत अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असे आवाहन शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले