नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे Kitchen IRANI चॅनेल मध्ये. आज आपण पाहणार आहोत गुळंबा कसा बनवायचा HOW TO MAKE GULAMBA
आला ना तोंडाला वाचूनच पाणी.कैरी खायला सगळ्यांनाच आवडते आणि त्याच कैरी पासून जर कैरीची चटणी, कैरीचे पन्हे, कैरीचे लोणचे हे तर आपण सर्वांनी या अगोदर खाल्लेले आहेच. पण आज आपण काही तरी नवीन आणि घरगुती आपल्या स्वतःच्या हातानी बनवलेला कच्या कैरीचे गुळंबा. आपण याला जॅम हि म्हणू शकतो. चला तर सुरु करूया.
चला तर मग आज आपण बनवणार आहोत थोडासा आंबट, थोडासा तिखट, आणि थोडासा गोड असा कच्या कैरीपासून गुळंबा कसा बनवायचा.
लागणारे साहित्य
- कच्ची कैरी
- मीठ
- साखर
- मिरची पावडर
- हळद
गुळंबा कसा बनवायचा ?
सगळ्यात अगोदर कैरीला मिठाच्या पाण्यानी स्वच्छ धुवून घेयचा आहे, कारण बाहेर ची धूळ त्यावर असते ती निघून जाईल.
कैरीला धुतल्या नंतर कैरीचे वरचे देठ चाकू नि कट करून घ्यायचे आहे.
मोठ्या किसणीच्या साहाय्याने कैरीला किसून घ्यायचे आहे, थोडासा मोठंमोठं किसायचं आहे, जर आपल्याकडे लहान किसणी असेल तर त्यांनीही किसू शकता.
कैरी किसून झाल्यावर त्यामध्ये ४ चमचे साखर मिसळायची आहे, आणि त्याला १ तास ठेवायचं आहे.
ज्यांचा तोंडाचा वास येतो त्यांनी तर आवर्जून कैरी खायला पाहिजे. त्यांच्या साठी तर खूपच जास्त उपयोगी आहे.
१ तास नंतर झाल्यावर साखरेने पाणी सोडले असेल
गॅस चालू करून एका पॅन मध्ये हे गुलाब मिश्रण त्यात टाकायचा आहे.
गॅस ला कमी आचेवर ठेवायचं आहे आणि गुळंब्याला सतत हलवायचा आहे त्यामुले साखरेचं पाणी त्यासोबत मिक्स होईल.
साखरेचं पाणी पूर्ण सुखल्या नंतर त्यात स्वादानुसार मीठ, थोडीसी हळदी पावडर, चवीनुसार मिरची पावडर टाकून हे सर्व मिक्स करायचं आहे. थोडा वेळ सतत हलवायचा आहे.
मिरची पावडर टाकणे हे पूर्ण पाने आपल्यावर डिपेंड आहे जर आवडत असेल तर टाका त्याने मस्त अशी तिखट टेस्ट येईल.
गुळंब्याला आता ३० मिनिटे शिजू द्यायचा आहे. अधू मधून चमचा नि गुलाब हलवायचा आहे त्याने गुळंबा खाली चिटकणार नाही.
गुळंबा आपण फ्रीझ मध्ये जवळपास ३ आठवडे ठेऊ शकतो.
३० मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे गुळंब्याला पूर्ण पणे थंड होऊ द्यायचे आहे.
गुळंबा कसा बनवायचा HOW TO MAKE GULAMBA