कमी गुंतवणूकमध्ये रेडिमेड कपड्याचा व्यवसाय कसा सूरू करायचा ? हेच आज आपण या पोस्ट बघणार आहोत. / Cloth Business in marathi
कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तपासून बघायची आहे ती म्हणजे तुमच्याकडे असलेलं भांडवल.
दहा हजार , वीस हजार, पन्नास हजार, एक लाख किती आहे नेमक ते आधी चेक करा.
तुमच्याकडे भांडवल किती आहे किंवा किती भांडवल तुम्ही उभा करु शकता हे आधी तुम्हाला check करायच आहे आणि मग पुढची योजना आखायची आहे.
३० ते ३५००० हजार च्या आत तुम्ही तुमचा कपड्याचा व्यवसाय कसा सुरु करू शकता हेच आपण बघणार आहोत.आता तुमच भांडवल जर कमी असेल तर तुम्ही कपड्याची factory लावू शकत नाही.
३५००० हजार रूपयात तुम्ही कपड्यांचं physical दुकान देखील सूरू करु शकणार नाही कारणं पन्नास हजारात कपड्यांचं दुकान सूरू करण शक्य नाही.
कारणं कपड्यांचं physical दुकान सूरू करायच म्हटल तर तुम्हाला कमीत कमी 2-3 लाखांचा माल भरावा लागलं
त्याचबरोबर गाळ्याच भाड, लाईट बिल असे खर्च देखील येतात. जर स्वतःच दुकान असेल तर तूम्ही ते करू शकता.
आणि म्हणूनच तुम्हाला तुमचा व्यवसाय हा घरगुती पद्धतीनें करायचा आहे.
अनेक मोठमोठ्या दुकानदारांनी त्यांचा कपड्याचा व्यवसाय हा त्यांच्या घरातूनच सुरु केलेला आहे.
कपड्यासाठी मार्केट रिसर्च कसा करावा ?
सर्वात आधी तुम्हाला थोडासा मार्केट research करायचा आहे. त्यात तुमच्या भागात कोणते शर्ट चालतात ते शोधायचं आहे, मग त्यासाठी तूम्ही तुमच्या भागातील लोकांचं निरीक्षण करू शकता.
एखाद्या T-shirt च्या किंवा कपड्याच्या दुकानाला भेट द्या आणि shirt घ्यायचे म्हटल्यावर तो दुकानदार कोणकोणते shirt तुम्हाला दाखवतो ते तुम्ही निरीक्षण करा.
यावरून तूम्हाला Latest fashion चा अंदाज येईल. म्हणजे सध्या कोणता trend चालू आहे,
सध्याची fashion , style काय आहे यानुसार तुम्ही तुमचा माल खरेदी करु शकता.
होलसेल ने शर्ट कुठून विकत घ्यायचे ?
wholesale ने शर्ट खरेदी करण्यासाठी तुम्ही सुरत, बँगलोर, मुंबई, दिल्ली, या ठिकाणाहून wholesale ने कपडे विकत घेऊ शकता.
तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथून जे ठिकाण जवळ आहे किंवा तुम्हाला योग्य वाटत असेल तिथून तुम्ही wholesale ने माल भरू शकता.
जर तुम्ही महाराष्ट्रात राहात असाल तर मुंबई आणि सुरत आपल्याला इथून जवळ आहे.
Maximum लोक हे सुरत वरून कपडे विकत घेणे पसंद करतात आणि तुम्हाला अतिशय स्वस्तात इथून wholesale ने कपडे मिळतील.
सुरत ला रेल्वे स्टेशन वर उतरल्यावर फक्त १० रुपये रिक्षावाल्याला देऊन तुम्ही सहारा दरवाजा इथे जाऊ शकता इथून पुढे सरळ रोड आहे ज्याला रिंग रोड असाही म्हणत.
याच रोडवर आणि याच भागात तुम्हाला जवळपास सगळे Textile मार्केट मिळतील. इथून पुढं पाउलापाऊलवार तुम्हाला textile मार्केट दिसतील.
इथून कपडे खरेदी करायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथे अनेक factory आउटलेट आहे.
म्हणजे जे लोक cloth manufacture करतात त्यांचीच दुकान आहे म्हणजे wholesale दुकानदार ज्यांच्याकडून कपडे खरेदी करतात तुम्ही directly त्यांच्याकडून फॅक्टरी rate ने कपडे खरेदी करू शकता.
तुम्हाला wholesale पेक्षाही कमी किमतीत इथे कपडे मिळतील.
महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, लहान मुलांचे कपडे असे सर्व प्रकारचे कपडे इथे तुम्हाला wholesale ने मिळतील.
गुंतवणूक
shirt च बोलायचं झालं तर १५० रुपयापासून मग पुढे २००, २५०, ३०० , ते ५००, ६०० पर्यंत च्या rate मध्ये तुम्हाला शर्ट इथे मिळतील.
तुम्ही सुरुवातीला २००, ३०० पर्यंतच्या rate चे शर्ट घ्या, फार high rate चे शर्ट सुरुवातीलाच घेऊ नका
For example तुम्ही २५० रुपये rate चे १०० shirt घेतले तर २५००० रुपये होतात.
online फोन वरून यांच्याशी संपर्क करू शकता किंवा स्वतः सुरत ला जाऊन खरेदी करू शकता परंतु
तुम्ही जर नवीन असाल तर मी तुम्हाला recommend करेल कि तुम्ही एकदा स्वतः सुरत ला जाऊन या आणि तेथील वेगवेगळ्या टेक्सटाईल मार्केट ला भेट द्या.
तिथे तुमच्या वेगवेगळ्या लोकांशी ओळखी होतील आणि तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल.
आणि इथे तुम्हाला नुसते wholesale ने कपडेच मिळणार नाही तर हे लोक तुम्हाला मार्गदर्शन देखील करतील.
कोणता माल ठेवायचा, तो किती किमतीला विकायचा धंदा कसा वाढवायचा. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला उधारीवर देखील माल मिळेल.
हे लोक तुम्हाला ९० टक्क्यांपर्यंत उधारीवर माल देतात. परंतु लगेच पहिल्याच वेळेस उधारीवर माल मिळणार नाही.
त्त्यासाठी तुम्हाला या suppliers ला दाखवून द्यावं लागेल कि तुम्हाला खरंच कपड्याचा व्यवसाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही प्रामाणिक आहात.
तुमच्यात खरंच व्यवसाय करण्याची धमक आहे. सप्लायर चा एकदा का तुमच्यावर विश्वास बसला कि मग तुम्हाला नक्कीच उधारीवर माल मिळेल.
विक्री किंमत किती असावी ?
Wholesale ने माल आणला पण आता हे कपडे विकायचे कितीला, Margin किती ठेवायचं.
इथे तुम्ही ५० टक्के प्रॉफिट Margin ठेऊ शकता. आता इथं कोणताही Hard and Fast Rule नाही.
अनेक लोक २०० चा शर्ट ६०० – ७०० ला देखील विकतात. तुम्ही देखील तसे करायचे आहे. तुम्हाला थोडं तुमचं डोकं वापरायचं आहे.
शर्ट ची Quality कशी आहे यावरून तुम्हाला तुमचं Profit Margin ठरवायचं आहे.
Wholesale किमतीच्या तुलनेत शर्ट ची Quality फारच चांगली असेल तर तुम्ही जास्त मार्गिन ठेऊ शकता.
सुरुवातीला कमी Profit Margin ठेवा आणि एकदा का तुमच्याकडे ग्राहक यायला लागले कि हळू-हळू Margin वाढवू शकता.
२५० रुपयाचा शर्ट तुम्ही ५०० ते ६०० रुपयांपर्यंत सहज विकू शकता.
आवश्यक लायसेंन्स
जर तुम्ही घरगुती पद्धतीने कपड्याचा व्यवसाय सुरु करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या License ची आवश्यकता नाही.
परंतु जर तुमचा Turnover अधिक असेल किंवा भविष्यात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवायचा असेल तर काही License तुमच्याकडे असावीत.
Shop Act License
GST Registration
Udyam Aadhar Registration
मार्केटिंग कशी करायची ?
त्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे हे शर्ट विकायचे कसे, Marketing कशी करायची.
कारण व्यवसाय चालू केला आणि कस्टमर येण्याची वाट बघत बसलात तर तुमचा व्यवसाय लवकरच बंद होईल.
तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या ओळखीच्या अशा ३०० ते ४०० लोकांची लिस्ट बनवायची आहे.
हि लिस्ट जितकी मोठी होईल तितके फायद्याचे आहे.
या सगळ्या लोकांची नावे, त्यांचे मोबाईल नंबर, whatsapp नंबर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या लिस्ट मध्ये Add करायच्या आहे.
त्यानंतर या प्रत्येकाला phone करून किंवा वैयक्तिकरित्या भेटून तुम्ही शर्ट विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे हे त्यांना सांगायचं आहे.
परंतु आता हे लोक एव्हडे सगळे दुकान सोडून तुमच्याकडे का येतील ?
फक्त मित्र आहे किंवा ओळखीचे आहे म्हणून – अजिबात नाही, मैत्रीखातर ते एकदा येतील परंतु तुमचे loyal कस्टमर बनणार नाही.
या लोकांनी तुमच्याकडे का यावं ? यासाठी काहीतरी चांगलं कारण असाल पाहिजे.
एकतर तुमच्या कपड्याची quality खूप चांगली आहे, किंवा तुम्ही एखादी ऑफर ठेऊ शकता जसे कि दोन शर्ट घेतले कि एक्सट्रा १० % डिस्काउंट
किंवा मार्केट पेक्षा स्वस्त दरात शर्ट मिळतील किवा एकावर एक शर्ट Free ( Buy 1 Get 1 Free )
अशा पद्धतीने कस्टमर ला attract करण्यासाठी काहीतरी special offer तुम्ही देऊ शकता.
काहीतरी मार्केट पेक्षा Extra तुम्हाला देणं गरजेचं आहे.
Cloth Business in marathi
त्यानंतर तुम्हाला या सगळ्या लोकांना What’s App वरून shirt चे फोटो पाठवायचे आहे आणि एकदा शर्ट बघून जा असे सांगायचे आहे.
सुरुवातीला विक्री किमतीवर अडून बसू नका जर एखाद्याला शर्ट आवडला आणि किमतीमुळे अडून बसले असेल तर ५० – १०० रुपये कमी करून शर्ट ची विक्री करू शकता.
तुमची business ची cycle सुरु होणं गरजेचं आहे सुरुवातीला लवकरात लवकर माल कसा विकत येईल हे तुम्ही बघा.
मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही social media चा वापर करू शकता तुम्ही whatsapp चा Group बनवू शकता आणि त्यात सगळ्या कस्टमर ला add करू शकता
त्याचबरोबर facebook वर तुमच्या शहराचे काही local group असतील त्याला join होऊ शकता आणि त्या ग्रुप वर देखील मार्केटिंग करू शकता. हवं तर तुम्ही तुमचा स्वतःचा facebook ग्रुप देखील बनवू शकता.
त्यानंतर तुम्ही facebook Ads, Instagram Ads, Google Ads चा देखील वापर करू शकता.
थोडेफार पैसे खर्च करण्याची तुमची तयारी असेल तर facebook ads च्या मध्येमातून तुम्ही तुमच्या शहरातील लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.
facebook Ads, Instagram Ads, Google Ads हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.
कारण आजकाल प्रत्येकजण फेसबुक चा वापर करतो आणि तुमची जाहिरात directly या लोकांच्या mobile मध्ये दिसेल त्यामुळे तुम्हाला भरपूर कस्टमर मिळू शकता.
त्याचबरोबर तुम्ही Amazon, Flipkart अशा website वर Seller म्हणून रेजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचे शर्ट online देखील विकू शकता.
कमाई
समजा तुम्ही हे २५० रुपयाचा शर्ट ५०० रुपयाला विकला तर प्रत्येक शर्ट मागे २५० रुपये राहातात आणि
जर असे १०० शर्ट तुम्ही विकले तर २५००० रुपये होतात त्यातून मार्केटिंग आणि इतर खर्च ५००० रुपये जरी धरला तर २०००० रुपये तुमचा नफा राहतो.
Cloth Business in marathi
आता हे २०,००० रुपये तुम्हाला कमी वाटत असतील परंतु तूम्ही फक्त २५००० रूपये गुंतवून २०,००० कमावले आहेत.
तुमच्या गुंतवणुकीच्या तुलनेत २०,००० रुपये खूप आहे. जवळपास पैसे डबल आणि
सर्वात महत्वाचं म्हणजे यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक बनाल आणि
कपड्याचा व्यवसाय कसा करायचा हे देखील तुमच्या लक्षात येईल.
तुम्ही जितका जास्त माल विकू शकता तितके जास्त पैसे तुम्ही कमावू शकता. कपड्याच्या व्यवसायातून लाखो रुपये कमाऊ शकता.
आजच्या लेखामध्ये रेडिमेड कपड्याचा व्यवसाय या बद्दल माहीती आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा. Cloth Business in marathi
Please Share 👇 on What’s App