हल्ली प्रत्येकाचा आवडीचा नाश्ता म्हणजे पोहे. आज ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात पोहयापासून तयार करण्यात येणारी कांदा पोहा ही डिश सर्वजण अगदी आवडीने खातात. Poha Business in marathi पोहा उद्योग लग्न ठरवण्याचा कार्यक्रम असो किंवा पाहुण्यांच्या स्वागतासाठी कांदापोहे ही डीश आज सर्व घरात बनविली जाते. हॉटेल मध्येही कांदे पोहे हे अनेकांचे आवडते खाद्य आहे. पोहे पचण्यास हलके असल्याने अगदी लहानापासून मोठयापर्यंत सर्वजण हया डिशचा आनंदाने आस्वाद घेतात. खूप कमी वेळेत कांदापोहे ही डीश तयार होत असल्याने न्याहारीत यास खूपच मागणी आहे. स्नॅक्स प्रकारात पोहयापासून चिवडा, लाडू इ. सारखे अनेक पदार्थ बनवितात. असे हे सर्वांच्या आवडीचे असे लोकप्रिय पोहे बनतात…