डोसक्यात रग हाय, अंगात धग हाय, हलवु महाराष्ट्राला.. पायात आग हाय, काळीज वाघ हाय, फकस्त आपलीच चर्चा.. नुसता बैलगाडा न्हाई आपला, आपला हाय ह्यो रणगाडा, समदीकडं हाय आपल्या, नावाचा गाजावाजा, शरयतीचा जाळ ह्यो माझ्या धमन्यामंदी भिनला जोशात उडवत धुरळा, आला बैलगाडा, आता १ नंबर हाय आपला, आला बैलगाडा… आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो मी जितलो भी, काटंच्या वाटेवरी, दुश्मन भी आज मला, वाकुन सलाम करी, या मातीनं दिलं बळ, लढन्याला अन् भिडन्याला, देव माझा मल्हारी, खंडोबा पाठीशी, लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीत ही केली, आशिर्वाद बाबांचा अन् आईची हाय पुण्याई, धावतात…